नामांकित कंपनीमध्ये नोकरी देण्याचे आमिष दाखूवन अल्पवयीन मुलीला लॉजवर नेऊन बलात्कार करणाऱ्या आरोपीला रबाळे पोलिसांनी अटक केली आहे. आरोपीचे नाव विजय बनसोडे आहे. ही घटना २४ ऑक्टोबर रोजी घडली होती.
ऐरोली सेक्टर १ परिसरात राहणाऱ्या अल्पवयीन मुलीला माइंड स्पेस कंपनीत नोकरी देण्याचे आमिष दाखवून वाशीतील लॉजवर नेऊन बलात्कार करण्यात आला. या प्रकरणी रबाळे पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता. या प्रकरणी फरार तरुणाचा शोध घेऊन त्याला रबाळे पोलिसांनी तुभ्रे स्टोअर येथून अटक केली आहे. आरोपीवर तुर्भे पोलीस स्टेशनमध्ये चार गुन्हे दाखल असून त्याला हद्दपार करण्यात आले आहे. माइंड स्पेस कंपनीत नोकरीसाठी मुली व महिला पाहिजे असल्याचे सांगत पीडित अल्पवयीन मुलगी व तिची मैत्रीण व काही महिलांना तेथे नेण्यात आले होते. या वेळी महिलांना कंपनीच्या गेटसमोर उभे करून पीडित मुलीला व तिच्या मैत्रिणीला कागदपत्रे बनवण्याच्या बहाण्याने रिक्षाने वाशीला आणले. मैत्रिणीला एका ठिकाणी थांबवून पीडित मुलीला लॉजवर नेण्यात आले. तिथे गुंगीचे औषध देऊन आरोपीने बलात्कार करून मोबाइल व सोन्याचे दागिने चोरल्याची तक्रार मुलीने रबाळे पोलीस ठाण्यात केली होती. सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार पोलिसांनी आरोपीला अटक केली असून त्याला शनिवापर्यंत पोलीस कोठडी देण्यात आली आहे.
संग्रहित लेख, दिनांक 6th Nov 2015 रोजी प्रकाशित
नोकरीचे आमिष दाखवून बलात्कार करणाऱ्यास अटक
आरोपीचे नाव विजय बनसोडे आहे. ही घटना २४ ऑक्टोबर रोजी घडली होती.
Written by रत्नाकर पवार

First published on: 06-11-2015 at 07:49 IST
Navimumbai News (नवी मुंबई न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Rapist arrested in navi mumbai