scorecardresearch

Premium

नवी मुंबई – आधी विश्वासात घ्या, झोपडपट्टी पुनर्विकासावर रामनगर येथील रहिवाशांची भूमिका, खाजगी सर्वेक्षणाला केला विरोध

नवी मुंबईतील एमआयडीसी भागातील झोपडपट्टी पुनर्विकासाला हिरवा कंदील मिळाला म्हणून खूप गाजावाजा झाला.

Residents oppose private survey in Ramnagar
आधी विश्वासात घ्या, झोपडपट्टी पुनर्विकासावर रामनगर येथील रहिवाशांची भूमिका, खाजगी सर्वेक्षणाला केला विरोध

नवी मुंबई : नवी मुंबईतील एमआयडीसी भागातील झोपडपट्टी पुनर्विकासाला हिरवा कंदील मिळाला म्हणून खूप गाजावाजा झाला. मात्र दिघा भागातील रामनगर येथील रहिवाशांनी याला विरोध केला असून अगोदर विश्वासात घ्या आणि खाजगी सर्वेक्षण का ? असा सवाल त्यांनी केला आहे. आज पार पडलेल्या पत्रकार परिषदेत त्यांनी झोपडपट्टी पुनर्वसनला विरोध नसून दादागिरी आणि खाजगी लोकांचा सहभाग याला विरोध आहे असे सांगण्यात आले. 

नवी मुंबई महानगरपालिकेच्या दिघा विभागातील रामनगर परिसरामध्ये खाजगी बांधकाम व्यावसायिकाच्या माध्यमातून झोपड्याचे  सर्वेक्षण करण्यात येत  आहे. पण हे  सर्वेक्षण दरम्यान दादागिरी घर सोडण्याच्या धमक्या दिल्या जात असल्याचा आरोप केला आहे. हा सर्वेक्षण रहिवाशांना विश्ववासात न घेता करत असल्याचा आरोप रामनगर रहिवाशी संघर्ष समिती च्या माध्यमातून प्रकाश करजावकर यांनी पत्रकार परिषद मध्ये केला आहे. घर देणार पण किती चटई क्षेत्र ? काय योजना ? काशी आणि कधीपर्यंत राबवणार? तो पर्यंत आम्ही कुठे राहायचे? असे अनेक अनुत्तरित प्रश्न आमच्या समोर असल्याचे त्रकार परिषदेत सांगण्यात आले.  या संदर्भात मुख्यमंत्री यांच्याकडे तक्रार करणार असल्याचे कर जावकर यांनी स्पष्ट केले.

Traffic congestion Bhayander
भाईंदर : बोर्डाच्या परीक्षेच्या तोंडावर वाहतूक कोंडीचा त्रास, जागोजागी सुरु असलेल्या खोदकामामुळे नागरिक त्रस्त
vasai ro ro service vasai fort to bhayandar ro ro ferry
वसई किल्ला ते भाईंदर रो रो सेवेचे उदघाटन रद्द; उत्साही प्रवाशांचा हिरमोड
mumbai dharavi redevelopment project marathi news, dharavi marathi news
धारावी पुनर्विकासात इमारत, चाळवासीयांना उपलब्ध आकारमानापेक्षा मोठे घर मिळणार!
The economy of the district depends on religious tourism industry and business
धार्मिक पर्यटन, उद्योग, व्यवसायांवर जिल्ह्याचे अर्थकारण अवलंबून; नाशिक जिल्ह्यचा विकास दर १३.१ टक्के

हेही वाचा >>>नवी मुंबई : विकास आराखड्यात हस्तक्षेपाची गरज; एक-दोन बैठका होऊनही महापालिका-सिडको यांच्यात तोडगा नाही

नवी मुंबई महानगरपालिकेच्या प्रभाग क्रमांक दोन मधील रामनगर परिसरात खाजगी बांधकाम व्यवसायिक यांच्याकडून बहुमजली असणाऱ्या इमारतीचे सुरू आहे. सद्यास्थितीत या सुरू असणाऱ्या बांधकाम च्या ठिकाणी फुटिंग चे काम सुरू असून तिथे सुरुंग लावण्यात येत आहे. या सुरुंग च्या धक्कायाने रामनगर परिसरामध्ये राहत असणाऱ्या राहीवाशाच्या घरांना तडे जात आहे. घरांचे नुकसान होत असताना राजकीय नेत्याच्या मदतीने सदरील बांधकाम व्यवसायिकाच्या माध्यमातून रामनगर मध्ये खाजगी सर्वेक्षण करण्यात येत आहे. येथे सर्वेक्षण करत असताना रहिवाशांना विश्वासात घेत नसल्याचा आरोप करजावकर यांनी पत्रकार परिषेदेत केला आहे. सर्वेक्षण करताना विश्वासात न घेतल्यामुळे रहिवाशांमध्ये भीतीचे वातावरण आहे. दिघा येथील पाटील वाडीतील रहिवाशांना ज्या पद्धतीने बेघर करण्यात आले. त्या पद्धतीने आम्हला देखील बेघर करू शकतात. असा करजावंकर यांनी आरोप केला आहे. शासनाचा सर्वे झाल्यास आमचा सर्वे ला विरोध नाही असे करजावकर यांनी स्पष्ट केले.

हे सर्व काम शिवसेना अध्यक्ष (शिंदे गट) विजय चौगुले आणि जगदीश गवते यांच्या मार्फत होत असल्याचा गंभीर आरोप केला गेला. या बाबत विजय चौगुले। यांना विचारणा केली असता मी प्रामाणिक पणे काम करीत असून कुणीही आरोप करेल मी अशांना उत्तरे देण्यास महत्व समजत नाही. अशी प्रतिक्रिया त्यांनी दिली. 

Latest Comment
View All Comments
Post Comment

Navimumbai News (नवी मुंबई न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

Web Title: Residents oppose private survey in ramnagar amy

First published on: 10-10-2023 at 15:11 IST

आजचा ई-पेपर : नवी मुंबई

वाचा
epaper image

संबंधित बातम्या

तुम्ही या बातम्या वाचल्या आहेत का? ×