उरण : रविवारी द्रोणागिरी स्पोर्ट्स असोसिएशनच्या वतीने उरण मध्ये वर्षा मॅरेथॉन व उरण अभिमान दौड चे अयोजन करण्यात आले होते. या स्पर्धेत १ हजार २०० पेक्षा अधिक स्पर्धकांनी आपला सहभाग नोंदविला. बोकडवीरा येथील पेट्रोल पंपा नजीक या स्पर्धांचे आयोजन करण्यात होते. द्रोणागिरी स्पोर्ट्स असोसिएशन मागील २५ वर्षांपासून या स्पर्धा भरवीत आहे.
द्रोणागिरी स्पोर्ट्स असोसिएशनचे अध्यक्ष महादेव घरत,उपाध्यक्ष मनोज पडते,शिवेंद्र म्हात्रे,वैशाली घरत व त्यांच्या सहकाऱ्यांनी आयोजन केले होते. यावेळी उरणचे माजी आमदार मनोहर भोईर,जेएनपीएचे कामगार विश्वस्त रवींद्र पाटील,मिलिंद पाडगावकर, डॉ. सुरेश पाटील,रवींद्र घरत आदीजण उपस्थित होते. या स्पर्धेत जेष्ठ नागरिक,दिव्यांग,लहान मूल मुली, महिला आदींनी सहभाग नोंदविला.यामध्ये २ ते २१ किलोमीटर अंतरांच्या स्पर्धांचा समावेश होता. या निमित्ताने उरण अभिमान दौडचेही आयोजन करण्यात आले होते. या दौड मध्ये उरण तालुक्यातील सामाजिक व प्रतिष्ठित नागरिकांनी सहभाग घेतला होता.
द्रोणागिरी स्पोर्टस असोसिएशन तर्फे केअर पॉइंट हॉस्पीटल चौक येथे जिल्हा पातळी वरील वर्षा मॅरेथॉन स्पर्धा आयोजीत केली होतीसदर स्पर्धेत सुमारे १ हजार २०० लहान मोठ्या स्पर्धकांनी भाग घेतला होता.
स्पर्धकांना वाहतूक पोलिसांचे सुरक्षेचे धडे :
या स्पर्धेचे औचित्य साधून उपस्थित स्पर्धक पालक व नागरीक याना , उरण वाहतुक पोलीस मार्फत उरण परिसरातील अपघात टाळणे करीता उपाय, वाहतुकीचे नियम पाळणे या विषयावर प्रभारी पोलीस निरीक्षक अतुल दहीफळे यांचे मार्गदर्शनाखाली प्रबोधन करून वाहतुकीचे नियम पाळा व अपघात टाळा हा संदेश दिला.