नवी मुंबई : नवी मुंबईतील नेरूळ येथील श्री गणेश हौसिंग सोसायटीत ३९ लाख ९३ हजार ३५०  रुपयांचा आर्थिक गैरव्यवहार झाल्याचा ठपका ठेवत अनोळखी  व्यक्ती विरोधात अफरातफर, कट रचणे आदी कलमान्वये नेरूळ पोलीस ठाण्यात गुन्हा नोंद झाला आहे. अज्ञात व्यक्ती विरोधात गुन्हा नोंद झाला असला तरीही अशोक गावडे यांच्या सह एकूण ४७ जणांना जवाबदार धरण्यात आलेले आहे.

माजी उपमहापौर अशोक गावडे रहात असलेली श्री गणेश हौसिंग सोसायटीत आर्थिक गैरव्यवहार झाल्याचा आरोप केला जात होता. त्यामुळे सदर सोसायटीचे लेखापरीक्षक करण्यात आले. त्यात गैर व्यवहार झाल्याचे आढळून आल्याने या प्रकरणी लेखा परीक्षक सहकारी संस्थेने दिलेल्या तक्रारीवरून नेरूळ पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे.याला वरिष्ठ पोलीस निरीक्षक तानाजी भगत यांनी दुजोरा दिला आहे.

आणखी वाचा-उरणच्या वाढत्या वायु प्रदूषणाकडे स्थानिक प्रशासनाचा कानाडोळा

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

या गैरव्यवहारास जवाबदार म्हणून ज्यांच्यावर ठपका ठेवण्यात आला आहे त्यात अशोक गावडे सह ४७ लोकांची नावे आहेत. १७ फेब्रुवारी १९९३ ते ३१ मार्च २०१६  पर्यंत श्री गणेश को आप. हौसिंग सोसायटी लि..भूखंड क्रमांक १ ,सेक्टर२८ ,नेरूळ, म्हणजेच स्थापने पासून यातील  संस्थेचे पदाधिकारी, सदस्य व इतर अनोळखी इसम तसेच दादर भाजीपाला व्यापारी मित्र मंडळाचे पदाधिकारी, सदस्य व इतर यांनी सर्वांनी मिळून सदर श्री गणेश को-आप हौसिंग सोसायटी नेरूळ नवी मुंबई या संस्थेमध्ये संगणमताने दप्तरांमध्ये फेरफार, बदल करुन, बनावट कागदपत्र तयार करून, वापर करून, दप्तरामध्ये खाडाखोड करून, बनावट व खोटी माहिती देऊन, चुकीचे व खोटे हिशोब दाखवून, बनावट अटी शर्ती लादून, शिफारशीची गैरसक्ती करून, नियमबाहय रकमा देण्यास भाग पाडून,गैर पध्दतीने रोख रकमांची मागणी करून, संस्था व सभासदांची दिशाभुल करून, संस्थेच्या निधीचे चुकीचे व्यवस्थापन करून, मालमत्ता हस्तांतरणास गैर पध्दतीने मदत करून, मान्यता न घेता मोठा खर्च करून खोटा व लबाडीने पत्रव्यवहार करून, बनावट गिरी करून, संस्थेच्या हिताचे कायदेशीर दस्त न करून, शासनाचे मुद्रांक शुल्क व नोंदणी शुल्क बुडवून, अधिकार व पदाचा गैरवापर करून, फसवणुक व विश्वासघात करून, गैरव्यवहार करून रूपये ३९ लाख ९३ हजार ३५०  इतक्या रकमेचा अपहार केलेला आहे म्हणून त्यांचेविरूध्द माझी शासना तर्फे कायदेशिर फिर्याद आहे. असे तक्रारीत नमूद करण्यात आले आहे.गैर व्यवहार नक्की कोणी केला हे अद्याप उघड न झाल्याने आरोपी अनोळखी म्हणून नोंद झाली आहे. अशी माहिती नेरूळ पोलिसांनी दिली.