वर्षभरानंतर दरात घसरण

रोजच्या आहारातील पौष्टिक घटक असलेल्या ज्वारीचे वाशीच्या घाऊक बाजारातील दर वर्षभरानंतर खाली येण्यास सुरुवात झाली आहे. सुमारे १५ दिवसांपूर्वीपर्यंत ३५ ते ४० रुपये किलो दराने विकल्या जाणाऱ्या ज्वारीच्या दरात किलोमागे पाच ते दहा रुपयांची घसरण झाली आहे. चांगल्या पावसामुळे उत्पादन वाढले आहे. त्यामुळे येत्या काळात ज्वारी आणखी स्वस्त होईल, असा व्यापाऱ्यांचा अंदाज आहे.

Tata Punch Car sale
टाटाच्या ‘या’ सर्वात स्वस्त SUV नं Wagon R, Dzire चं वर्चस्व संपवलं? झाली दणक्यात विक्री, मायलेज २६ किमी
Industrial production rate advanced 5.7 percent in February
औद्योगिक उत्पादन दर फेब्रुवारीमध्ये ५.७ टक्क्यांपुढे
wheat India wheat production estimated at 1120 lakh tonnes this year
यंदा गव्हाचे उच्चांकी उत्पादन? तापमान वाढीची झळ कमी; ११२० लाख टन उत्पादनाचा अंदाज
Xiaomi SU7 EV Launch
बाकी कंपन्यांची उडाली झोप, २४ तासांत धडाधड विकली गेली ‘ही’ इलेक्ट्रिक कार, किंमत…

२०१५मध्ये दुष्काळामुळे ज्वारीचे उत्पादन मोठय़ा प्रमाणात घटले होते. त्यामुळे गेल्या दीड वर्षांपासून ज्वारीच्या दरात वाढच होत होती. दोन वर्षांपूर्वी २२ ते २५ रुपये किलोने विकली जाणारी चांगल्या प्रतीची ज्वारी आतापर्यंत ३५ ते ४० रुपये किलोने विकली जात होती. मात्र, गेल्या वर्षी पावसाने हात दिल्याने यंदा ज्वारीत मोठी वाढ होण्याची शक्यता आहे. याचीच चाहूल लागल्याने एपीएमसीमधील ज्वारीच्या घाऊक दरात पाच ते दहा रुपयांची घसरण झाली आहे.

फेब्रुवारी आणि मार्च महिन्यात ज्वारीचा हंगाम सुरू होतो. या कालावधीत ज्वारीचे पीक काढले जाते व विक्रीसाठी बाजारपेठेत आणले जाते. वाशी बाजारात मार्च सुरू होताच ज्वारीची आवक वाढली आहे. सध्या रोज १२० टन ज्वारीची आवक होत आहे. सोपालपूर, नगर, जामखेड, लासूर, शिरपूर येथून ज्वारीची आवक होत असते. त्यापैकी सोलापूरची ज्वारी चांगल्या प्रतीची समजली जात असल्याने तिचे दर जास्त असतात. आणखी काही दिवसांत ज्वारी दोन ते तीन रुपये प्रतिकिलोने आणखी स्वस्त होईल, असे मत व्यापाऱ्यांनी व्यक्त केले आहे.