वाशीतील हावरे फँटासिया बिझनेस पार्क प्रिमायसेस सहकारी संस्थेतर्फे महावितरण  कार्यालयावर धडक मोर्चा काढण्यात आला. अनेक वर्षां पासून विद्युत मीटरची मागणी पूर्ण होत नसल्याने अखेर हा मोर्चा काढण्यात आला असा दावा गाळे मालकांनी केला. फँटासिया बिझनेस पार्क प्रिमायसेस सहकारी संस्थेतर्फे महावितरणकडे २४ मीटरची मागणी करण्यात येत असून महावितरण केवळ ३ मीटर देण्यास तयार आहे.

महावितरणच्या या आडमुठे धोरणामुळे मागील ३ वर्षांपासून संस्थेचा सेन्ट्रल एसीचा प्रकल्प रखडला आहे. याचा जाब विचारण्यासाठी गाळा मालकांनी आज महावितरण वर मोर्चा काढला. यावेळी महावितरण अधिकाऱ्यांनी सकारात्मक प्रतिसाद दिला नसल्याने येत्या काही दिवसात अधिक तीव्र आंदोलन करण्याचा इशारा संस्थेचा अध्यक्ष – किरण पैलवान यांनी दिला.

Citizens object to concreting works at unnecessary places in navi mumbai
नको तेथे काँक्रीट रिते! अनावश्यक ठिकाणी काँक्रीटीकरणाच्या कामांना नागरिकांचा आक्षेप, शहरभर वाहतूककोंडी
The Capital Markets Regulatory Authority imposed a fine of Rs 12 crore on Rabindra Bharti Educational Institute in an interim order
वित्तरंजन: हजार टक्क्यांच्या परताव्याचे आमिष
Pune Rainwater Harvesting Project lead by retired colonel shashikant Dallvi
गोष्ट असामान्यांची Video: पुण्यातील निवृत्त कर्नल शशिकांत दळवींचं ‘मिशन पाणी वाचवा!’
pune metro station marathi news, pune metro marathi news
पुणे: स्थानकांच्या नावातून मेट्रो मालामाल! वर्षाला कोट्यवधींची कमाई; जाणून घ्या महामेट्रोचा फंडा