नवी मुंबई: स्वस्त बाळगण्यास सोपे असलेले एम डी अर्थात मेफेड्रॉन या अमली पदार्थाची लोकप्रियता वाढत असल्याने विक्री मोठ्या प्रमाणावर होत आहे. असाच विक्रीसाठी आणलेला  मोठा साठा नवी मुंबई अमली पदार्थ विरोधी पथकाने जप्त केला असून या प्रकरणी एका आरोपीला अटक करण्यात आली आहे. 

शामसुददीन अब्दुल कादर एटिंगल, (वय २९ वर्ष ) असे अटक आरोपीचे नाव आहे. नवी मुंबईतील एपीएमसी भागात अमली पदार्थाचा मोठा व्यवहार होणार असल्याची माहिती अंमली पदार्थ विरोधी कक्षाला मिळाली होती. त्या अनुषंगाने गुन्हे शाखा साहाय्यक  पोलीस आयुक्त गजानन राठोड, यांच्या मार्गदर्शनाखाली अंमली पदार्थ विरोधी कक्षाचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक निरज चौधरी, साहाय्यक पोलीस निरीक्षक निलेश धुमाळ, पोलीस उपनिरीक्षक कुलदिप मोरे, पोलीस हवालदार रमेश तायडे,  बनकर,  लोखंडे, आदींनी  सतरा प्लाझा जवळ, सेक्टर १९ सी, वाशी येथे सापळा लावला. यात संशयित असलेला शामसुद्दी  दिसताच त्याला ताब्यात घेतले व पोलीस ठाण्यात आणले. त्याची झडती घेतली असता त्याच्याकडे  १ किलो ११ ग्रॅम वजनाचा “एमडी (मेफेड्रॉन) “हा अंमली पदार्थ मिळून आला. त्याचे मूल्य १ कोटी१ लाख १० हजार आहे. 

हेही वाचा… उरण-पनवेल मार्गावरून एसटी सुरू करण्यासाठी बोकडवीरा, फुंडे, डोंगरी व पाणजे गावातील महिलांचे धरणे आंदोलन

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

अटक आरोपी हा गोरेगाव येथील मोतीनगर येथे राहणारा असून मोबाईलचे सुटे भाग विक्री करण्याचा त्याचा व्यवसाय आहे. त्याने हा अंमली पदार्थ कोठून आणला आणि कोणाला देण्यास आणला याचा तपास सुरू आहे. अशी माहिती वरिष्ठ पोलीस निरीक्षक नीरज चौधरी यांनी दिली.