लोकसत्ता टीम

नवी मुंबई: वनविभाग प्राणवायू साठी महत्त्वाचे आहे, तसेच कुटुंबाच्या आनंदासाठी सांस्कृतिक क्षेत्र महत्वाचं आहे. सांस्कृतिक क्षेत्रात जगातलं सर्वात महागडे कॉस्मेटिक असून चेहऱ्यावर हास्य आणि आनंद देण्याची ताकद या कलावंतांमध्ये आहे. जे पॅरिस आणि लंडन पेक्षा ही महागडे आहे. सांस्कृतिक विभाग नेहमीच कलावंतांसोबत राहील असा विश्वास देतो असे प्रतिपादन सांस्कृतिक मंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी व्यक्त केले. महाराष्ट्र शासनाच्या सांस्कृतिक विभागाच्यावतीने वाशीत ढोलकीफड तमाशा महोत्सव आयोजित करण्यात आलेला आहे. यावेळी विठाबाई नारायणगाव पुरस्काराचे वितरण समारंभ पार पडला त्यावेळी ते बोलत होते.

former Vice President M Venkaiah Naidu criticises freebies trend
पक्ष बदलला की जुन्या नेत्यांना शिव्या देणं चुकीचं: माजी उपराष्ट्रपती व्यंकय्या नायडूंची टीका
sanjay ruat and shrikant shinde
श्रीकांत शिंदे फाऊंडेशनमध्ये गैरव्यवहार? संजय राऊतांची थेट मोदींकडे तक्रार; म्हणाले, “बिदागीच्या रकमा…”
kanyadan, valid marriage,
वैध लग्नाकरता कन्यादान नाही, तर सप्तपदी महत्त्वाची !
Why frequent allegations of political infiltration in Sahitya Akademi
विश्लेषण: साहित्य अकादमीत राजकीय घुसखोरीचा आरोप वारंवार का?

दि. १५ मार्च ते १९ मार्चदरम्यान वाशी येथे ढोलकीफड तमाशा महोत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे. करोनाच्या दोन वर्षांनंतर शासनाकडून हा तमाशा महोत्सव होत आहे. या महोत्सवाच्या दुसऱ्या दिवशी विठाबाई नारायणगाव पुरस्काराचे वितरण समारंभ घेण्यात आला. कार्यक्रम सुरू असताना अचानक पडलेल्या पावसाने कार्यक्रमात व्यत्यय आला. यादरम्यान पावसाने विश्रांती घेताच हा पुरस्कार सोहळा घेण्यात आला. यावेळी सांस्कृतिक मंत्री सुधीर मुनगंटीवार, आमदार मंदा म्हात्रे, अभिनेत्री प्रिया बेर्डे उपस्थित होते. यावेळी मंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी मनोगत व्यक्त केले की, सांस्कृतिक क्षेत्रात सेवा देणाऱ्या सर्व कलापूजकांचा आम्ही सत्कार करतो, त्यांच्या समस्या सोडवण्यासाठी निर्णय घेतो. त हयात पेन्शन देतो, ज्यांना राज्यस्तरीय पुरस्कार मिळाले आहे , त्यांना ‘क’वर्गाची पेन्शन न देता ‘अ’ वर्गाची पेन्शन देण्यात येईल. लवकरच त्याबाबत अध्यादेश काढण्यात येणार आहे.

आणखी वाचा- नवी मुंबई : १ महिन्यात ७० टक्के परताव्याचे आमिष; ५ लाखांचा फटका

महाराष्ट्र कलावंतांकरिता वेब पोर्टल सुरू करण्यात येणार आहे. पोर्टलच्या माध्यमातून महाराष्ट्र सर्व कलावंतांना दीड मिनिटांचा व्हिडीओ, त्यांच्या बद्दलची महिती त्यावर देता येणार आहे. महाराष्ट्र स्टोरी टेल उपक्रम राबविण्यात येणार आहे. जुलै मध्ये सांस्कृतिक घोरण तयार होईल त्यासाठी १० उप समित्या बनविण्यात आल्या आहेत . सांस्कृतिक धोरण करताना हे धोरण केवळ कपाटात बंद करण्यासाठी तयार करण्यात आलेले पुस्तकं नसावं या धोरणातअंतर्गत आखण्यात आलेले नियोजन त्याची अंमलबजावणी कधी करणार ? या वेळेची निश्चिती हवी, असे मत व्यक्त केले. यावेळी सन २०१८-१९ साठी गुलाबबाई संगमनेकर, २०१९-२० साठी अतांबर शिरढोणकर आणि २०२०-२१ साठी संध्या रमेश माने यांना
विठाबाई नारायणगाव पुरस्कार ,सन्मान चिन्ह आणि ५ लाखाचा धनादेश देऊन सन्मानित करण्यात आले.

मनोरंजन सृष्टीच्या खूप मागण्या आहेत. सांस्कृतिक मंत्री उत्तम पद्धतीने हाताळत आहेत. त्यांनी विविध योजना आणल्या आहेत, मला विश्वास आहे की, नक्कीच सर्व योजना पूर्ण करतील. मनोरंजन सृष्टीला राजकीय पाठींबा मिळत आहे. त्या अनुषंगाने पाऊलं देखील पडत आहेत. कलावंतांना सन्मानाची, प्रशंसाची गरज असते. कलाकार हा खूप मनस्वी आहे.
-प्रिया बेर्डे,
प्रदेशाध्यक्ष, भारतीय जनता पक्षातची सांस्कृतिक आघाडी