नवी मुंबई: सट्टा बाजार अर्थात शेअर मार्केटमध्ये भरघोस उत्पन्न मिळते, फक्त योग्य ठिकाणी गुतंवणूक आवश्यक, अशा भूलथापा मारत अनेक दलाल फसवणूक करतात. असाच प्रकार नवी मुंबईत घडला असून व्हॉट्सअ‍ॅपवर संपर्क करून पैसे गुंतवा, असे आवाहन करीत एका महिन्यात ७० टक्के परतावा मिळतो, असे आमिष दाखवण्यात आले होते. या आमिषाला ऐरोली येथे राहणारे शुभम जाधव बळी पडले. 

१ नोव्हेंबरला त्यांच्या मोबाईलवर पैसे गुंतवा एक महिन्यात ७० टक्के परतावा मिळण्याची हमी, अशा आशयाचा संदेश इंग्रजीतून आला. या बाबत चौकशी केली असता त्या व्यक्तीने स्वतःचे नाव मिलन जैन असे सांगत स्वतःचे आधारकार्ड, पॅनकार्ड, यूपीआय आयडी, बँक खाते माहिती, जीएसटी क्रमांक जाधव यांच्या मोबाईलवर पाठवले. त्याने स्वतःच्या कंपनीचे नाव ट्रेडिंग वुईथ प्रो असेही सांगितले. मात्र एक महिन्यात ७० टक्के परतावा मिळेल याची हमी काय? अशी विचारणा केली असता त्याने त्याच्या इतर काही खातेदारांची माहिती, तसेच त्यांनी ट्रेडिंग वुईथ प्रो कंपनीत पैसे गुतवल्याच्या पावत्या व्हॉट्सअ‍ॅपवर पाठवल्या. विशेष म्हणजे, महिन्यात ७० टक्के परतावा या हिशोबाने दर सात दिवसांत पैसे मिळतील, असा विश्वास दाखवला. त्यामुळे जाधव यांनी चार टप्प्यात एकूण ५ लाख रुपयांची गुंतवणूक केली.

n m joshi marg bdd chawl redevelopment
ना. म. जोशी मार्ग बीडीडी चाळ पुनर्विकास; दोन वर्षांत १२६० घरांचा ताबा देण्याचे म्हाडाचे आश्वासन
Mumbai, Two arrested,
मुंबई : वृद्धाचे सोने लुटणाऱ्या दोघांना अटक
Bhandara District Swelters as Temperature Hits 43 Degrees Celsius Early in April
उन्हाच्या झळा : भंडाऱ्याचा पारा ४३ अंशावर , एप्रिल महिन्यात प्रथमच एवढे तापमान
Bail
अयोग्य स्पर्श केल्याने महिलेकडून एकाची हत्या; तीन वर्षांचा कारावास भोगल्यानंतर कोर्ट म्हणतं, “स्वसंरक्षणार्थ…”

हेही वाचा – नवी मुंबई : बांधकाम व्यावसायिकाची दिवसाढवळ्या गोळ्या झाडून हत्या

हेही वाचा – उरणमध्ये बरसल्या अवेळी सरी; दोन मिनिटांच्या सरींनी नागरिकांची तारांबळ

सात दिवसांनी फोन केल्यावर सुरवातीला जैन याने फोन उचलला नाही, मात्र नंतर फोन करून काही समस्या असल्याने १० दिवसांत पैसे मिळतील असे सांगितले. मात्र ते पैसे अद्याप मिळाले नाहीत, शिवाय संपर्कही सध्या होत नसल्याने जाधव हे जैन याने सांगितलेल्या राजस्थान येथील कुडाळगंज येथील पत्त्यावर गेले. मात्र तो आठ महिन्यांपूर्वी जयपूरला जातो म्हणून गेला असे स्थानिकांनी सांगितले. तसेच त्याने अशाच पद्धतीने आमिष दाखवून अनेकांची फसनवुक केली असल्याचीही माहिती समोर आली. शेवटी आपली फसगत झाल्याचे जाधव यांच्या लक्षात आले आणि त्यांनी रबाळे पोलीस ठाण्यात जैन विरोधात दिलेल्या तक्रारीवरून पोलिसांनी गुन्हा नोंद केला.