पनवेल :  सिडको महामंडळाने नूकतीच बामनडोंगरी येथील दूकानांसाठी ऑनलाईन बोलीपद्धतीने लिलाव आयोजित केला होता. मात्र लिलाव अंतिम टप्यात असताना सिडकोचे संकेतस्थळावर काहीच हालचाली होत नसल्याने गुंतवणूकदारांनी संताप व्यक्त करत लिलावात काही काळंबेरं असल्याचा आरोप केला आहे. याबाबत सिडको मंडळाने स्पष्टीकरण देऊन काही काळांसाठी तांत्रिक अडचणी असल्याने ही अडचण झाल्याचे स्पष्टीकरण दिले आहे. यानंतर गुंतवणूकदारांनी बामनडोंगरी येथील दूकानांचा लिलावाचा कार्यक्रम पुन्हा आयोजित करावा अशी मागणी समाजमाध्यमांवर केली आहे. सिडको मंडळातील महागृहनिर्माणाची आणि दूकानांची सोडत ऑनलाईन पद्धतीने होते.

हेही वाचा >>> मोठ्या आवाजात भांडणाऱ्याकडे पाहिल्याने कामोठ्यात डॉक्टराला मारहाण

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

दक्षिण नवी मुंबईत विक्रीसाठी अजूनही सिडको महामंडळाला वाव असल्याने या परिसरातील घर, भूखंड आणि दूकाने यांच्या लिलावातून मिळणा-या उत्पन्नामुळे सिडकोच्या तिजोरीत भरभराट आहे. सिडको मंडळाने यापूर्वीही भूखंड लिलाव आणि महागृहनिर्माणातील घर व दूकानांच्या सोडतीची प्रक्रिया पारदर्शक असल्याचा दावा केला आहे. नूकत्याच घडलेल्या बामणडोंगरी येथील दूकानांच्या लिलावामध्ये सहभागी झालेल्या गुंतवणूकदारांनी सिडकोच्या कार्यप्रणालीविषयी साशंकता व्यक्त करत बोली लावताना एेनवेळेला बंद पडलेल्या ऑनलाईनपद्धतीमुळे लिलावात सामिल होता आले नसल्याचा आरोप करत ही प्रक्रिया राबविणा-या कंपनीला काळ्या यादीत टाकावे अशी मागणी समाजमाध्यमांवरुन केली आहे. तसेच हा लिलाव पुन्हा आयोजित करावा असेही अनेक गुंतवणूकदारांनी मागणी केली आहे. याबाबत सिडको महामंडळाच्या जनंसपर्क अधिकारी प्रिया रातांबे यांनी काही काळासाठी तांत्रिक अडचण झाली होती असे स्पष्टीकरण देताना या घटनेनंतर सिडको मंडळ लवकरच ही अडचण का निर्माण झाली याची तपासणी करणार असल्याचे रातांबे यांनी स्पष्ट केले आहे.