Premium

नवी मुंबई: फळ बाजारातील बहुउद्देशीय सुविधा इमारत ठरतेय बिनकामी

वाशीतील मुंबई कृषी उत्त्पन्न बाजार समिती मधील घाऊक फळ बाजारात असलेल्या बहुउद्देशीय सुविधाइमारतीचे बांधकाम पूर्ण झाले आहे .

mumbai-market-committee-
फळ बाजारातील बहुउद्देशीय सुविधा इमारत ठरतेय बिनकामी

वाशीतील मुंबई कृषी उत्त्पन्न बाजार समिती मधील घाऊक फळ बाजारात असलेल्या बहुउद्देशीय सुविधाइमारतीचे बांधकाम पूर्ण झाले आहे .मात्र त्याला अद्याप ओसी मिळाली नाही. तसेच ठेकेदार आणि अभियंता यांच्या वादामुळे रखडली आहे. याठिकाणी दुमजली पार्किंग व्यवस्था असून व्यवसायिक गाळे आहेत. ही इमारत सुरू केली तर पार्किंग आणि व्यावसायिक गाळे वापरता येतील. मात्र अद्याप खुली करण्यात आली नाही असे मत व्यापाऱ्यांमधून व्यक्त होत आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

फळ बाजारात ७३२ मोठे गाळे तर २९७ लहान गाळे आहेत. मात्र वाढता वापार पाहता गाळ्यांची ,वाहन पार्किंग ची समस्या आहे. तसेच बाजार आवारात इतर कामासाठी लागणारी कार्यालायिन जागा अपुरी पडत असल्याने बाजार समितीने आवारातच बहुउद्देशीय इमारत उभारण्याचे काम हाती घेतले होते. मार्च २०१२ मध्ये या बहुउद्देशीय इमारतीचे बांधकाम सुरू करण्यात आले होते. हे काम जून २०१७ अखेर हे काम पूर्ण होणे अपेक्षित होते. मात्र ठेकेदार आणि अभियंता यांच्या वादामुळे हे काम रखडले होते तसेच अद्याप ओसी मिळाली नसल्याने खुले करण्यात आली नाही.

हेही वाचा >>>नवी मुंबई: आकर्षक वंडर्स पार्कचा प्रवेश महागला, १२ वर्षापर्यंत ४० रुपये तिकीट, तर वरील सर्वांना….

सहा मजली ईमारत उभरण्यात आली असून यामध्ये दोन मजले पार्किंग तर तळ मजल्यावर ३४ गाळे आणि लिलावगृह उभारण्यात आले आहे . तसेच ८४ व्यवसायिक गाळे आहेत. बिगरगाळा धारक व्यापाऱ्यांना , तसेच खुला व्यापार करणाऱ्यांना जागा उपलब्ध करून देण्यात येणार होती. मात्र तळमजल्यावर चुकीचं बांधकाम केल्याने पावसाळ्यात पाणी साचते त्यामुळे त्याठिकाणी व्यापाऱ्यांनी जाण्यास मनाई केली आहे. आजही याला ओसी मिळाली नसून, बांधकाम पूर्ण होऊन देखील वापरात नसल्याने ही इमारत बिनकामी ठरत आहे. याठिकाणी व्यवसायिक गाळे , पार्किंगमध्ये १५०-१७५ वाहने पार्क करण्याची सुविधा उपलब्ध करण्यात आली असून फळ बाजारातील वाहने पार्किंगची समस्या यामुळे दूर होईल. त्यामुळे ही इमारतीत वापरासाठी खुली करावी असे मत व्यक्त होत आहे.

फळ बाजारातील बहुउद्देशीय सुविधा ईमारतीचे बांधकाम पूर्ण झाले आहे. सिडकोकडे भाडेपट्टा करार भरायचा आहे. तो भरल्यानंतर ओसी मार्ग मोकळा होईल. मात्र पुन्हा संचालक मंडळ बैठका होत नसल्याने धोरणात्मक निर्णय रेंगाळत आहेत.- सुरेश मोहाडे, कार्यकारी अभियंता, एपीएमसी

Navimumbai News (नवी मुंबई न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

First published on: 30-05-2023 at 20:02 IST
Next Story
नवी मुंबई: आकर्षक वंडर्स पार्कचा प्रवेश महागला, १२ वर्षापर्यंत ४० रुपये तिकीट, तर वरील सर्वांना….