The Navi Mumbai Municipal Corporation has issued a notice for unauthorized constructions in the building of Tilak Education School in Seawoods | Loksatta

सीवूड्समधील टिळक एज्युकेशन शाळेच्या इमारतीत अनधिकृत बांधकाम; नवी मुंबई महापालिकेने बजावली नोटीस

सीवूड्स सेक्टर २५ येथील टिळक एज्युकेशन शाळेची इमारत असून या ठिकाणी करण्यात आलेल्या कामाबाबत पालिकेने शाळेला नोटीस बजावली आहे.

सीवूड्समधील टिळक एज्युकेशन शाळेच्या इमारतीत अनधिकृत बांधकाम; नवी मुंबई महापालिकेने बजावली नोटीस
सीवूड्समधील टिळक एज्युकेशन शाळेची इमारत

नवी मुंबई शहरात बेलापूरपासून ते दिघ्यापर्यंत अनेक शैक्षणिक संस्था असून सिडकोने शाळांसाठी दिलेल्या भूखंडावर विविध संस्थांच्या शाळा सुरु आहेत परंतू पालिकेच्या दुर्लक्षपणामुळे शाळांमध्येही बेकायदा बांधकामे केली जात आहे. सीवूड्स सेक्टर २५ येथील टिळक एज्युकेशन शाळेला नवी मुंबई महापालिकेने बेकायदा बांधकामाबाबत नोटीस बजावली आहे.त्यामुळे शालेय इमारतींमध्ये बांधकामाबाबतच्या नियमांची पायपल्ली केली जात असल्याचे चित्र आहे.

हेही वाचा- यंदा मलावी हापूसच्या उत्पादनात घट; एपीएमसी बाजारात आवक निम्यावर

सीवूड्स सेक्टर २५ येथील शाळेची इमारत असून या ठिकाणी करण्यात आलेल्या कामाबाबत पालिकेने शाळेला नोटीस बजावली आहे. नवी मुंबई शहरात मोठ्या प्रमाणात मूळ गावठाणे तसेच शहरी भागातही मोठ्या प्रमाणात बेकायदा बांधकामे केली जात असून त्याकडे पालिका दुर्लक्ष करते. त्यामुळे या बेकायदा काम करणाऱ्यांचे चांगलेच फोफावते. त्यामुळे शहरात बेलापूर ते दिघा पर्यंत सुरु असलेल्या बेकायदा बांधकामांना पालिका अधिकारीच व त्यांचा अतिक्रमण विभागच जबाबदार असल्याचा आरोप करण्यात येत आहेत. सीवूड्स येथील टिळक शाळेमध्ये शालेय इमारतीच्या देखभाल दुरुस्तीसह इतर कामे करण्यात आली असून या शाळेने इमारतीच्या टेरेसवर विनापरवानगी अनधिकृतपणे आरसीसी कॉलमवर स्ट्रक्चरल स्टीलच्यावर पत्राशेड बसवण्यात आले आहे. त्यामुळे शाळेला पालिकेच्या अतिक्रमण विभागाने नोटीस बजावल्यापासून ३२ दिवसाच्या आत हे बेकायदा बांधकाम निष्कसित करण्यात यावे अन्यथा नियोजन प्राधिकरण केलेले अनधिकृत बांधकाम निष्कसित करेल व त्यासाठी येणारा सर्व प्रकारचा खर्च वसूल करण्यात येईल असे पत्र पालिकेने शाळेला दिले आहे.

हेही वाचा- नवी मुंबई : नववर्षात सायन पनवेल महामार्ग एलईडीच्या दिव्यांनी उजळणार; महामार्गावरील ६२८ बंद दिव्यांचीही दुरुस्ती

शहरात नवी मुंबईची निर्मिती झाल्यानंतर नियोजन प्राधिकरण असलेल्या सिडकोने शहरात विविध संस्थाना शाळांसाठी तसेच मैदानांसाठी सवलतीच्या दरात भूखंड दिले आहेत. सिडको, महापालिका यांच्याकडून मिळालेल्या जागांवर संबंधित विविध शाळा, संस्था यांनी नियमांची पायमल्ली केल्याने संबंधित प्राधिकरणांनी कारवाई करण्यात येतात. पालिकेनेही टिळक शाळेला अनधिकृत बांधकामाबाबत बेलापूर विभाग कार्यालयामार्फत शाळेला २४ नोव्हेबर रोजी पत्रव्यवहार केला आहे. त्यामुळे शहरातील विविध शाळांच्या इमारतीमध्ये करण्यात आलेल्या बेकायदा बांधकामांचा व सिडको व संस्थांच्यामद्ये झालेल्या करारनाम्याबाबतही अनेक प्रश्न आगामी काळात निर्माण होणार असल्याची शक्यता निर्माण होणार आहे असे चित्र आहे.

हेही वाचा- नवी मुंबई: लिडार सर्वेक्षण पुर्ण न झाल्याने पालिकेचे मालमत्ता कर वसुलीचे लक्ष ८०० कोटींवरुन ६०० कोटींवरच अडणार

सीवूड्स येथील टिळक एज्युकेशन संस्थेला त्यांनी शाळेच्या इमारतीत केलेल्या अनधिकृत कामाबाबत नोटीस बजावण्यात आली आहे.संबंधित संस्थेच्यावतीने करण्यात आलेल्या बेकायदा बांधकामाबाबत नोटीस बजावण्यात आली असल्याची माहिती बेलापूरचे विभाग अधिकारी मिताली संचेती यांनी दिली.

मराठीतील सर्व नवी मुंबई ( Navimumbai ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

First published on: 08-12-2022 at 19:33 IST
Next Story
यंदा मलावी हापूसच्या उत्पादनात घट; एपीएमसी बाजारात आवक निम्यावर