नवी मुंबई: एपीएमसीमध्ये लिंबाची आवक कमी झाल्यामुळे लिंबाच्या दरात वाढ झालेली आहे. किरकोळीत ३ रुपयांना मिळणारे लिंबू आता ५ रुपयांना मिळत आहेत. घाऊक बाजारात लिंबाचे दर दुप्पटीने वाढल्याने किरकोळ बाजारात एक नग लिंबू पाच रुपये दराने विकले जात आहेत. पुढील कालावधीत दर आणखीन वधारण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे. गेल्या काही दिवसांपासून वातावरण बदल होत आहेत. मध्येच उन-पावसाचा खेळ सुरू आहे. कधी ढगाळ वातावरण तर कधी कडक उन्हाळा जाणवत आहे. अशा वातावरणाने हवेतील उष्मा देखील वाढत आहे. शीतपेये, लिंबूपाणी पिण्याकडे अनेकांचा कल दिसून येत आहे. मात्र बाजारात सध्या लिंबाची आवक घटल्याने दर वाढण्यास सुरुवात झाली आहे. हेही वाचा. उरणकरांची एप्रिल २०२४ पर्यंतची पाणी चिंता मिटली, मात्र पाणी कपात कायम रहाणार, कारण काय? मुंबई कृषी उत्त्पन्न बाजार समितीमधील घाऊक भाजीपाला बाजारात सध्या राज्यातून जुन्नर, नगर मधून लिंबाची आवक होत आहेत. मंगळवारी बाजारात लिंबाच्या १० गाड्या दाखल झाल्या असून १७०क्विंटल आवक झाली आहे. शाकाहारी जेवण असो वा मांसाहारी, रोजच्या जेवणात लिंबांची आवश्यकता भासतेच. उन्हाचा तडाखा वाढल्याने लिंबू सरबताची मागणी ही आहे. बाजारात सध्या आकाराने लहान लिंबाची आवक अधिक होत आहे. आकाराने मोठे असलेल्या लिंबाचे प्रमाण कमी आहे. हेही वाचा. अखेर चिरनेर पुलाचे काम सुरु होणार; वाहतूक मार्ग बदल आधी घाऊक बाजारात ८००नग लिंबूची गोणी ५००-६००रुपयांनी विक्री होत होती, मात्र आता दरात दुप्पटीने वाढ झाली असून १२००रुपयांनी विक्री होत आहे. घाऊक मध्ये दरवाढ झाल्याने किरकोळ बाजारात ही लिंबू भाव खात आहे. आधी ५ रुपयांना ३ नग उपलब्ध होते मात्र आता लिंबाचा एक नग ५ रुपयांना विक्री होत आहे. पुढील कालावधीत दर आणखीन वधरण्याची शक्यता आहे असे मत व्यापारी कैलास तांजणे यांनी व्यक्त केले आहे.