लोकसत्ता प्रतिनिधी

उरण : उरण- पनवेल या प्रचंड रहदारीच्या मार्गावर गेल्या अनेक दिवसांपासून खड्डे पडले होते. याचा त्रास प्रवाशांना होत होता. बोकडवीरा उड्डाणपुलाखालील खड्डयांसंदर्भात ‘लोकसत्ता’ मध्ये ८ एप्रिल रोजी वृत्त प्रसिद्ध झाले होते. याची दखल घेत गुरुवारी सार्वजनिक बांधकाम विभागाकडून हे खड्डे तातडीने भरण्यात आले आहेत. त्यामुळे या मार्गावरून ये जा करणाऱ्या प्रवाशांनी आनंद व्यक्त केला आहे.

या खड्ड्यात पावसानंतर धूळ निर्माण झाल्याने धुळीचा सामना करीत प्रवास करावा लागत होता. या धुळीचा सामना गणेशोत्सव, दिपावली या सणात ही येथील नागरिकांना करावा लागत होता. यामुळे नागरिकांनी सिडको विरोधात संताप व्यक्त केला होता. याचे वृत्त लोकसत्ताने दिले. नागरिकांची ही समस्या वारंवार मांडल्याने अखेरीस सिडकोच्या वतीने या मार्गाच्या दुरुस्तीचे काम हाती घेण्यात आले. या मार्गावर खड्डे भरून डांबरीकरण करण्यात आल्याने नागरिकांना दिलासा मिळाला आहे.

‘या खड्ड्यांमुळे आम्हाला त्रास होत होता. याचे वृत्त दिल्याने मार्गाच्या खड्डडे दुरुस्तीचे काम करण्यात आले आहे. या बद्दल लोकसत्ता चे आभारी आहोत. जनतेच्या समस्यांना स्थान दिल्याने ही समस्या दूर झाली,’ अशी प्रतिक्रिया प्रवासी रवींद्र पाटील यांनी दिली.

समाजमाध्यमातून आभार

उरण पनवेल मार्गावरील बोकडवीरा उड्डाणपुलाच्याखालील खड्डे आणि त्यामुळे असलेला संभाव्य धोका यासंबंधी लोकसत्ताने दिलेल्या वृत्तामुळे हे खड्डे सार्वजनिक बांधकाम विभागाने भरले आहेत. याचे छायाचित्र समाजमाध्यमातून प्रसिद्ध झाले असून उरणच्या नागरिकांना मिळालेल्या दिलासा मिळाल्याबद्दल ‘लोकसत्ता’चे आभार मानले जात आहेत.