scorecardresearch

दिवाळीच्या तोंडावर चोरट्यांची तयारी, दुकानातून ममहागड्या साड्यांची चोरी

चोरट्यांनी शो रूम मधील ३ लाख ३९ हजार ५९५ किमतीच्या २३१ साड्यांची चोरी केली.

दिवाळीच्या तोंडावर चोरट्यांची तयारी, दुकानातून ममहागड्या साड्यांची चोरी
( संग्रहित छायचित्र )

नवी मुंबई : नवी मुंबईतील कोपरखैरणे भागातील एका साडीच्या दुकानात चोरट्यांनी महागड्या साड्यांची चोरी केली आहे. साड्या चोरताना ज्या पद्धतीने निवड करण्यात आली ते पाहून साड्यांची चोरट्यांना माहिती असावी असा अंदाज व्यक्त करण्यात येत आहे.कोपरखैरणे सेक्टर १६ मध्ये शिवम साडी सेंटर नावाचे दुकान आहे. २ तारखेला अपरात्री दुकानाच्या शौचालयातील खिडकीच्या काचा काढून काही चोरट्यांनी आत प्रवेश केला. शो रूम मधील ३ लाख ३९ हजार ५९५ किमतीच्या २३१ साड्या चोरटे घेऊन गेले.

चोरी केलेल्या साड्यांमध्ये  २२ शालू- १ लाख ५८ हजार ९५०, रुपये काठपदर ३५ साड्या ३३ हजार २५० रुपये , पेशवाई ८ साड्या १८ हजार ८० रुपये, ४५ पैठणी ४२ हजार ९७५ रुपये, ९ बेंगलोर सिल्क- १२ हजार २४० रुपये , ६५ नऊवारी साड्या ४२ हजार २५० रुपये, २७ नऊवार डबल  घोडा १४ हजार ८५०, २० ब्रकेट १७ हजार रुपये समावेश होता.  याच ठिकाणी स्वस्तातील साड्याही उपलब्ध होत्या मात्र चोरट्यांनी त्याला हातही लावला नाही.अशी माहिती कोपरखैरणे पोलिसांनी दिली.

मराठीतील सर्व नवी मुंबई ( Navimumbai ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

संबंधित बातम्या