नवी मुंबई : नवी मुंबईतील एपीएमसी मार्केट मध्ये पार्क केलेल्या ट्रकला अचानक आग लागली. काही क्षणात आगीचा भडका उडाला आणि ट्रक आगीच्या भक्ष्यस्थानी पडली. ही घटना कळताच वाशी अग्निशमन दल घटनास्थळी पोहचले मात्र तो पर्यंत पूर्ण पेट घेतला होता. एक तासांच्या प्रयत्नांनी आगीवर नियंत्रण मिळवण्यात यश आले.

आणखी वाचा-आज ट्रान्स-हार्बर मार्गावर मेगा ब्लॉक, मध्य व हार्बर मार्गावर मेगा ब्लॉक नाही

Tree cutting branches on the road negligence of Navi Mumbai Municipal Corporation
नवी मुंबई : वृक्षछाटणीच्या फांद्या रस्त्यावर, नवी मुंबई महापालिकेचे दुर्लक्ष; प्रवासी, नागरिक यांना अडथळा
mumbai, Two Workers Die, One Critical, Falling into Toilet Tank, malad, pimpripada, Construction Site, marathi news, malad news, mumbai news, workers fell tank in malad
मालाडमध्ये शौचालयाच्या टाकीत उतरलेल्या दोन कामगारांचा मृत्यू, एकाची प्रकृती चिंताजनक
Shanthappa Jademmanavar PSI
आईच्या मजुरीचं पांग फेडलंस! UPSC मध्ये सात वेळा नापास झालेल्या पोलीस उपनिरीक्षकाची यशाला गवसणी
dombivli ganesh nagar marathi news, dombivli concrete road broken marathi news
डोंबिवली: पंधरा दिवसांपूर्वी तयार केलेल्या गणेशनगर मधील काँक्रीट रस्त्याची तोडफोड, नागरिकांमध्ये तीव्र संताप

रविवारी अपरात्री १२:४५ वाजता एपीएमसीतील (कृषी उत्पन्न बाजार समिती) दाणा मार्केट मध्ये पार्क केलेल्या एका ट्रकच्या कॅबिन मध्ये अचानक आग लागली. आगीने काही मिनिटात रौद्र रूप धारण करीत पूर्ण कॅबिन व्यापली. याबाबत माहिती मिळताच वाशी अग्निशमन पथक घटनास्थळी आले. त्यावेळी ट्रकची आग विझवण्या सोबतच आग इतरत्र पसरू नये म्हणून काळजी घेत ट्रकची आग विझवणे अशी कसरत करीत एक सव्वा तासाच्या प्रयत्नांनी आगीवर नियंत्रण मिळवण्यात यश आले. त्यानंतर सुमारे एक तास कुलिंगचे काम सुरू होते.

सुदैवाने आगीत कोणी जखमी झाले नाही. आगीचे नेमके कारण मात्र स्पष्ट नाही. अशी माहिती वाशी अग्निशमन केंद्राने दिली.