नवी मुंबईतून एक चोरीची घटना समोर आली आहे. प्रख्यात तनिष्क ज्वेलर्समधून दोन महिलांनी चोरी केली होती. त्या दोघींना अटक करण्यात पोलिसांनी यश आलंय. या दोघींनी सोन्याच्या बांगड्या चोरी केल्या होत्या, अशी माहिती पोलिसांनी दिली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, नवी मुंबईतील वाशी सेक्टर १७ येथील तनिष्क ज्वेलर्स येथे दोन महिला सोन्याच्या बांगड्या खरेदी करण्यासाठी आल्या होत्या. तनिष्क ज्वेलर्समधील सेल्स गर्लने दोघींना बांगड्या दाखवल्या, मात्र त्या महिलांनी कोणालाही न कळू देता लपवून २ लाख २१ हजार रुपये किंमतीच्या २ बांगड्या चोरून नेल्या आहेत.
लोकलमध्ये मोबाईल आणि पैसे चोरणाऱ्या दोघांना पोलिसांनी ठोकल्या बेड्या
या दोन बांगड्या दुकानातील कामगारांना सापडत नव्हत्या, त्यामुळे शोध घेण्यात आला. दुकानदाराने सीसीटीव्ही फुटेज चेक केलं असता त्या दोघींनी या बांगड्या चोरल्याची बाब समोर आली. यासंबंधी दुकानदाराने वाशी पोलीस स्थानकात तक्रार दाखल केली होती. त्यानंतर पोलिसांनी सीसीटीव्हीच्या मदतीने तपास करत तांत्रिक तपासाद्वारे १० दिवसांच्या आत पोलिसांनी दोघींना अटक केली आहे.