नवी मुंबई :नुकतेच नूतनीकरण होऊन तीनच दिवसापूर्वी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते उद्धाटन नवी मुंबई मनपाचे ड्रीम प्रोजेक्ट असलेले नेरुळ येथील वंडरपार्क मधील पाळणा अपघातात पाच जण जखमी झाले आहेत. जखमींना नजीकच्या अपोलो रुग्णालयात दाखल करण्यात आले आहेत.
नेरुळ येथील वंडर पार्क नूतनीकरण साठी सुमारे ३ वर्ष बंद होते त्या दरम्यान लेझर शो वैगरे काही नवीन उपक्रम घेत नव्याने सुरू करण्यात आले होते.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

उद्घाटनाच्या दुसऱ्याच दिवशी बंद पडल्याने त्यावर सर्व स्तरातून टिका झाली होती. या टिके नंतर कसे बसे सुरू होताच तिसऱ्याच दिवशी म्हणजे आज(शनिवारी) पाळ ण्याचा (जॉय अँब्रेला व्हील ) झालेल्या अपघातात पाच मुले जखमी झाले असून एक गंभीर जखमी आहे. त्यांना अपोलो रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.संजय देसाई ( शहर अभियंता) पाळण्याच्या ऑपरेटर कडून अयोग्य कमांड दिली गेल्याने त्याचा वेग अचानक वाढून हा अपघात झाला आहे. यात जखमींवर उपचार सुरू आहेत. या घटनेची दखल घेत योग्य ती कारवाई केली जाईल.

Navimumbai News (नवी मुंबई न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Umbrella ride accident in wonder park navi mumbai amy
First published on: 04-06-2023 at 01:43 IST