बंदरातील चरांची खोली वाढवण्यासाठी स्फोट; ग्रामपंचायतीचे जेएनपीटीला पत्र

जेएनपीटी बंदरात मोठी जहाजे यावीत यासाठी बंदर परिसरातील चरांच्य खोलीकरणाचे काम सुरू आहे. या कामासाठी समुद्राच्या तळाशी स्फोट घडविले जात आहेत. या स्फोटांमुळे घारापुरी बेटावर असलेल्या पुरातन शिव लेण्यांना हदरे बसत आहेत. स्फोटांवर नियंत्रण ठेवण्याची मागणी घारापुरीच्या सरपंचांनी जेएनपीटीकडे केली आहे.

‘युनोस्को’ने घारापुरी येथील शिवलेण्यांना जागतिक ठेवा म्हणून घोषित केले आहे. जेएनपीटी बंदरात सध्या सहा हजार कंटेनर असलेली जहाजे येतात. ही क्षमता १० ते १२ हजार कंटेनर पर्यंत वाढाली यासाठी बंदरातील चर खोल करण्याचे काम सुरू आहे. लवकरच चौथ्या बंदराचे कामही सुरू होणार आहे. त्याच्या चरांचीही खोली वाढवण्याचे काम सुरू आहे.

या संदर्भात जेएनपीटीशी संपर्क साधला असता ‘स्फोटांसंदर्भात काहीही कल्पना नाही. ही बाब माझ्या अखत्यारीत येत नाही,’ असे प्रभारी प्रशासन सचिव एन. के. कुलकर्णी यांनी सांगितले.

स्फोट बंद करण्यास यापूर्वीही जेएनपीटीला सांगितले होते. मात्र मोठे नुकसान झाले नव्हते. सध्या मात्र या संदर्भात कोणतीही माहिती नाही. स्थानिक कार्यालयाने या केली असावी.

– बिपिनचंद्र नेगी, अधीक्षक, पुरातत्त्व विभाग, मुंबई</strong>

जेएनपीटीकडून समुद्राच्या तळाशी सुरुंगाचे स्फोटही केले जात आहेत. त्याचे हादरे येथील लेणी परिसरात बसत असल्याने लेण्यांची सुरक्षा ऐरणीवर आली आहे. या संदर्भात जेएनपीटी प्रशासनाला पत्र दिले आहे.

– बळीराम ठाकूर, सरपंच, ग्रामपंचायत घारापुरी