नवी मुंबईतील नेरूळ रेल्वे स्टेशन आणि जुईनगर भागात बेकायदा फेरीवाल्यांनी उच्छाद मांडला आहे. त्यांच्याविरोधात अतिक्रमण विरोधी पथक कायमच तात्पुरती कारवाई करीत असते. त्यामुळे पदपथ असो वा स्काय वाँक चालणेही मुश्कील झाले आहे. वारंवार मागणी करूनही त्यांच्यावर ठोस कारवाई न केल्याने मनसेने आज थेट विभाग कार्यालयात वडापाव स्टॉल टाकला होता.

हेही वाचा- नवी मुंबई : उरणमधील बिल्डर्सकडून खंडणी उकळणाऱ्या विकी देशमुखला पोलिसांनी चौकशीसाठी पुन्हा घेतले ताब्यात

जुईनगर, नेरूळ मधील रस्त्यांवर  पदपथावर फेरीवाल्यांनी बस्तान बसवले आहे. त्यामुळे पादचाऱ्यांना चालायला पदपथ उरला नाही. पादचाऱ्यांना नाईलाजाने रस्त्यावरून चालावे लागते. तसेच रस्त्यावरून चालताना अपघात होण्याचे प्रमाण वाढले आहे. अतिक्रमणामुळे वाहतूक कोंडी मोठ्या प्रमाणात होवू लागली आहे. वाहनचालकांचे त्यामुळे गाडी चालवताना हाल होवू लागले आहेत.त्यातच अनेदा फेरीवाले आणि पादचारी तसेच फेरीवाल्यात आपसात अनेकदा हाणामारीचे प्रसंग उद्भवले आहेत. त्यामुळे कायदा सुव्यवस्था प्रश्न समोर येत आहे असे होत असतनाही अतिक्रमण विभाग मात्र ठोस कारवाई करीत नाही.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

हेही वाचा- नवी मुंबई : वाशी विभागात एप्रिल २०२२ पासून १ कोटी १७ लाखाची वीजचोरी उघडकीस
 
त्यामुळे  फेरीवाले आणि पालिका अधिकारी यांच्या मध्ये आर्थिक देवाणघेवाण तर होत नाही ना अशी शंका उपस्थित होवू लागली आहे. याचा निशेष म्हणून महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे विभाग अध्यक्ष अक्षय भोसले आणि उपविभाग अध्यक्ष नरेश कुंभार ह्यांनी नेरुळ ब विभाग कार्यालयामध्ये वडापावचा स्टॉल लाऊन अनधिकृत फेरीवाल्यां विरोधात आंदोलन केले. त्यावेळी “अधिकारी, फेरीवाल्यांचे लागेबांधे … नागरिकांचे झाले चालायचे वांदे.”, “दुकानदारांचे झाले हाल … अधिकारी झाले मालामाल”, “फुटपाथ आमच्या हक्काचा … नाही कोणाच्या बापाचा ” अशा घोषणांनी पालिका विभाग कार्यालयात घोषणाही देण्यात आल्या ..अतिक्रमण अधिकारी बाबा कराडे ह्यांनी अनधिकृत फेरीवाल्यांवर कडक कारवाई करण्याचे आश्वासन दिले व परत सदर ठिकाणी फेरीवाले बसणार नाहीत ह्याची जबाबदारी घेतली. परत अनधिकृत फेरीवाले पदपथावर, रस्त्यावर दिसले तर अजून तीव्र आंदोलन करण्यात येईल असा इशारा मनसे तर्फे विभाग अध्यक्ष अक्षय भोसले यांनी अतिक्रमण अधिकाऱ्यांना दिला.अशी माहिती मनसेचे विभाग अध्यक्ष अक्षय भोसले यांनी दिली