उरण : चिटफंड घोटाळ्यातील गुंतवणूकदारांनी रविवारी पिरकोन येथे सभा घेत आमचे पैसे द्या, अशी मागणी करीत गर्दी केली होती. चिटफंड घोटाळ्याचा मुख्य सूत्रधार हा उरणच्या पिरकोन गावातील सतीश गावंड आहे. त्याने उरण, पनवेलसह अनेक ठिकाणच्या हजारो गुंतवणूकदारांची ४० दिवसांत दुप्पट परतावा देण्याचे आमिष दाखवीत शेकडो कोटींची आर्थिक फसवणूक केली आहे. त्यांचे पैसे मिळवून देण्यासाठी राज्य सरकारच्या माध्यमातून प्रयत्न करण्याच्या उद्देशाने शिवसेना (शिंदे सेनेचे) युवा नेते रुपेश पाटील यांनी पिरकोनमध्ये सभेचे आयोजन केले होते. यावेळी फसवणूक झालेले गुंतवणूकदार मोठ्या संख्येने उपस्थित होते.

हेही वाचा – आज मध्य रेल्वेचा मेगा ब्लॉक, घराबाहेर पडण्यापूर्वी वेळापत्रक बघाच

हेही वाचा – उरण रेल्वे स्थानकातील भुयारी मार्गातील पाणी समस्या कायम

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

उरण परिसरात चिटफंड योजनेत झटपट श्रीमंत होण्याच्या हव्यासापोटी हजारो नागरिकांनी शेकडो कोटी रुपयांची गुंतवणूक केली आहे. त्यासाठी अनेकांनी कर्जाऊ, आपल्या मालमत्ता, दागिने गहाण ठेवून या रकमा गोळा केल्या आहेत. यामध्ये सतिश गावंड व कोप्रोली येथील सुप्रिया पाटील यांच्याकडे मध्यस्थांच्या मदतीने पैसे गुंतवले आहेत. त्यामध्ये गुंतवणूकदारांची मोठ्या प्रमाणात आर्थिक फसवणूक झाली आहे. यातील सुप्रिया पाटील हिला पोलिसांनी तिच्या साथीदारांसह अटक केली आहे. तर जामिनावर असलेला मुख्य सूत्रधार सतीश गावंड हा फरारी आहे. त्यामुळे गुंतवणूकदार समभ्रमात आहेत.