वसई-विरार शहराला पाणी पुरवठा करणा-या सुर्या नदीला पूर आला असून, पुराचे पाणी पम्पिंग स्टेशनमध्ये शिरले आहे. त्यामुळे वसई-विरार शहराचा पाणीपुरवठा पूर्णपणे बंद करण्यात आला आहे.
वसई-विरार-पालघर क्षेत्रात सलग पाच दिवसांपासून पाऊस सुरु आहे. या पावसामुळे अनेक भागात पूरसदृश्य स्थिती निर्माण झाली आहे. मागच्या बारा तासात वसई-विरार भागात ११६ मिमी पाऊस झाला आहे. वसई-विरार शहराला पाणी पुरवठा करणा-या सुर्या नदीला पूर आला असून, पुराचे पाणी पम्पिंग स्टेशनमध्ये शिरले आहे. जॅकव्हिलमध्ये गाळ जमा झाल्याने पंप चोकअप झाल्याने पाणी पुरवठा बंद केला आहे.