scorecardresearch

Premium

नवी मुंबईत दगडफेक, जाळपोळ

मराठा समाजाने पुकारलेल्या बंदला नवी मुंबईत हिंसक वळण लागले.

शीव-पनवेल मार्गावर वाशी येथे आंदोलनकर्त्यांनी रास्ता रोको केला. हिंसक जमावाला पांगवण्यासाठी पोलिसांना प्रयत्नांची पराकाष्ठा करावी लागली. (छायाचित्र : अमित चक्रवर्ती)
शीव-पनवेल मार्गावर वाशी येथे आंदोलनकर्त्यांनी रास्ता रोको केला. हिंसक जमावाला पांगवण्यासाठी पोलिसांना प्रयत्नांची पराकाष्ठा करावी लागली. (छायाचित्र : अमित चक्रवर्ती)

नवी मुंबई : लाखो आंदोलनकर्त्यांचे मूक मोर्चे अत्यंत शांततेच्या वातावरणात काढून आदर्श घालून देणाऱ्या मराठा समाजाने बुधवारी मात्र नवी मुंबईत दहशत, दमदाटी आणि दादागिरीचे दर्शन घडविले. नवी मुंबईतून जाणाऱ्या  शीव-पनवेल, ठाणे-बेलापूर आणि पामबीच मार्ग या मुख्य रस्त्यांवर निदर्शने करण्यात आली. त्यामुळे प्रवाशांची अनेक तास रखडपट्टी झाली.

दगडफेक आणि जाळपोळीमुळे सुमारे ५० वाहनांचे नुकसान झाले. यात नवी मुंबई परिवहन सेवेच्या चार बस आणि एका शाळा बसचाही समावेश होता. कोपरखैरणे येथे पोलीस चौकीही जाळण्यात आली. एपीएमसीचा भाजी आणि फळ बाजार वगळता अन्य सर्व बाजार बंद राहिले.  कोपरखैरणेत सर्वाधिक तणाव होता.

three died in accident after car hit on divider
सांगली : मोटार दुभाजकावर आदळल्याने झालेल्या अपघातात ३ ठार
NMMT bus Juinagar Koproli route
खोपटे अपघात प्रकरण : एनएमएमटी श्रमिक सेनेनेकडून काम बंद आदोलन, जुईनगर-कोप्रोली मार्गावरील बस बंद
Three died in accident
चंद्रपूर : लोहखनिज वाहतूक करणाऱ्या ट्रकने तिघांना चिरडले, अपघातानंतर चालक पसार
Madrasa in Lakshatirtha area of Kolhapur city was demolished
कोल्हापूरातील वादग्रस्त लक्षतीर्थ मदरसा जमीनदोस्त; मुस्लिम समाजाने स्वतःहून पाडलं बांधकाम

मराठा समाजाने पुकारलेल्या बंदला नवी मुंबईत हिंसक वळण लागले. सर्वाधिक तणाव कोपरखैरणे परिसरात होता. तिथे सकाळी सातपासून रात्रीपर्यंत हिंसाचार सुरू होता. कोपरखैरणे डीमार्ट बीट चौकीला आणि एका गाडीला आग लावण्यात आली. ५० पेक्षा जास्त वाहनांची मोडतोड करण्यात आली. यात दुचाकींनाही वगळण्यात आले नाही. पोलिसांनी बघ्याची भूमिका घेतल्याचा आरोप रहिवाशांनी केल्या.

कोपरखैरणेत सर्वाधिक तणाव

मराठा समाजाने पुकारलेल्या बंदला नवी मुंबईत हिंसक वळण लागले. सर्वाधिक तणाव कोपरखैरणे परिसरात होता. तिथे सकाळी सातपासून रात्रीपर्यंत हिंसाचार सुरू होता. कोपरखैरणे डीमार्ट बीट चौकीला आणि एका गाडीला आग लावण्यात आली. ५० पेक्षा जास्त वाहनांची मोडतोड करण्यात आली. यात दुचाकींनाही वगळण्यात आले नाही. पोलिसांनी बघ्याची भूमिका घेतल्याचा आरोप रहिवाशांनी केल्या. कोपरखैरणे सेक्टर-११ येथे विद्यार्थ्यांना घेण्यासाठी आलेल्या बसवर आंदोलकांनी बस थांबवून दगडफेक केली. या वेळी हे विद्यार्थी भयभीत झाले. बंद असताना शाळेत का पाठविले, असा प्रश्न आंदोलनकर्त्यांनी विचारला. काही रहिवाशांनी जाब विचारण्यास धाव घेतल्यानंतर आंदोलनकर्त्यांनी काढता पाय घेतला. काही विद्यालयातील अकरावी-बारावीच्या विद्यार्थ्यांनाही शालेय बसमधून घरी पाठविण्यात आले.

भाजीपाला व्यापार सुरळीत

मुंबई कृषी उत्पन्न बाजार समितीत बुधवारी कडकडीत बंद पाळण्यात आला. भाजीपाला व फळे अशा जीवनावश्यक आणि नाशिवंत वस्तू वगळून कांदा-बटाटा, मसाला आणि दाणा बाजारात १०० टक्के बंद ठेवण्यात आला होता. भाजीपाला बाजार सुरळीत सुरू होता, परंतु फळ बाजारात आवक व व्यापारात घट झाली. भाजीपाला बाजारात नेहमीप्रमाणेच ५३० गाडय़ांची आवक झाली. बाजारात किरकोळ ग्राहक आल्याने १०० व्यवहार झाले. फळ बाजारात रोज २०० गाडय़ांची आवक होते, ती ५० गाडय़ांवर आली. आदल्याच दिवशी बंदची हाक देण्यात आल्यामुळे आधी निघालेल्या फळांच्या गाडय़ा बाजारात दाखल झाल्या होत्या. महामार्गावरील रास्ता रोकोमुळे बऱ्याच शेतकऱ्यांनी फळ बाजारात शेतमाल पोहोचविण्याचे टाळले. मुंबई उपनगरातील ग्राहक माल खरेदीकरिता फिरकले नसल्याने ८० टक्के व्यापार ठप्प होता.  कांदा-बटाटा, मसाला आणि दाणा बाजारात मात्र १०० टक्के बंद पाळण्यात आला.

कोपरखैरणेत पोलीस लक्ष्य

दुपारी तीननंतर आंदोलन स्थगित केल्याची घोषणा झाल्यावर बहुतेक ठिकाणी आंदोलन थांबवण्यात आले, मात्र कोपरखैरणेत ते अधिकच चिघळले. डी मार्ट चौकातील आंदोलनकर्त्यांना समजावण्यास आमदार व माथाडी कामगार नेते नरेंद्र पाटील आले असता, आंदोलनकर्त्यांनी त्यांना जुमानले नाही. पोलिसांनी आंदोलन बंद करण्यास सांगितले असता, पोलीस चौकी जाळण्याचा प्रयत्न केला, त्यात चौकीचे नुकसान झाले, एक वाहनही आगीच्या भक्ष्यस्थानी पडले.

ट्रान्सहार्बर विस्कळीत

बंददरम्यान आंदोलकांनी लोकलसेवेलाही लक्ष्य केले. मात्र, याचा फारसा परिणाम वाहतुकीवर जाणवला नाही. बंदमुळे प्रवाशांची संख्या रोडावली होती. सकाळची कार्यालयाची वेळ वगळता दिवसभर गाडय़ांमध्ये शुकशुकाट होता.पश्चिम रेल्वेवर चालवण्यात येणाऱ्या वातानुकूलित लोकल गाडीलाही प्रवासी कमी होते. दरम्यान, नवी मुंबईतील घणसोली येथे मराठा कार्यकर्ते रुळांवर उतरल्याने ठाणे-वाशी, ठाणे-पनवेल ही ट्रान्सहार्बर वाहतूक बुधवारी दुपारी १२ नंतर बंद पडली. या मार्गावरील वाहतूक पूर्ववत होण्यासाठी सायंकाळचे पाच वाजले.

Latest Comment
View All Comments
Post Comment

Navimumbai News (नवी मुंबई न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

Web Title: Violence in navi mumbai during bandh called by maratha community

First published on: 26-07-2018 at 01:58 IST

आजचा ई-पेपर : नवी मुंबई

वाचा
epaper image

संबंधित बातम्या

तुम्ही या बातम्या वाचल्या आहेत का? ×