विष्णुदास भावे नाटय़गृह नोव्हेंबरमध्ये प्रेक्षकांसाठी खुले

नाटय़गृहाचा कलात्मक आराखडा वास्तुविशारद सोपान प्रभू यांच्याकडून तयार करून घेण्यात आला आहे.

नवी मुंबई : नवी मुंबई शहरात एकमेव असलेले विष्णुदास भावे नाटय़गृहाचे महापालिकेकडून नूतनीकरण करण्यात येत असून ते बंद आहे. हे सर्व काम नोव्हेंबरच्या पहिल्या आठवडय़ात पूर्ण करून नाटय़गृह १९ नोव्हेंबरपासून प्रेक्षकांकरिता खुले होणार आहे.

सन १९९६ मध्ये सिडकोने बांधलेले विष्णुदास भावे नाटय़गृह नवी मुंबई महानगरपालिकेकडे हस्तांतरित झाल्यानंतर त्या ठिकाणी आवश्यक कामे करण्यात आली, मात्र नूतनीकरण करण्यात आलेले नव्हते. त्यामुळे नाराजी व्यक्त होत होती. आता नूतनीकरणाचे काम हाती घेण्यात आले आहे. १२ कोटी ७९ लाख रुपये खर्च करून नूतनीकरण करण्यात येणार असून यामध्ये स्थापत्य व विद्युत कामे करण्यात येत आहेत. याकरिता नाटय़गृहाचा कलात्मक आराखडा वास्तुविशारद सोपान प्रभू यांच्याकडून तयार करून घेण्यात आला आहे. ही कामे नोव्हेंबपर्यंत पूर्ण करण्यात येणार आहेत.१९ नोव्हेंबरपासून प्रेक्षकांकरिता खुले होईल, असे शहर अभियंता सुरेंद्र पाटील यांनी सांगितले.

Loksatta Telegram लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

Web Title: Vishnudas bhave natyagruha open for audience in november

ताज्या बातम्या