मोरबे येथील धरणातील जलसाठा दिवसेंदिवस कमी होऊ लागल्याने पालिका प्रशासनाने सुरू केलेली २५ टक्के पाणीकपात अपरिहार्य आहे. मात्र पाणी बचतीची फारशी सवय नसलेले नवी मुंबईकर या पहिल्याच पाणीकपातीने बिथरले आहेत. त्यात शिवसेनेसारख्या पक्षाने समजूतदारपणा दाखविण्याऐवजी मटका मोर्चा काढल्याने पालिका प्रशासन नाराज झाले आहे.
स्वत:च्या मालकीचे मोरबे धरण असल्याने जलसंपन्न झालेल्या नवी मुंबईला आता पाणीटंचाईचे चटके बसू लागले आहेत. जून-जुलैपर्यंत पाणी पुरवण्यासाठी प्रशासनाने २५ टक्के पाणीकपातीला सुरुवात केली आहे. गतवर्षी मोरबे धरण क्षेत्रात ३ हजार १४३ मिमी पाऊस पडल्याने पाणीटंचाईचे संकट शहरावर ओढवले नाही. मात्र या वर्षी हाच पाऊस केवळ २२०० मिमी. पडला असल्याने केवळ ८० दशलक्ष पाणीसाठा शिल्लक आहे. पाणीकपात न केल्यास हा साठा मार्चपर्यंतच पुरेल. त्यानंतरची स्थिती अंत्यत दयनीय होण्याची शक्यता असल्याने प्रशासनाने टप्प्याटप्प्याने २५ टक्के पाणीकपात सुरू केली आहे.
संग्रहित लेख, दिनांक 16th Dec 2015 रोजी प्रकाशित
पाणीकपात अपरिहार्य
मोरबे येथील धरणातील जलसाठा दिवसेंदिवस कमी होऊ लागल्याने पालिका प्रशासनाने सुरू केलेली २५ टक्के पाणीकपात अपरिहार्य आहे. मात्र पाणी बचतीची फारशी सवय नसलेले नवी मुंबईकर या पहिल्याच पाणीकपातीने बिथरले आहेत. त्यात शिवसेनेसारख्या पक्षाने समजूतदारपणा दाखविण्याऐवजी मटका मोर्चा काढल्याने पालिका प्रशासन नाराज झाले आहे. स्वत:च्या मालकीचे मोरबे धरण असल्याने जलसंपन्न झालेल्या नवी मुंबईला आता पाणीटंचाईचे चटके […]
Written by मोरेश्वर येरमविश्वनाथ गरुड
First published on: 16-12-2015 at 09:11 IST
Navimumbai News (नवी मुंबई न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Water shortage in navi mubai