scorecardresearch

Premium

पनवेल शहरामध्ये ८ डिसेंबर ते १५ जूनपर्यंत आठवड्यातील एक दिवस पाणी पुरवठा बंद

पनवेलकरांना जूनपर्यंत पाणी पुरवठा सुरळीत करता यावा यासाठी पनवेल महापालिकेने पाण्याचे नियोजन करण्याचा निर्णय घेतला असून यापुढे आठवड्यातील एक दिवस जलकुंभाच्या क्षेत्रनिहाय पाणी पुरवठा बंद करुन नियोजन केले जाणार आहे.

Water supply shut off for one day in a week in panvel
गेली अनेक वर्षे पनवेलकरांना पाणीबाणीला सामोरे जात आहेत. (फोटो- संग्रहित छायाचित्र)

लोकसत्ता टीम

पनवेल : पनवेलकरांना जूनपर्यंत पाणी पुरवठा सूरळीत करता यावा यासाठी पनवेल महापालिकेने पाण्याचे नियोजन करण्याचा निर्णय घेतला असून यापुढे आठवड्यातील एक दिवस जलकुंभाच्या क्षेत्रनिहाय पाणी पुरवठा बंद करुन नियोजन केले जाणार आहे. ८ डिसेंबर ते १५ जूनपर्यंत या दरम्यानचे हे नियोजन असून पालिकेने याबाबतची माहिती प्रसिद्धीपत्रकातून जाहीर केली. त्यामुळे पनवेलकरांना यापुढील सात महिने पाण्याची काटकसर करावी लागणार आहे. गेली अनेक वर्षे पनवेलकरांना पाणीबाणीला सामोरे जात आहेत.

Updated MRI system in KEM Sion Nair and Cooper within a month
केईएम, शीव, नायर व कूपरमध्ये महिनाभरात अत्याधुनिक एमआरआय यंत्रणा
Investigation of theft of gold silver vehicle nashik
सोने, चांदीच्या वाहनावरील दरोड्याचा तपास
leakage in water pipeline affect water supply in bhandup
भांडुपमध्ये जलवाहिनीला गळती; अनेक भागांमधील पाणीपुरवठा खंडित
nagpur, gold prices, gold price declined marathi news,
खुशखबर! सोन्याच्या दरात मोठी घसरण, असे आहेत आजचे दर…

पनवेलचा विस्तार होत असल्याने मागील अनेक वर्षांपासून पनवेलकरांना मोठ्या प्रमाणात पाणी टंचाई भासते. पूर्वाश्रमीच्या पनवेल नगरपरिषदेचे स्वमालकीचे अप्पासाहेब वेदक जलाशयाची (देहरंग धरण) क्षमता 3.5 दश लक्ष घनमीटर एवढी असल्याने पनवेलकरांची तहान बारमाही भागविण्यासाठी लागणारे मुबलक पाण्याचा उपसा या धरणातून होऊ शकत नसल्याने महापालिका इतर प्राधिकरणांकडून पाणी उसनवारीने घ्यावे लागते. पनवेलकरांना ३२ दश लक्ष लीटर (एमएलडी) पाण्याची गरज आहे. देहरंग धरणातून १६ एमएलडी आणि महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाकडून (एमजेपी) ११ एमएलडी आणि ५ एमएलडी महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळाकडून (एमआयडीसी) पाणी घेऊन पनवेलकरांना पुरवठा केला जातो.

आणखी वाचा-दिवसा घरफोडी करणाऱ्या पाच सराईत आरोपींना सीबीडी पोलिसांनी केले गजाआड, चार गुन्ह्यांची उकल

एमजेपी आणि एमआयडीसीकडून पनवेलला मिळणाऱ्या पाताळगंगा नदीतून पाणी पुरवठा होत असताना आठवड्याच्या प्रत्येक रविवार व सोमवार या दिवशी कमी पाणी मिळतो. तसेच इतर वेळेतही विजेच्या तांत्रिक दरुस्तीची कामांसाठी व इतर दुरुस्तीच्या कामांसाठी शटडाऊन घेतल्याने वारंवार पनवेलला कमी पाणी पुरवठा होत असल्याने देहरंग धरणातून जास्त पाणी उपसा करुन शहराची तहान भागवावी लागते. परंतु अधिकचा उपसा सध्या केल्यास धरणातील पाणीसाठा उन्हाळ्यात संपून जाईल या भितीमुळे महापालिकेने धरणातील पाण्याचे नियोजन ८ डिसेंबरपासून केले असून पनवेल शहरामधील ९ विविध उंच जलकुंभ निहाय एक भाग आठवड्यातून एक दिवस बंद ठेवण्याचा निर्णय पालिकेच्या पाणी पुरवठा विभागाचे उपअभियंत्यांनी घेतला आहे.

शुक्रवारी मिडलक्लास सोसायटी, भाग एक व दोन, एस. के. बजाज तसेच शनिवारी तक्का गाव, नागरी वसाहतीमध्ये पाणी पुरवठा बंद राहील. रविवारी संपुर्ण नवेलकरांना पाणी पुरवठा सूरळीत सूरु राहील.सोमवारी मार्केटयार्ड, भाजी मार्केट, पायोनिअर सोसायटी, ठाणा नाका, पटेलपार्क, जैन मंदीर, गणपती मंदीर, मामलेदार कचेरी, दत्तराज सोसायटी, साठेगल्ली, विरुपाक्ष मंदीर, धूतपापेश्वर कारखाना शहरातील बहुतांश परिसरात पाणी पुरवठा होणार नाही. मंगळवारी पटेलमोहल्ला तर बुधवारी एचओसी कॉलनी परिसर आणि गुरुवारी ठाणा नाका परिसरात पाणी पुरवठा बंद राहणार आहे

Latest Comment
View All Comments
Post Comment

Navimumbai News (नवी मुंबई न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

Web Title: Water supply shut off for one day in a week from 8th december to 15th june in panvel city mrj

First published on: 06-12-2023 at 09:39 IST

आजचा ई-पेपर : नवी मुंबई

वाचा
epaper image

संबंधित बातम्या

तुम्ही या बातम्या वाचल्या आहेत का? ×