उरण : नवी मुंबईच्या उरण मधील  सह पोलीस आयुक्तालयासह उरण,मोरा सागरी व न्हावा शेवा ही तिन्ही पोलीस ठाणी नव्या व पुरेशा जागेच्या प्रतीक्षेत आहेत. जेएनपीटी बंदराच्या हद्दीत असलेल्या नवी मुंबईच्या सहआयुक्त कार्यालय व न्हावा- शेवा पोलीस ठाण्यात पाणी शिरू लागले आहे. त्याचप्रमाणे उरण पोलीस ठाण्याचे गळक्या ब्रिटीशकालीन इमारतीतून कामकाज करावे लागत आहे.

हेही वाचा >>> वाशी खाडीवरील तिसऱ्या पुलाची मुंबईहून पुण्याकडे जाणारी मार्गिका डिसेंबर २०२३ मध्ये!

Akshaya Tritiya, gold, price,
अक्षय तृतीयेच्या दिवशी बाजार उघडताच सोन्याच्या दरात उसळी, ‘हे’ आहे आजचे दर
Mangoes are expensive for Nashikers on Akshaya Tritiya
अक्षय्य तृतीयेला नाशिककरांसाठी आंबा महागच
Valsad in the south, the tribal region in Gujarat
नळ आहेत पण पाणी नाही; कुठे आहे ही परिस्थिती?
pregnant woman, water tank,
धक्कादायक ! आठ महिन्यांच्या गर्भवतीला पाण्याच्या टाकीत….
revenge of attack after year and a half young man was stabbed with a knife
यवतमाळ : दीड वर्षापूर्वीच्या हल्ल्याचा बदला; युवकाला चाकूने भोसकले
anti trafficking cells busted sex racket in pune
पुण्यात ३०२ क्रमांकाच्या खोलीत वेश्याव्यवसाय; पोलिसांनी टाकला छापा, ३ तरुणींची सुटका
Mumbai, MHADA, Extends Deadline, E Auction, 17 Plots, Mumbai MHADA, mumbai news, mhada news, marathi news, e auction in mumbai,
मुंबईतील १७ भूखंडांच्या ई-लिलावाच्या निविदेला मुदतवाढ ? एक – दोन दिवसात निर्णय
vasai leopart marathi news, vasai fort leopard marathi news
वसई : बिबट्याच्या दहशतीचा परिणाम, रोरोच्या संध्याकाळच्या शेवटच्या दोन फेऱ्या रद्द

त्यामुळे उरण मधील पोलीस यंत्रणेला जागे अभावी काम करणे अवघड झाले आहे. तर दुसरीकडे सिडकोने बांधलेली द्रोणागिरी पोलीस ठण्याची इमारत पंधरा वर्षांपासून पडून आहे. तर उरण शहरात नव्याने उभारण्यात येणाऱ्या मोरा ठाण्याच्या इमारती चे निधी अपुरा पडत असल्याने काम थांबले आहे. त्याचप्रमाणे न्हावा शेवा पोलीस ठाण्याच्या नव्या इमारतीचा जेएनपीटीचा प्रस्ताव १० वर्षांपासून मंजुरीच्या प्रतीक्षेत आहे. उरण सारख्या वाढत्या लोकसंख्येच्या शहरातील व औद्योगिक परिसरातील कायदा आणि सुव्यवस्था राखणाऱ्या पोलीस प्रशासनाचे काम सुरळीत व्हावे यासाठी सर्वसोयीनी युक्त आशा इमारतींची आवश्यकता आहे. त्यासाठी पोलीस विभागाचे ही प्रस्ताव आहेत मात्र त्यांना मान्यता कधी मिळणार हा प्रश्न आहे.  जेएनपीटी सारख्या जागतिक पातळीवरील बंदरातून देश- विदेशात मालाची आयात – निर्यात करुन देशाला आर्थिक चलन मिळवून देणार केंद्र आहे. तसेच ओएनजीसी, भारत पेट्रोलियम, वायु विद्युत निर्मिती केंद्र या सारख्या केंद्र व राज्य सरकारच्या महत्वाच्या प्रकल्पासह अनेक खाजगी उद्योग ही उरण मध्ये आहेत. तर या शहराला जोडणाऱ्या राष्ट्रीय,राज्य महामार्ग, जल वाहतूक,नव्याने येऊ घातलेल्या दळणवळणा च्या साधनात उरण ते सी एस ती एम (मुंबई)लोकल सेवा,न्हावा शेवा शिवडी सागरी महामार्ग,विरार अलिबाग कॉरिडॉर,एम आय डी सी मधील उद्योग यांची पडणारी भर यामुळे कायदा आणि सुव्यवस्था राखणाऱ्या यंत्रणेला सुसज्ज करण्याची गरज आहे.

हेही वाचा >>> खारघरमध्ये बेकायदा वास्तव्य करणाऱ्या तीन बांगलादेशींना अटक, दहशतवाद विरोधी पथकाची कारवाई

जेएनपीटी व्यवस्थापनाने न्हावा शेवा पोलीस ठाण्यासाठी सोनारी येथे अत्याधुनिक सुविधा युक्त इमारत उभारण्यासाठी पुढाकार घेतला आहे. मात्र हा प्रस्तावाला मंजुरी मिळालेली नाही. उरण मधील पोलीस ठाण्याच्या इमारतीचे प्रस्ताव आहेत. त्यासाठी नवी मुंबईचे पोलीस आयुक्त  पाठपुरावा करतील आणि लवकरच उलवे नोड सह उरणच्या सह पोलीस आयुक्तालयाच्या हद्दीतील पोलीस  ठाण्याच्या समस्या दूर होतील अशी माहिती बंदर विभागाचे सहपोलीस आयुक्त धनाजी क्षीरसागर यांनी दिली आहे.