पनवेल : पनवेल शहरातील राज्य परिवहन मंडळाच्या बसडेपोत भरधाव जाणाऱ्या बसच्या धडकेत एक ६३ वर्षीय महिला ठार झाली आहे. मृत महिलेचे नाव कल्पनाचंद लक्ष्मणचंद ठाकूर असे आहे.

तक्का परिसरातील सिद्धी हाऊस या इमारतीमध्ये राहणाऱ्या कल्पनाचंद या तीन दिवसांपूर्वी (१३ फेब्रुवारी) सकाळी सात वाजता आपल्या नातीला बसथांब्यापर्यंत सोडण्यासाठी घराबाहेर पडल्या होत्या. पंचमुखी हनुमान मंदीर ते एसटी डेपो या मार्गावरील किंग्ज इलेक्ट्रोनिक्स दुकानासमोर त्यांना भरधाव वेगाने जाणाऱ्या राज्य परिवहन मंडळाच्या बसने (बसक्रमांक एम. एच. ०७ सी. ७२१३) धडक मारल्याने त्या जागीच ठार झाल्या.

हेही वाचा – खांदेश्वर आणि नवीन पनवेलमध्ये पायी चालणाऱ्यांना लुटणारी टोळी सक्रीय

हेही वाचा – नवी मुंबई : बेकायदा झोपड्यांचा विळखा

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

बसचा चालक मन्सूर शेख याच्यावर पनवेल शहर पोलिसांनी भरधाव वाहन चालविल्याने भादवि कलम ३०४ ,अ, २७९, ३३७, ३३८ सह मोटार वाहन कायद्याप्रमाणे कलम १८४ प्रमाणे गुन्हा नोंदविला आहे.