नवी मुंबई : बेलापूरच्या आमदार मंदा म्हात्रे यांच्या विकास निधीमधून सीबीडी येथे उभारण्यात आलेल्या ‘आदिवासी भवनाचे’ लोकार्पण महापालिका आयुक्त राजेश नार्वेकर यांच्या हस्ते पार पडले. आधुनिक जीवन पद्धतीपासून काहीसे वेगळे लांब राहिलेले आदिवासी बांधवांच्यासाठी सीबीडी बेलापूर येथे आदिवासी भवनचे निर्माण करण्यात आले असून त्याचे उद्धाटन बेलापूरच्या आमदार मंदा म्हात्रे यांच्या उपस्थितीत मनपा आयुक्त राजेश नार्वेकर यांच्या हस्ते पार पडले.
नागरी किंवा आधुनिक संस्कृतीपासून आजही आदिवासी लोक अलिप्त राहतात. तसेच त्यांचा व सामान्य लोकांचा फारसा संबंध ओळख अपवाद व्यतिरिक्त होत नाही. त्याप्रमाणे वर्गश्रेणीबद्ध समाजाचा संपर्क न झालेल्या वैशिष्टयपूर्ण चालीरीती किंवा संस्कृती आदिवासींत आढळतात. परंतु नवी मुंबईमधील सीबीडी येथील आदिवासी बांधवांना ही आपली संस्कृती जपत आपले सांस्कृतिक कार्यक्रम ही कायम अजरामर राहावे म्हणून सीबीडी येथील स्वातंत्र्यवीर सावरकर मैदान, भूखंड क्र. १३, सेक्टर-८ येथे आदिवासी बांधवांनाकरिता बेलापूरच्या आमदार मंदा म्हात्रे यांच्या विकास निधीमधून ‘आदिवासी भवन’ उभारण्यात आले.
आणखी वाचा-ग्रामपंचायत निवडणुकीसाठी मतदारांचा उत्साह; मतदानासाठी केंद्रावर रांगाच रांगा
तसेच आमदार मंदा म्हात्रे पुढे म्हणाल्या की, बेलापूर क्षेत्रातील सीबीडी येथील सेक्टर-८ मधील आदिवासी बांधवांना त्यांचे पारंपारिक कार्यक्रम साजरे करण्याकरिता, त्यांच्या कलागुणांना वाव मिळावा, शिक्षणासाठी जागा उपलब्ध व्हावी, त्यांचीकडे असणारी हस्तकला, वेगवेगळ्या महिला बचत गटांतून करणारे काम, मुलींना प्रशिक्षण हे सर्व नवी मुंबई महानगरपालिका उपलब्ध करून देणार असून यासाठी या आदिवासी भवनाचा उपयोग होणार आहे. तसेच आदिवासी बांधवांकरिता आमदार निधीमधून २५ लाख निधी उपलब्ध देण्यात आला होता. आदिवासी बांधवांची लोककला व संस्कृती टिकावी यासाठी उभारण्यात आलेल्या या आदिवासी भवनामुळे आदिवासी समाजाला आपले हक्काचे व्यासपीठ उपलब्ध झाले आहे. यातून आदिवासी समाजाची संस्कृती टिकावी व येणाऱ्या पिढ्यांना कळावी हाच मुख्य हेतू आहे. आज या भवनाचे लोकार्पण करताना खऱ्या अर्थाने बेलापूर पट्टीतील आदिवासी बांधवांच्या चेहऱ्यावर आनंद पाहायला मिळत आहे. तसेच या उद्घाटन प्रसंगी आदिवासी जीवनशैलीतील नृत्य आणि लोकनृत्याचा अनोखा संग्राम जपत कमल आनंद कला मंच आणि आशिमिक कामठे प्रस्तुत “वारसा माझ्या महाराष्ट्राचा” या सांस्कृतिक कार्यक्रम ही आयोजित करण्यात आला होता.