आल्फ्रेड बिनेत (८ जुल १८५७ ते १८ ऑक्टोबर १९११) हे एक प्रभावी फ्रेंच मानसशास्त्रज्ञ होऊन गेले;  जे मानवी बुद्धिमत्ता मोजपट्टीनिर्मितीसाठी प्रसिद्ध आहेत.  आपल्या वडिलांप्रमाणे वैद्यकीय डॉक्टर व्हायचे म्हणून बिनेत यांनी डॉक्टरकीच्या अभ्यासक्रमासाठी १८७८ मध्ये नाव नोंदवले. मात्र चार्ल्स डार्वनि आणि जॉन स्टुअर्ट मिल यांचे साहित्य वाचून त्यांनी मानसशास्त्राचा अभ्यास सुरू केला. त्यांनी पॅरिसमधील एका रुग्णालयात जॉन-मार्टनि चार्कोत यांच्यासोबत मोहनिद्रा वापरून मनोरुग्णांना उपचार देण्याचे काम सुरू केले. मात्र ती उपचार पद्धत वादात सापडल्यामुळे त्यांनी ते काम सोडले.

त्यानंतर बिनेत पॅरिसमधील मानसशास्त्रासंबंधीच्या एका प्रयोगशाळेत काम करून लागले. १८९४ साली ते आपल्या कर्तृत्वाने तिचे संचालक झाले आणि मृत्यूपर्यंत तिथेच कार्यरत राहिले. सन १९०४ मध्ये फ्रान्स सरकारने आल्फ्रेड बिनेत यांना मंदबुद्धी असलेल्या मुलांना ओळखण्यासाठी पद्धत विकसित करण्यास सांगितले; जेणेकरून अशा मुलांना वेगळ्या प्रकारे शिक्षण देता येईल.

peter higgs marathi articles loksatta
स्थितप्रज्ञ वैज्ञानिक
Candidates Chess Tournament Russia Ian Nepomnia leads the way sport news
कॅन्डिडेट्स बुद्धिबळ स्पर्धा: नेपोम्नियाशीचे पारडे जड!
ravi shastri
संवादातील स्पष्टता महत्त्वाची- शास्त्री
Elon Musk Is Testing Adult Content Group feature users to create communities around adult sensitive content
एलॉन मस्क यांचा मोठा निर्णय! आता एक्सवर येणार ‘ॲडल्ट कन्टेन्ट ग्रुप’; जाणून घ्या सविस्तर…

बिनेत यांनी त्यांचे सहकारी थिओडर सायमनसोबत अनेक प्रयोग करून बुद्धिक्षमता मोजण्यासाठी काही चाचण्या विकसित केल्या. केवळ गणित व वाचन यांवर भर न देता लक्ष आणि स्मरणशक्ती या घटकांनाही त्यांनी बुद्धिमत्तेच्या मोजमापनात समाविष्ट केले. त्यानुसार त्यांनी एक चाचणी आणि मोजपट्टी तयार केली, जी ‘बिनेत-सायमन बुद्धिमत्तापट्टी’ म्हणून ओळखली जाते. तिच्यात नंतर लुईस टर्मननी काही सुधारणा केल्या व तिला ‘स्टॅनफोर्ड-बिनेत’ चाचणी असे म्हटले जाते.

पुढे त्यांच्या चाचणीचा वापर कुणाही व्यक्तीचा बुद्धिमत्ता गुणांक म्हणजेच बुद्ध्यांकाचे (इंटेलिजन्स कोशंट -आयक्यू) मापन करण्यासाठी होऊ लागला.  बिनेतना ते पसंत नव्हते; कारण त्यांच्या मते, मानवी बुद्धिमत्ता ही अतिशय व्यापक असून केवळ एका अंकाने तिची परिगणना करणे हे योग्य नाही.

त्या काळात सामाजिक शास्त्रांत गणिती पद्धती वापरणे हे चुकीचे मानले जाई. याला एक कारण म्हणजे ‘सरासरी माणूस’ ही सांख्यिकीमधील कल्पना प्रत्यक्षात विपरीत परिणाम निर्माण करू शकते. हे चार्ल्स डिकन्स यांनी फार मार्मिकपणे त्यांच्या ‘हार्ड टाइम्स’ या कादंबरीत मांडले होते (१८५४). तरी गणिती मोजमापनपद्धती मानसशास्त्रात वापरण्याची बिनेत यांची उचल हेदेखील त्यांचे एक मोठे योगदान आहे.

डॉ. विवेक पाटकर

मराठी विज्ञान परिषद,

वि. ना. पुरव मार्गचुनाभट्टीमुंबई २२

 office@mavipamumbai.org

 

..आदमी अब तक भटकता है।

चिंतन, मनन आणि अध्ययन हे ‘फिराक’ यांच्या जगण्याचं ‘व्रत’ होतं. त्यांच्या साहित्यात याचं प्रतिबिंब दिसतं. उर्दूतील मीर, मुसहफी, गालिब व इंग्रजीतील वर्ड्स्वर्थ या स्वछंदतावादी कवींच्या प्रभावाखाली त्यांनी आपल्या काव्यलेखनाला सुरुवात केली. तसंच काही गद्यलेखनही केलं आहे. त्यांची ३३ पुस्तके प्रसिद्ध झाली आहेत. कवितालेखन, उर्दू, हिंदी, इंग्रजीत समीक्षालेखन, टागोरांच्या साहित्याचे अनुवाद त्यांनी केले आहेत. हिंदी भाषेत पाच व इंग्रजीतून सात ग्रंथ प्रकाशित झाले आहेत. ‘,शुल-ए-साझ’ (नज्मे आणि गजले), ‘गजलिस्तान’, ‘शेरिस्तान’, ‘रूहे कायनात’ (नज्मे), ‘शबनमिस्तान’ (गजले) हे त्यांचे उर्दू काव्यसंग्रह असून, ‘सत्य कहा है’, ‘सफल जीवन’,  ‘रोटियाँ’,  ‘धरती की करवट’ हे हिंदी काव्यसंग्रह प्रसिद्ध झाले आहेत. ‘पिछली रात’ हा त्यांच्या निवडक कवितांचा संग्रह आहे. तसंच ‘चिरागाँ’ व ‘गुलबांग’ हेही निवडक कवितांचे संग्रह प्रसिद्ध झाले आहेत.

‘ए गोल्डन ट्रेजरी ऑफ एसेज’,  ‘दि मेकिंग ऑफ ए पोएट’, ‘मेन ऑफ लेटर्स’ इ. इंग्रजी गद्यलेखन प्रकाशित झालं आहे. याशिवाय  ‘टागोरकी एक सौ एक कविताएँ’ आणि  ‘गीतांजली’चा अनुवाद प्रसिद्ध झाला आहे.

इंग्रजी, उर्दू व हिंदी साहित्याचा प्रगाढ व्यासंग आणि तल्लख कल्पनाशक्ती यामुळे  ‘फिराक’ यांनी एक नवी दृष्टी आपल्या काव्यातून व्यक्त केलेली दिसते.  ‘गझल’ या काव्यप्रकारात आपल्या प्रभावी शब्दकलेने त्यांनी नवा प्राण ओतला आहे. या गझल लेखनातच त्यांचा कवी या नात्याने खरा आत्माविष्कार झाला आहे. हिंदी आणि उर्दू शब्दांची उचित निवड, सहज भाषाशैली, अर्थवाही शब्दरचना ही त्यांच्या काव्यलेखनाची वैशिष्टय़े आहेत.

४० हजाराहून अधिक शेर त्यांनी लिहिले. गझलच्या पारंपरिक आशयाच्या पलीकडे जाणारा व्यापक आयाम

उर्दू काव्यातील स्वराला आणि संस्काराला त्यांनी नवीन रूप दिलं. त्यांच्या काव्यात भारताच्या नवमतवादाच्या हृदयाचं स्पंदन प्रतिबिंबित झालेलं दिसतं. या जगात माणसाला माणूस भेटत नाही- हे दु:ख त्यांना बघवलं नाही-तेव्हा ते लिहितात-

‘‘हजारो सिज पैदा कर चुकी है नस्ल आदमी की

ये सब तस्लीम, लेकिन आदमी अब तक भटकता है।’’

मंगला गोखले

mangalagokhale22@gmail.com