खरेदी खताची नोंदणी झाल्यानंतर, वकिलांमार्फत दस्ताची प्रमाणित प्रत व संबंधित कागदपत्रे तहसीलदार कार्यालयात सात दिवसांच्या आत सादर करून त्याचा दाखला त्यांच्याकडून घ्यावा.
तहसीलदार कार्यालयाचा दाखला व आदेश विनाविलंबित संबंधित गावकामगार तलाठी यांच्याकडे दाखल करून हक्क पत्रांच्या सातबारा व सहाबारा या उताऱ्यांवर स्वत:चा मालकी हक्क कब्जेदार म्हणून नोंदवून घ्यावा.
नव्या सातबाराच्या उताऱ्यावर खरेदीदाराची नावनोंदणी झाल्यावर तलाठय़ाकडून खातेपुस्तिका घ्यावी. जमिनीचा महसूल, शेतसारा भरल्याची नोंद पाहून पावती घ्यावी व व्यवस्थित ठेवावी.
शेतसारा/ महसूल, कर यांची रक्कम तलाठय़ाकडे दरवर्षी न चुकता ठरवून दिलेल्या मुदतीत भरणा करून पोचपावती घ्यावी व तशी नोंद खाते पुस्तकात करून घ्यावी.
ज्या महसुली अधिकाऱ्याच्या कार्यकक्षेत शेतजमीन येते, त्याच्या लेखी पूर्वपरवानगीशिवाय खरेदी केलेल्या जमिनीत फार्म हाऊस बांधू नये. अन्यथा असे बांधकाम बेकायदेशीर ठरते आणि त्यावर कारवाई होऊ शकते.
जमिनीचा कस, उपलब्ध पाणी पुरवठय़ाची साधने, त्या भागातील पावसाचे प्रमाण, त्या विभागात घेतली जाणारी पिके या बाबींचा सखोल अभ्यास करून त्याची माहिती मिळवून शेती कसण्याची योजना बनवावी व शेती करावी.
पिकांचे नियोजन करताना, निर्माण केलेल्या शेतमालास रास्त भाव मिळणारी बाजारपेठ जवळ असल्यास त्यानुसार पिकांचे नियोजन करावे. नाशवंत शेतमाल बाजारपेठेच्या हमीशिवाय पिकवू नये. यामध्ये भाजीपाला, फळे, फुले आदींचा समावेश करावा.
खरेदी केलेल्या शेतजमिनीवर परतफेड करता येईल इतपतच कर्ज काढावे व घेतलेले कर्ज वेळेवर परत करावे. नसíगक आपत्ती, अनिश्चित हवामान, पाऊसपाणी यावर शेतीव्यवसाय पूर्णपणे अवलंबून आहे. तशातच अनिश्चित शेतमाल दर व खरेदीदार यांचाही मेळ नसतो. त्यामुळे शेतजमीन कसणे ही एक कसरत असून जमाखर्चाचा ताळमेळ बसवणे, ही शेतीची गहन समस्या आहे.
वॉर अँड पीस: पुरुषवंध्यत्व : लठ्ठपणा व मधुमेह : भाग २
काही विवाहित स्त्री-पुरुषांच्या जीवनात दोघांचे वैद्यकीय अहवाल व्यवस्थित असतात. पुरुषांचे शुक्राणूप्रमाण पुरेसे असते. स्त्रियांची मासिक पाळी व्यवस्थित असते. गर्भाशय किंवा बीजवाहिनीत काहीही दोष नसतो. अशा वेळेस पुरुषांच्या रक्तशर्करा-मधुमेह, रक्तातील चरबी, कोलेस्ट्रेरॉल, ट्रायग्लिसराइड व शरीराचे वजन यांचा मागोवा घेणे आवश्यक ठरते. झोपडपट्टीत राहणाऱ्या, हलाखीचे जीवन जगणाऱ्या, खूप अशक्त दिसणाऱ्या कृश मजूर माणसाला, खंडीभर मुले असू शकतात. याउलट अतिधनवान मंडळींमधील पुरुषांना अपत्य सुख लाभत नाही. त्याला अनेक वेळा मधुमेह, स्थौल्य, फाजील चरबी अशी कारणे आढळतात. मधुमेह व रक्तातील फाजील चरबी ही कारणे माहीत असतानाही ही धनवान मंडळी जाहिरातींच्या भुलभुलैयाला बळी पडतात. कस्तुरी, केशर, सुवर्ण, रौप्य, त्रिवंग, शिलाजित अशा घटकद्रव्यांची रेलचेल असणाऱ्या औषधांचा वापर करूनही काहीच फलप्राप्ती होत नाही, असे दिसून येते. अशा व्यक्तींचे पोट मोठे असते. विशेषत: बेंबीखालचा भाग खूप मोठा, शुक्रेंद्रियांची वाढ तुलनेने अपुरी असते. अशा व्यक्तींकरिता ‘टॉमी इन चेस्ट आउट’ असा मूलमंत्र जपायला लागतो. त्याकरिता रक्तातील चरबी व साखर नियंत्रण आणण्यावर कटाक्षाने लक्ष द्यायला हवे.ज्यांची रक्तशर्करा दोनशेच्या आत आहे त्यांनी आरोग्यवर्धिनी, चंद्रप्रभा, गोक्षुरादी, त्रिफळागुग्गुळ व रसायनचूर्ण यांची मदत किमान महिनाभर घेतल्यास मधुमेह नियंत्रणात राहतो. दहा बेलाच्या पानांचा काढा एक वेळ घेणे, ज्वारीला प्राधान्य व चार वेळा विभागून जेवण उपयुक्त ठरते. रक्तशर्करा दोनशेचे वर असल्यास मधुमेह काढा भोजनोत्तर घ्यावा. कोलेस्टेरॉल, ट्रायग्लिसराइड अधिक असल्यास आरोग्यवर्धिनी, चंद्रप्रभा, गोक्षुरादी, त्रिफळागुग्गुळ, आम्लपित्तवटी, रसायनचूर्णाची मदत घ्यावी. चरबी खूपच असल्यास त्रिफळागुग्गुळ व गोक्षुरादिगुग्गुळ दुप्पट प्रमाणात घ्याव्या. मलावरोध समस्या असल्यास गंधर्व हरितकी, उदरवात समस्या असल्यास जेवणानंतर अभयारिष्ट किंवा पिप्पलादि काढा घ्यावा.
वैद्य प. य. वैद्य खडीवाले

जे देखे रवी..  विज्ञान
विज्ञानाची व्याख्या करता येत नाही, असे माझ्याकडचा जुना इ१्र३्र२ँ एल्लू८ू’स्र्ीं्िरं म्हणतो.  तिथे वापरलेला शब्द र्रूील्लूी असा आहे. विज्ञान ही एक मानसिक अवस्था किंवा वृत्ती आहे. विज्ञानाची आपल्या भाषेतील फोड विशेष ज्ञान अशी आहे आणि शिष किंवा शेष या शब्दांचा अर्थ ‘इतर’ असा जरी असला तरी वि प्रत्यय लावल्यामुळे त्याचा अर्थ भाग करणे, पृथक्करण करणे, व्याख्या मांडणे, अचूक वर्णन करणे असा दिला आहे म्हणून विशेष(वि). वैज्ञानिक अवस्था माणसामध्ये असते. माणूस आत्मकेंद्रित असतो म्हणूनच तो पतित होऊ शकतो आणि विज्ञानाची मांडणी करताना प्रतारणा करू शकतो आणि आपले सिद्धांत चुकीचे असले तरी खरे म्हणून दडपतो. असेही त्या एल्लू८ू’स्र्ीं्िरं  मध्ये लगेचच दुसरे वाक्य येते. भोंदूपणा ही वृत्ती धर्माशीच जोडलेली नाही.
विज्ञानाचा आवाका मोठा असला आणि त्यात प्रांत असले तरी त्याची पद्धत बदलत नाही. प्रत्यक्ष दर्शन घडत असेल तर फारच उत्तम, नसेल तर सूक्ष्मदर्शक आणि त्याहून अतिशय सूक्ष्म गोष्टींवर किरण सोडून त्याच्या अप्रत्यक्ष सावल्या या सगळ्या गोष्टींचा आधार विज्ञान घेते. एखादा जंतू एखाद्या रोगाला जबाबदार आहे, असे दिसले तरी तेवढय़ावर समाधान मानता येत नाही. तो जंतू त्या रोगी माणसात आहे हे दाखवावे लागते. त्या जंतूला प्रयोगशाळेत अन्न देऊन वाढवावे लागते. मग त्या जंतूंना जनावरात टोचून तोच रोग झाला आहे हे प्रत्यक्ष बघावे लागते आणि मग सिद्धांत तयार होतो. ज्या वेळी प्रत्यक्ष दर्शन घडण्याची शक्यता कमी असते तेव्हा होणाऱ्या क्रियांमधल्या भागांना चिन्हे किंवा प्रतीके देतात, मग त्यांची आकडेमोड करतात, समीकरणे मांडतात. समीकरणातून जी उत्तरे मिळतात त्याप्रमाणे क्रिया घडतात का, हे तपासून बघतात आणि मगच सिद्धांत मांडला जातो. पाण्यात टाकलेला फुलाचा एक कण पाण्यात खाली उतरताना नागमोडी वळणे घेतो,  कारण हे पाण्यातल्या अणूंच्या हालचालीमुळे होते, असे निरीक्षण इफडहठ नावाच्या वनस्पतिशास्त्रज्ञाने एकोणिसाव्या शतकात नोंदवले. पाण्यातले अणू सतत हलत असतात, कारण त्यांच्यात ऊर्जा असते. ही ऊर्जा उष्णतेच्या स्वरूपात असते, म्हणूनच खूप थंड पदार्थात सगळी हालचाल थांबते. ही हालचाल थांबल्यामुळे आकडेमोड करणे अवघड होते.
आकडेमोडीशिवाय हे विज्ञान सिद्ध होऊ शकत नाही. असल्या जाणिवा आणि कबुल्या विज्ञानच देऊ शकते. त्यावर पांघरूण घालून झाकून ठेवणे विज्ञान करीत नाही, करीत असेल तर ते विज्ञान नसते. इंग्रजीत ऊ्र२ू५ी१   असा शब्द आहे त्याची फोड उ५ी१ किंवा आवरण/ झाकण काढणे, बदलणे, खिळखिळे करणे (ऊ्र२) अशी आहे.
आकडेमोडीचा विषय निघाला आहे म्हणूनच उद्या गणिताबद्दल.
रविन मायदेव थत्ते

DD News Logo changed
‘हे तर सरकारी माध्यमांचे भगवीकरण’, डीडी न्यूजच्या लोगोचा रंग केशरी केल्यानंतर विरोधकांची टीका
byju s starts paying salary of march
‘बैजूज’च्या कर्मचाऱ्यांचे मार्च महिन्याचे वेतन मार्गी
12 different products in maharastra received gi tags
तुळजापूरच्या कवड्याच्या माळेसह कोणत्या उत्पादनांना मिळाले जीआय मानांकन? जाणून घ्या सविस्तर…
A minor girl commits suicide due to not being able to bear the pain of menstruation Mumbai
मुंबई: मासिक पाळीचा त्रास सहन न झाल्याने अल्पवयीन मुलीची आत्महत्या

आजचे महाराष्ट्रसारस्वत        २१ ऑक्टोबर
१९४३ > मराठी भाषेच्या अभिवृद्धीसाठी झटणारे लेखक बाबासाहेब घोरपडे यांचे निधन. मराठी ग्रंथकारांचे उत्तम ग्रंथ प्रकाशित व्हावेत यासाठी त्यांनी ‘इचलकरंजीकर ग्रंथमाला’ नावाचा प्रकाशन-यत्न सुरू केला. ‘ब्रिटनने हिंदुस्थानसाठी काय केले?’,., ‘दक्षिणेतील शेतीची सांपत्तिक स्थिती’ अशी पुस्तके त्यांनी लिहिली. त्याआधी, ‘सम्राट व सम्राज्ञाी यांच्या हिंदुस्थानातील प्रवासाचा ऐतिहासिक वृत्तान्त’ त्यांनी लिहिला होता.
१९७४ > कृष्णराव गणेश फुलंब्रीकर म्हणजेच मराठी नाटय़संगीतावर अमीट ठसा उमटवणारे ‘मास्टर कृष्णराव’ यांचे निधन.  ‘वंदे मातरम्’ची चाल तसेच ‘धर्मात्मा’, ‘माणूस’ या चित्रपटांचे संगीतही त्यांचेच. याच कृष्णरावांनी संगीतविषयक लिखाणही केले.. सात भागांतला ‘राग संग्रह’ त्यांनीच संकलित केला. त्यांच्या आठवणींचा ‘बोला अमृतबोलां’ हा संग्रह पुस्तकरूप झाला आहे.
१९७७ > हिंदू धर्माच्या विविध पैलूंचे आणि योगशास्त्राचे अभ्यासक श्रीपादशास्त्री किंजवडेकर यांचे निधन. मुक्ताबाईच्या ताटीच्या अभंगांचे संपादन त्यांनी केले, तसेच ‘भक्तीच्या वाटा’ हे सुगम पुस्तकही लिहिले. रुद्रार्थदीपिका, परिव्राजकाचार्य आदी त्यांची पुस्तके अभ्यासूंसाठी उपयुक्त ठरली. त्यांच्या अशा पुस्तकांची यादी बरीच मोठी आहे.
संजय वझरेकर