25 September 2020

News Flash

कुतूहल: ‘काळे सोने’

पेट्रोलियम खनिज तेलाचा रंग व स्वरूप पाहता, त्याला ‘काळे सोने’ असे संबोधिले जाते. त्याची वाढती गरज लक्षात घेता, वास्तविक ते औद्योगिक क्षेत्राला ‘जीवन देणारे रक्त’

| February 14, 2014 01:05 am

पेट्रोलियम खनिज तेलाचा रंग व स्वरूप पाहता, त्याला ‘काळे सोने’ असे संबोधिले जाते. त्याची वाढती गरज लक्षात घेता, वास्तविक ते औद्योगिक क्षेत्राला ‘जीवन देणारे रक्त’ असं म्हटल्यास वावगे न ठरो. फार फार जुन्या काळापासून प्राणी व वनस्पतींच्या जमिनीत गाडल्या गेलेल्या अवशेषातून हायड्रोकार्बन तेले निर्माण झाली व ती जमिनीत तसेच समुद्राच्या तळाशी काळ्या जाडसर तेलाच्या स्वरूपात साचली गेली. वाढत्या लोकसंख्येमुळे, माणसाची अन्नधान्याची गरज वाढत गेली. पिकांची योग्य वाढ होण्यासाठी व विपुल प्रमाणात अन्नधान्य पिकविण्यासाठी खतांची गरज असते, तर किडामुंगीपासून त्यांचे संरक्षण करण्यासाठी कीटकनाशके वापरावी लागतात. हे दोन्ही रासायनिक पदार्थ पेट्रोलियमजन्य रसायनापासून निर्माण केले जातात. पेट्रोलियम तेले ही कीटकांसाठी विष असतात. म्हणून तेले व पाणी यांच्या मिश्रणांचा फवारा मारला जातो. १९४३ साली डी.डी.टी. (डायक्लोरोडायफिनाइल ट्रायक्लोरो इथेन) हे प्रथम पेट्रोलियमजन्य कीटकनाशक वापरले गेले. त्यानंतर बी. एच. ई. (ब्रोमोहायड्रो इथेन), एल्ड्रिन, एंडोन यांसारख्या कीटकनाशकांचा उगम बेंझिन, ओलेफिन, सायक्लोपेन्टिलीन या खनिजजन्य रसायनापासून झालेला आहे. डायएल्ड्रिनसारखे रसायन कीटकापासून मेंढरांचे रक्षण करण्यासाठी वापरतात. त्याचप्रमाणे डायक्लोरोप्रोपेलीन, डायक्लोरोओपेन, इथिलीन डायब्रोमाइड इ. पेट्रोलियम रसायनांचा वापर जमिनीतील हानिकारक जीव-जिवाणूंचा नायनाट करण्यासाठी होतो. पेट्रोलियमपासून मिळणारी नॅफ्थालिक आम्ल व बुटेडिन युक्त रसायने कवकाचा बीमोड करण्यास उपयोगी ठरतात. केरोसिन व सफेद स्पिरिटचा वापर पिकांना हानी पोहचविणाऱ्या तणांचा नाश करण्यासाठी होतो. वनस्पतींना पोषक ठरणारी नायट्रोजन, फॉस्फरस व पोटॅशियम ही मूलद्रव्ये पेट्रोलियम खनिजातून मिळतात. खनिज वंगणातून मेण मिळविले जाते. त्याचा वापर मेणबत्त्या तयार करणे, कागद-कापड जलरोधक बनविणे, बूट पॉलिश करणे, खाद्यपदार्थाची  साठवणूक, रबरावरील प्रक्रिया, धातूवरील नक्षीकाम, मलम तयार करणे इ. अनेक ठिकाणी होतो. गंधक, डिर्टजट, नायलॉन, पॉलिस्टर, विविध प्रकारचे प्लास्टिक; अशा असंख्य पदार्थाच्या निमित्ताने रसायनांची खाण म्हणजे जमिनीतले हे काळे तेल होय.  
प्रबोधन पर्व: विद्वत्व आणि कवित्व यांतील फरक
‘‘बुद्धीची प्रगल्भता ही कल्पनाविलासाच्या पुढली मनाची दशा होय; म्हणजे आरंभीं कल्पनेचा विकास होऊं लागून त्यापुढें बुद्धि विकास पावूं लागतें. या गोष्टीचा अनुभव फार थोडक्यांस आहे. लहानपणीं मुलांस खुळखुळय़ाची, दिव्याच्या ज्योतींची, चांदोबाची जी मौज वाटत असतें, त्यास भुताखेतांच्या, राक्षसांच्या गोष्टींची फार मजा वाटते. काळोखांत जाण्यास तीं फार भितांत याचें कारण हेंच- कीं, त्यांची कल्पना मोठी जागृत असून विचारशक्ति बहुधा निद्रिस्त असते. .. .. पुष्कळांस स्वतच्या अनुभवावरून आठवत असेल कीं, लहानपणीं इसापनीतींतील गोष्टींची फारच मौज वाटून तात्पर्य वाचतांना डोकें  उठे; पण तो कल्पनेचा काळ जाऊन यापुढील दशा मनावर येऊं लागल्यामुळें हल्लीं वरच्या विरुद्ध अनुभव येतो; – म्हणजे गोष्टीपेक्षां तात्पर्यावर विशेष नजर असते!’’
– अशा प्रकारे प्रगल्भता आणि कल्पनाविलास यांच्यातील फरक स्पष्ट करून सांगत विष्णुशास्त्री चिपळूणकर विद्वान आणि कवी यांच्यातील सीमारेषा अधोरेखित करताना लिहितात –
‘‘ मोठा मोठा विद्वान झाला तरी जसा मनुष्य चित्रकलेंत किंवा गाय अथवा वादनकलेंत निपुण झालाच असें होत नाहीं, तशीच गोष्ट कवित्वाची होय. रत्नपारख्याची जशी एका प्रकारची नजर असते, ती शिकवून येणारी नव्हे व तशीच चित्रकलेचें किंवा वादनकलेचें मर्म समजण्याची शक्ति जशी एकाद्याचेच ठायीं ईश्वराने ठेविली असते; तशीच कवितेचीही गोष्ट आहे. पण इतकेंच नव्हे, अशा पंडितांस जातीनें कविता करतां येणार नाहीं हें तर आहेच; पण शिवाय तिची परीक्षा किंवा आस्वादन हेंही त्यास नियमानें शक्य असेलच असेंहि म्हणवणार नाहीं. याचीं उदाहरणे इंग्लंडांत मागल्या शतकात होऊन गेलेला जॉनसन् हा कांहीं अंशीं होय, व इकडे अलीकडील आपले जुने शास्त्री प्राय सर्वथा होत.. सारांश, कवित्वास, किंबहुना रसिकतेसही विद्वत्ता अगदी कारण नाहीं. उलटी ती मागें सांगितल्याप्रमाणें दोहोंस स्वभावत विरुद्धच होय, असेंहि म्हटलें पाहिजे. छ’
मनमोराचा पिसारा: स्ट्रेंजर्स इन द नाइट
साल १९६६ म्हणजे जेव्हा आपल्याकडे शम्मी ‘दिवाना मुझसा नहीं’. गात होता, शशी ‘परदेसियोंसे ना अंखिया मिलाना’ म्हणत होता, देव ‘तेरे मेरे सपने एक रंग है’ असं आळवत होता तेव्हाच फ्रँक सिनात्रा ‘स्ट्रेंजर्स इन द नाइट, टु लोनली पीपल’  म्हणून समस्त पाश्चात्त्य जगताला गुंगवत होता. ६०च्या दशकातली ती मदहोशी कुछ और होती. बस् प्यार ही प्यार बेशुमार. प्रेम, बंधुत्व, शांती आणि युद्धबंदीच्या वाऱ्यानं ते जग भारलेलं होतं.
सिनात्राची गाणी म्हणजे आपल्याकडची मराठी भावगीते, मधुर प्रेमगीते, त्यात प्रेमाची आळवणी, विरहाची वेदना आणि मीलनातली बेहोषी होती. काय सुंदर गाणी गायली सर्व जगानी.
स्ट्रेंजर्स इन द नाईट हे गाणं तब्बल चार महिने त्यांच्या (बिनाका मालेत) ग्रॅमी इ. बिलबोर्डवर अव्वल नंबर पटकावून बसलं होतं. त्याच्या लाखो रेकॉर्ड खपल्या आणि लोकप्रियतेच्य रेकॉर्ड तोडल्या. फक्त अडीच तीन मिनिटांच्या गाण्याच्या अखेरीस सिनात्रा डुबी डुबी डाडाडा, यायाया म्हणतो ते ऐकणं ते विलक्षण वाटतं. त्या ‘डुबीडू’चा अनुवाद टाळलाय आणि बाकीच्या गाण्याचा भावानुवाद अर्थात माय व्हॅलेंटाईन ललिताचा!
ये रात के हमसफर,
हम दो अनजाने;
मिले नजरसे नजर,
क्या होगे पराये अपने.
दिल में कशीश अजीबसी,
बेकसीकी मीठी चुभनसी
तडपे बेचैन जिया,
अरमानों का न बुझे दिया.
नजर तुम्हारी, कुछ यूं बुलाए
जलवे तुम्हारे कुछ यूं लुभाए
दिलसे मेरे अब रहा न जाए
जुस्तजू सिर्फ तुम्हे अपनाए
रात के हमसफर थे तनहा अकेले
हम तब तक जब थे न मिले
जब हुई मुलाकात खुल गये जसबात
छेडे दिल के तराने थे तब अनजाने
कैसे करता है प्यार ये दिलबेकरार
इष्क तो था बस नजर की दूरी
अनुराग भरे एक ताल की दूरी
रात के हमसफर ये हम दिवाने
जाने अनजाने बने प्यार के अफसाने
उस हंसी शामसे दिल मिले दिलसे
मिट गये फासले मिल गयी मंझिले
पहेले प्यारका नजराना
हुआ जनम जनम का आशियाना
(भावानुवाद :  ललिता बर्वे)
डॉ.राजेंद्र बर्वे – drrajendrabarve@gmail.com

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on February 14, 2014 1:05 am

Web Title: curiosity black gold
टॅग Curiosity
Next Stories
1 कुतूहल: पेट्रोलियम : खनिज तेले
2 कुतूहल – भारतीय रसायनशास्त्रज्ञ प्रा. द. बा. लिमये
3 कुतूहल – पांढरे शुभ्र दात
Just Now!
X