पानाचा कोंब बाहेर आला की त्याचा लाल-पोपटी रंग मनास मोहून टाकतो. तजेलदार कोवळी पानं पाहता पाहता वाढताना हिरवीगार होतात. थोडी जून झाल्यानंतर ती निबर होतात, तसेच त्यांचा गडद हिरवा रंग जरासा काळपट वाटू लागतो. कालांतराने ती पानं पिकून पिवळी पडतात, सुकत जातात आणि अखेरीस गळून पडतात. काही झाडांना विशिष्ट ऋतूंमध्ये नवीन पालवी फुटते तसेच काही ऋतूंमध्ये पिकलेली पानं जास्त प्रमाणात गळतात.
पानांमध्ये हिरव्या रंगाचं हरितद्रव्य, पिवळ्या, लाल रंगाचे कॅरेटोनाइड्स आणि पिवळा, लाल, नािरगी, कोनफळी, जांभळा अशा अनेक रंगछटांचे अ‍ॅन्थोसायॅनिन असतात. पण पानात सगळ्यात जास्त प्रमाण अर्थातच हरितद्रव्याचं असतं. वनस्पती पानांच्या साहाय्याने आपलं अन्न तयार करतात, ते प्रकाशसंश्लेषण क्रियेद्वारा. सर्व प्राणिमात्रांसाठीच नव्हे तर वनस्पतींच्या दृष्टीनेही महत्त्वाच्या या प्रकाशसंश्लेषण क्रियेत हरितद्रव्यांचा अतिशय महत्त्वाचा सहभाग असतो. अर्थातच हरितद्रव्याला जास्त महत्त्व आहे. त्याची निर्मितीही इतर रंगद्रव्यांच्या मानाने भरपूर प्रमाणात होते. त्यामुळे इतर रंगद्रव्यं झाकली जातात आणि पानांचा हिरवा रंग उठून दिसतो.  
जोपर्यंत पानाला प्रकाश मिळत आहे, पाणी मिळत आहे; तोपर्यंत हरितद्रव्य बनवण्याचं काम सुरू राहतं. पण पाण्याची पातळी कमी झाली किंवा प्रकाश कमी झाला की हरितद्रव्यांची निर्मिती कमी होत जाते.
पानांत विशेषत: देठांत पाणी पोहोचवणाऱ्या वाहिन्यांच्या (जलवाहिन्या) खाली पेशींचा एक थर असतो. पाणी जोपर्यंत पानात त्या पेशींपर्यंत येत असतं, तोपर्यंत हरितद्रव्याची निर्मिती चालूच राहते. पण पाणी येणं कमी झालं की हरितद्रव्याची निर्मिती कमी कमी होत जाते. हरितद्रव्यांचं काम मंदावत जातं. पानातली इतर रंगद्रव्यं दिसायला लागतात.  
    म्हणजे पानांत कॅरेटोनॉइड्स असतील तर पानं पिवळी किंवा नािरगी दिसतात. टॅनिन असेल तर पानं तपकिरी दिसू लागतात. पानाचा देठाकडचा भाग सगळ्यात शेवटी सुकतो. जेव्हा पाणी पानांत येणं पूर्णपणे थांबतं, तेव्हा इतर रंगद्रव्यंही आपलं कार्य थांबवतात आणि कालांतराने नष्ट होतात. देठ पूर्णपणे सुकलं की ते झाडापासून वेगळं होतं आणि गळून पडतं.

मनमोराचा पिसारा: वुडी अ‍ॅलन ब्रँड
विनोदाच्या अंगविक्षेपी आणि शाब्दिक ब्रॅण्डचा आपल्याला खूप परिचय आहे. कधी द्वय़र्थी शब्दयोजना, तर कधी कुशलपणे केलेली शब्दरचना यांच्या साहाय्याने आपल्याला असंस्कृत-सुसंस्कृततेनुसार मनात आपोआप हास्य उमटते. हा प्रत्येकाने अनुभव घेतलेला असतो.
कारुण्याचे अस्तर लावलेला विनोद म्हणजे हसता हसता डोळे पाणावणे, अशी आपली समजूत असते. अशा विनोदाला ‘उच्च कोटीचा’ यावर साधारण संमती असते. आता करुणा म्हणजे केवळ डोळे पाणावणे असे नाही. बऱ्याचदा त्या प्रकारच्या विनोदातून नकळतपणे वाचकाच्या मनात अपराधीपणा अथवा दुसऱ्या व्यक्तीबद्दल दयाभावना निर्माण होते. मनात अपराधीपणाची बोचरी जाणीव होणे यातून जीवनाबद्दलचे परिप्रेक्ष्य बदलते का? हा प्रश्नच आहे.
विनोदाच्या या पलीकडचा प्रकार म्हणजे केवळ पलायनवादी, अन्य जमातींचा स्टिरिओटाइप निश्चित करून त्यांच्या कंजूषपणा, बावळटपणा बिनडोकपणावर भरपूर विनोद केले जातात. व्हॉट्सअ‍ॅपवर त्याचे बारा महिने पीक आलेले असते. दोन घटकाही नव्हे तर फार तर निमिषभर हसू येते.
यातला आणखी एक प्रकार म्हणजे स्वत:चा एक स्टिरिओटाइप करून त्यावर विनोद करणे. आपण किती बावळट, वेडपट अथवा भोळसट यावर विनोद करणे. विनोदाचा म्हटला तर हा सोपा प्रकार, पण एकदा आपल्या व्यक्तिमत्त्वाचा ठसा निश्चित झाला की, लवकरच त्यात तोच तोचपणा येतो.
खरे पाहता, विनोदाचे अनेक प्रकार अजून आहेत. मुद्दा असा आहे की, त्या पलीकडे जाणारा विनोद आपल्या परिचयाचा नाही जो वुडी अ‍ॅलन ब्रँडेड विनोद.
वुडी अ‍ॅलन हा आवडता फिल्म मेकर. याचा परिचय मुख्यत: चित्रपटाद्वारे झाला तरी तो सिद्धहस्त लेखक होता. न्यूयॉर्क आणि प्लेबॉयमध्ये त्याने विपुल लेखन केले. त्याची अनेक पुस्तके आहेत, त्यातलीच एक ऑम्निबस. ‘कम्प्लीट प्रोज ऑफ वुडी अ‍ॅलन.’ वुडी अ‍ॅलन जन्माने ज्यू. सर्वसाधारण परिस्थितीच्या कुटुंबातील. तो वयात येताना अमेरिकेत ६०च्या दशकात विनोदाचा एक धम्माल प्रकार आकार घेत होता. स्टँड अप कॉमेडी शो या नावाने तो लोकप्रिय होता. वुडीने वयाच्या सतराव्या वर्षांपासून त्यासाठी लेखन केले आणि त्या लेखन आणि विनोद प्रकाराने ‘वुडी’चे व्यक्तिमत्त्व घडले. आजही अमेरिकेत आणि काही प्रमाणात युरोपात स्टँड अप कॉमेडी शो होतात, ते क्लब, रेस्तराँ अशा ठिकाणी. (आपल्याकडे तो स्टेज शो झालाय.) या विनोदाची जातकुळी वेगळी. काहीशी तमाशातल्या बतावणीसारखा. तत्कालीन सामाजिक परिस्थितीवर टिप्पणी, अतिशयोक्ती आणि बोचरी (वुडी अ‍ॅलनची नव्हे!) छोटी छोटी वाक्यं. चटकन लक्ष वेधून घेऊन ते टिकविणारी.
वुडी अ‍ॅलन ब्रँड विनोद विकसित होत गेला. कारण वुडी विनोदासाठी विलक्षण प्रसंग आणि प्लॉट निर्माण करीत असे. त्यामध्ये वुडीने स्वतंत्र नेबिश (नेभळट अर्थाचा यिडिश शब्द) व्यक्तिमत्त्व रेखाटले मार्केटिंग तज्ज्ञांच्या मदतीने. तो काळ बेबीवुमर्सचा आणि आकांक्षांचा होता. निरनिराळ्या कल्चर शॉकमध्ये अडकलेला वुडी हास्य पिकवीत असे. सदैव मानसोपचारांची गरज असलेला चिंताग्रस्त तरुण (स्वत: वुडी ३७ वर्षे मनोविश्लेषणतज्ज्ञाकडे जात असे.) अशा भूमिकेतून वुडी करमणूक करीत असे.
मृत्यू, सेक्स, जाचक कुटुंबव्यवस्था हे त्याचे आवडीचे विषय. मृत्यूबद्दल तो म्हणतो, माझे मृत्यूशी भांडण नाही, फक्त तो भेटायला येईल तेव्हा मला तिथे हजर राहायचे नाही! तो म्हणे, पुनर्जन्माचे ठाऊक नाही, पण मला पुन्हा जगायचे असेल तर मी विरुद्ध बाजूने सुरुवात करीन म्हणजे आधी फ्युनरल, मग वृद्धाश्रम, म्हातारपण आणि लवकरच तरुणपण. प्रेमात पडणे, भरपूर मजा मग गर्भाशयातील हेल्थ स्पासारखे नऊ महिने आणि अखेर रतिसुख (ऑरगॅझम) काय मस्त आयुष्य! वुडीने मृत्यू ही ‘थीम’ विलक्षण विनोदाने खुलवली. एका नाटुकल्यात ५७ वर्षांच्या सामान्य माणसाला मृत्यू भेटतो आणि तो माणूस अमेरिकन पद्धतीने मृत्यूबरोबर ‘डील’ करतो नि तीन पत्तीत त्याला हरवतो. त्याच्या विनोदात देवाला शोधणारी न्यूड मॉडेल भेटते आणि देवाच्या खुनाबद्दल अस्तित्ववाद्यांना पकडले जाते. वुडीचे पुस्तक बेडसाइड कम्पॅनिअन आहे. तो फिल्ममेकर म्हणून आवडतो, पण त्याहीपेक्षा लेखक म्हणून.
डॉ.राजेंद्र बर्वे drrajendrabarve@gmail.com

a man dancing with a box of fireworks on his head
धक्कादायक! हातात पेटवलेल्या फटाक्यांची पेटी धरून डान्स करत होता, पुढे असे काही घडले.. VIDEO व्हायरल
How to Make Home Made Instant Chilli Rice Dhokla with Leftover Rice Not The Tasty And Quick Recipe
रात्री उरलेल्या भाताचे काय करायचं असा प्रश्न पडलाय ? मग ‘हा’ पदार्थ बनवून पाहा; झटपट होणारी रेसिपी लगेच नोट करा
young woman saved a caged dog in a burning building shocking video goes viral on social media
जीवाची पर्वा न करता तरुणीने वाचवला पेटत्या इमारतीमध्ये फसलेल्या कुत्र्याचा जीव, VIDEO पाहून येईल अंगावर काटा
How to soften your face with Malai Dry Skin Care
Skin Care: दुधाची २ चमचे साय घ्या आणि उन्हाने काळवंडलेल्या-निस्तेज चेहऱ्यावर करा जादू

प्रबोधन पर्व: पुरुषांनो, त्या श्रेष्ठपदास शोभेल असे वर्तन करा!
‘‘देवाने मुळीच स्त्रीजाती नाजूक केली. म्हणून तिच्याकरिता ही मोठमोठाली घरे, दारे, वाडे, हवेल्या, बागबगीचे, धनद्रव्य, वस्त्रप्रावरणे, ऐषआराम दिले. तुम्हाला सडेफटिंगाला कोण पुसतो? पोर ना बाळ. कोठे झाडाखाली पडला, तरी सारखेच. तेव्हा ही अर्धागी शक्ती आहे. पाहू बरे तुम्हाला अर्धाग वायु होऊन अर्धे शरीर जर गेले, तर मग एका हाताने तुम्ही काय कराल? हे सर्व सृष्टिमात्र त्या आदिमाया महाशक्तीने उत्पन्न करून या स्त्रीजातीचे अंगी आपले सारखी चंचलता, सामथ्र्य देऊन हा संसाराचा गाडा तिलाच हाकण्यास लाविले. त्यातून तुमचे काम एकच, गाडा तुम्ही भरावा; पुढे तो हाकून त्याची सर्व व्यवस्था लावणे तिच्याकडे, अशी ही स्त्रीजाती एके प्रती शक्तीच आहे. तिच्यावाचून तुम्हाला शोभा, मोठेपणा, जय काहीच नाही. दूर कशाला? ज्या घरात ती नाही ते घर केवळ स्मशानासारखे ओसाड दिसते. मग तो एक मोठा सर्व संपत्तीने भरलेला राजवाडा का असेना; त्याला तीच कळा.’’
ताराबाई शिंदे असा स्त्रीमहिमा सांगत पुरुषांना सदवर्तनाचे पाठ ऐकवतात –
‘‘.. जेथे ती वास करील, ती मोडकी तीन वाशांची झोपडी जरी असली, तरी एक मोठे शोभिवंत मंदिरच दिसेल. या करिताच स्त्रियांना ‘लक्ष्मी’ असे म्हणतात. तेव्हा असा सुक्ष्म विचार केला, म्हणजे ज्या ब्रह्मदेवाने हा स्त्रीरूपी विषवत अमृततुल्य सर्व पुरुषमात्रास मोहरूपाने बंधन करणारा प्राणी उत्पन्न केला त्याबद्दल त्यास दोष न देता उपकार मानणे जरूर पडेल. ह्य़ा तर गायीपेक्षाही अशक्त आहेत. परमेश्वराने गायीस संरक्षणासाठी भाल्यासारखी तीक्ष्ण शिंगे व वाघासारख्याही बलाढय़ क्रूर पशुपासून दूर पळून जाण्याकरिता चार पाय व हरिणासारखी चपळ गती दिली आहे. पण यांना तर तेही नाही. तसेच तुम्हालाही काही शिंगे किंवा आत्मरक्षणाकरिता घोडय़ासारखे चार पाय व गती दिली नाही; परंतु फक्त एक विशाल बुद्धी देऊन त्याने तुम्हाला या सृष्टीतील सर्व प्राणिमात्रात पशुपक्ष्यात श्रेष्ठ केले आहे. तर तुम्ही त्या श्रेष्ठ-पदास शोभेल असे वर्तन करावे.’’