News Flash

वस्त्रोद्योगाची ओळख

एकंदरीत प्राचीन काळापासून भारतामध्ये वस्त्रे निर्माण करण्याची परंपरा असल्याचे स्पष्ट होते. एका चाटुश्लोकामधील हास्यरसपूर्ण श्लोकात म्हटले आहे.

| January 2, 2015 12:48 pm

एकंदरीत प्राचीन काळापासून भारतामध्ये वस्त्रे निर्माण करण्याची परंपरा असल्याचे स्पष्ट होते. एका चाटुश्लोकामधील हास्यरसपूर्ण श्लोकात म्हटले आहे.
किं वाससा इत्यत्र विचारणीयं
वास: प्रधानं खलु योग्यताय।
पीताम्बरं वीक्ष्य ददौ स्वकन्यां
 दिगम्बरं वीक्ष्य विषं समुद:
या सदरामधून समग्र वस्त्रविश्व व प्रक्रियांविषयी आपणास सजाण करणे हा हेतू आहे. या क्षणी वस्त्राच्या ऐतिहासिक पाश्र्वभूमीकडे कटाक्ष टाकणेही सयुक्तिक ठरावे. हे सदर सर्वसमावेशक व्हावे यादृष्टीने वस्त्रांसंबंधित सर्व क्षेत्रांतील तज्ज्ञ त्यांच्या अनुभवावर आधारित ज्ञान वाचकांसमोर मार्गदर्शनार्थ ठेवणार आहेत. या ज्ञानदानाचा केंद्रिबदू वस्त्र परिधान करणारा सामान्य माणूस असेल. आपल्या अवतीभवती माणूस नजर टाकेल तर त्याच्या लक्षात येईल की, दरवाजातील पायपुसणे, घरांचे पडदे, सोफ्याचे कापड, बठकीच्या खोलीतील टेबलावरचा टेबलक्लॉथ, दिवाणखान्यातील गालिचा ते स्वयंपाकघरातील अंगावरचा अॉप्रन, थंडीतील गरम वस्त्र ते उन्हाळ्यातील शीतवस्त्र, अंगावर घ्यायचे पांघरूण ते जुनी आजीची गोधडी, विविध रंगांतील बेडशीट, अंगावरचं उबदार जाकीट ते विजारीतला रुमाल सर्व काही बनतात या वस्त्रातून!
विज्ञान-तंत्रज्ञान आणि निसर्गातील वरदान ठरलेले प्रामुख्याने  कापसासारखे तंतू यांच्या संगमातून आपल्या दैनंदिन जीवनाचे किती मोठे विश्व वस्त्रनिर्मितीचा भाग आहे पाहिलेत? कापसाचे तंतू आपला प्रवास सुरू करतात मोठय़ा मशीनच्या अनंत भागांशी संवाद करत; रासायनिक प्रक्रियांशी एकात्मता साधत. या प्रवासात होणारे सर्व संस्कार ते विनातक्रार स्वीकारतात. स्वत:त हवे ते परिवर्तन घडवत मोठा प्रवास करत, वस्त्र म्हणून आपल्यापर्यंत पोहोचतात. या सर्व प्रवासाचा आढावा निरनिराळ्या स्तरांवर आपण घेणार आहोत
१.उत्पत्ती
२. उत्पादन
३. दर्जा
४. विपणन
५. ग्राहक
६. उपयुक्तता निकष
प्रत्येक स्तरावर मूळ तत्त्वावर मूल्यवृद्धी होत असते. मूल्यवृद्धीची दोन अंगे आहेत. प्रत्येक स्तरावर मूळ तत्त्वाचे स्वरूप बदलते त्यावर होणारा अर्थव्यय हे जसं मूल्यवृद्धीचं अंग आहे तद्वतच गुणात्मक मूल्यवृद्धी हे दुसरे अंग आहे. यांचा उपभोक्त्यावर व उपयुक्ततेवर होणारा परिणाम याविषयी ग्राहकाला सुजाण करणे हे एक प्रयोजन आहे.

बखर संस्थानांची असेही राजे.. अशाही तऱ्हा..
भारतीय संस्थानिक अधिकतर जसे प्रसासकीय कामात निष्क्रीय, खासगी जीवनात विलासी, मौल्यवान वस्तुंचे शौकीन तसे बरेचसे संस्थानिक लोककल्याणकारी, प्रजाहीतदक्षही होते. म्हैसूरच्या महाराजांनी आपल्या राज्यात धरणे, रस्ते, शैक्षणीक सुधारणा केल्या, बडोद्याच्या महाराजांनी राज्यात रस्ते, पाणी पुरवठा या बाबींकडे लक्ष पुरवून अंबेडकरांसारख्या होतकरु तरुणांना शिक्षणासाठी प्रोत्साहन दिले.
रिवा आणि ग्वाल्हेर संस्थानिकांनी गायन कलेला आणि गायकांना आश्रय दिला. बरेच संस्थानिक १८५७ च्या बंडात आणि नंतरच्या स्वातंत्र्य संग्रामात ब्रिटीश राजवटीच्या विरोधात उभे राहिले. पतोडी संस्थानचे नवाब इफ्तेकार अली खान आणि त्यांचे पुत्र नवाब मन्सूर अली खान हे भारतीय क्रिकेट चमूत आघाडीचे खेळाडू आणि कप्तान होते. त्याचप्रह्यणे संस्थानिकांनी स्वतच्या अस्तित्त्वासाठी ब्रिटीश राज्यकर्त्यांशी केलेले लांगूलचालन, सत्तेसाठी केलेली भाऊबंदकी यांचीही उदाहरणे आहेत.
या सर्व गोष्टींमुळे भारतीय संस्थानांचा इतिहास जसा अद्भूत झाला आहे तितकाच महत्त्वाचा इतिहास, ही संस्थाने आणि इतर भारतीय प्रदेशावर अडीचशे वष्रे वर्चस्व गाजवणार्या ईस्ट इंडिया कंपनी आणि ब्रिटीश राजवट यांचा झाला आहे.
टीचभर असलेल्या इंग्लंड या देशाने हजारो मल अंतरावरील खंडप्राय असलेल्या िहदुस्तानवर प्रथम आपले व्यापारी आणि पुढे राजकीय बस्तान बसवून अडीच शतके हा महाकाय प्रदेश आपल्या अधिपत्याखाली ठेवला. त्या काळात हजारोंच्या संख्येने असलेल्या आणि दूरवर पसरलेली भारतीय राज्ये आणि एक एक करून त्या सर्वाना आपल्या दावणीला बांधणारी ब्रिटिश ईस्ट इंडिया कंपनी आणि ब्रिटिश राजवट हे जगभरातील अनेक विचारवंतांच्या अभ्यासाचा विषय झाले आहेत.
सुनीत पोतनीस  sunitpotnis@rediffmail.com

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on January 2, 2015 12:48 pm

Web Title: curiosity textile business an introduction
टॅग : Curiosity,Textile
Next Stories
1 वस्त्रोद्योग लेख १ : वस्त्र- ईशावास्यम
2 कुतूहल – वाचकांचा प्रतिसाद-२
3 कुतूहल – वाचकांचा प्रतिसाद-१
Just Now!
X