छायाप्रकाशाचा अत्यंत कलात्मक वापर आणि साधेपणा, सौंदर्य यांचे अप्रतिम मिश्रण करणारा डच चित्रकार रेम्ब्रा याचा जन्म १६०६ साली अ‍ॅमस्टरडॅमजवळच्या लिडेन या लहान गावात झाला. चित्रकलेतले प्राथमिक धडे घेतल्यानंतर १६२५ साली रेम्ब्राने स्वतंत्र चित्रनिर्मितीला प्रारंभ केला. ‘स्टेिनग ऑफ स्टिफन’ हे त्याचं पहिलं चित्र. सुरुवातीच्या काळात त्याच्या कलाकृतींवर तत्कालीन डच चित्रकलेचा प्रभाव होता; परंतु रेम्ब्राने चित्रातील सतेज रंग आणि छायाप्रकाशाचा गाढ परिणाम अशा बारकाव्यांवर मेहनत घेऊन स्वतची चित्रकारिता पारंपरिक शैलीतून बाहेर काढली आणि स्वतची नवीन शैली तयार केली. ‘द मनी चेंजर’, ‘द प्रेझेंटेशन इन द टेम्पल’, ‘रुट्स’, ‘पोर्ट्ेट ऑफ निकोलस’ ही रेम्ब्राची सुरुवातीची गाजलेली काही चित्रं. व्यक्तिचित्रं, निसर्गचित्रं आणि मुद्रानिर्मिती यांमध्ये रेम्ब्राला विशेष स्वारस्य होतं. व्यक्तिचित्रांमध्ये पोशाखीपणा, भपका आणून रेम्ब्राने तत्कालीन चित्रकारितेला वेगळी दिशा दिली. ‘सेल्फ पोर्ट्ेट’ आणि ‘ख्राइस्ट पॅशन सीरिज’ ही रेम्ब्राची चित्रमालिका विख्यात झाली. १६३६ सालच्या ‘ब्लाइंडग ऑफ द सॅम्सन’ या त्याच्या चित्राने त्याला व्यक्तिचित्रकार म्हणूनही मान्यता दिली. ज्या एका चित्रामुळे रेम्ब्रा जगप्रसिद्ध चित्रकारांच्या यादीत जाऊन बसला ते ‘नाइट वॉच’ त्याने १६४२ साली काढलं. सोनेरी प्रकाश प्रतििबबित करणारी अद्भुत रंगसंगती हे या चित्राचं ठळक वैशिष्टय़. अ‍ॅमस्टरडॅममधील रिक्स म्युझियममध्ये रेम्ब्रा, व्हेरमीर, फ्रान्झ हॉल्स या अ‍ॅमस्टरडॅमच्या प्रसिद्ध कलाकारांच्या चित्रकृती ठेवलेल्या आहेत. त्यामध्ये रेम्ब्राची ‘नाइट वॉच’ बघण्यासाठी सर्वाधिक गर्दी असते. आयुष्यातील शेवटच्या वीस वर्षांत त्याने ख्रिस्ताची अकरा चित्रं काढली. या महान कलाकाराचा मृत्यू १६६९ साली झाला. रेम्ब्राचं घर आणि त्याची चित्रसामग्री हॉलंडच्या सरकारने ‘रेम्ब्रा म्युझियम’ या नावाने जतन करून ठेवलीय. ज्याच्या चित्रांची किंमत आज लक्षावधी डॉलर्स केली जाते तो हा महान चित्रकार स्वत: मात्र अत्यंत हलाखीच्या परिस्थितीत मरण पावला.

सुनीत पोतनीस

documentary on mangroves of maharashtra
आम्ही डॉक्युमेण्ट्रीवाले : पावलोपावली नवशिक्षण
light
विश्लेषण: डोळे दिपवणारी रोषणाई प्रदूषणकारक आहे का ?
Loksatta kutuhal Creator of artificial intelligence Judea Perl
कुतूहल: कृत्रिम बुद्धिमत्तेचे रचनाकार – ज्युडेया पर्ल
piyush goyal
लखलखत्या तरुण तेजांकितांचा आज गौरव; केंद्रीय वाणिज्य व उद्योगमंत्री पियूष गोयल प्रमुख अतिथी

sunitpotnis@rediffmail.com

 

जमिनीचे पुनप्र्रस्थापन : दगडाची खाण

पंचमहाभूतांपकी एक असलेली जमीन अतिशय महत्त्वाची निसर्गाची देणगी आहे. काही कारणांनी एकदा या देणगीचा ऱ्हास झाला की तिचे पुनप्र्रस्थापन होत नाही. प्रदूषित हवा व पाणी नसíगक प्रवाहीपणामुळे सुधारू शकतात, परंतु जमीन सुधारण्यासाठी, उत्पादनक्षम करण्यासाठी मानवी हस्तक्षेपाची जरुरी असते. निरनिराळ्या कारणांनी अनुत्पादित झालेल्या जमिनी पुनश्च उत्पादनक्षम करण्याच्या प्रयत्नात वनस्पतीचा कसा उपयोग करता येतो, हे काही उदाहरणांद्वारे समजून घेऊ.

दगडाची खाण :

रस्ते व इमारती बांधण्यासाठी खडी-दगडाची गरज असते. डोंगर-टेकडय़ा खणून ही गरज भागवली जाते. बहुतेक वेळा दगडाच्या खाणी – कित्येक एकर आकाराचे खड्डे – सोडून दिले जातात. अशा खड्डय़ात पडून गुरांचे, माणसांचे जीवघेणे अपघात होतात. खड्डय़ाच्या काठावर झोपडपट्टय़ा तयार होतात. वस्त्यांचे आणि पावसाचे दूषित सांडपाणी खाणीत साचते, त्यात पाणवनस्पती वाढून डासांचा उपद्रव सुरू होतो, रोगराई पसरते. हे सर्व टाळण्यासाठी खाण-परिसराचे पुनप्र्रस्थापन करून उपयुक्तता वाढवणे जरुरीचे ठरते. सुधारित परिसर कशासाठी वापरायचा ते सुरुवातीला ठरवणे जरुरीचे असते, त्या अनुषंगाने प्रथम आराखडा तयार करावा लागतो, कारण जमिनीचे पुनप्र्रस्थापन नेहमीच खर्चीक असते.

प्रथम पाण-वनस्पती काढून टाकाव्यात. गाळ उपसून काठावर साठवल्यास तो खत म्हणून नंतर वापरता येतो. खाण-खड्डय़ाच्या आतल्या परिघाने मातीचे उथळसे, कच्चे गटार आखून त्यात कर्दळ, अळू, रामबाण अशा जल-स्थलवासी वनस्पती लावाव्यात. खड्डय़ाबाहेरून येणारे पाऊसपाणी आणि वस्तीतून येणारे सांडपाणी गाळण्याचे कार्य ही झुडपे करतात. दगडखाणीचा तळ सहसा उंचसखल असतो. सखल भागात तळे साचून द्यावे व उंच भागात माती आणि गाळ टाकून जमीन तयार करावी. या जमिनीचा उपयोग खेळाची जागा, बागबगिचा यासाठी करावा. खाणीच्या वरच्या काठाने वृक्षराजी वाढवावी व तळे मासे, पाणकोंबडय़ा यासाठी राखून ठेवावे. तळ्यात दोन-तीन ठिकाणी कारंजी उभारल्यास पाण्यात ऑक्सिजनची कमतरता पडत नाही आणि माशांची पदास चांगली होते. साठवलेल्या गाळाचा उपयोग खत म्हणून करता येतो आणि तळ्यात साचवलेले पाणी पावसाळ्यानंतर बागेसाठी वापरता येते. पर्जन्यजल साठवण्याबरोबरच जवळच्या वस्तीसाठी उद्यानाचीही सोय होते.

प्रा. शरद चाफेकर

मराठी विज्ञान परिषद,

वि. ना. पुरव मार्गचुनाभट्टीमुंबई २२