डॉ. नॉर्मन अन्रेस्ट बोरलॉग. सारं जग त्यांना प्रेमाने ‘प्रोफेसर व्हीट’ (म्हणजे ‘प्राध्यापक गहू’ – गव्हाचार्य! ) म्हणायचे. बोरलॉगनी मेक्सिकोमध्ये आपल्या सहकाऱ्यांसमवेत तब्बल सोळा वष्रे गहू आणि त्यांच्या संकरित जातींचा विकास यावर संशोधन केलं.
१९४२ साली मिनिसोटा विद्यापीठातून डॉक्टरेट मिळवल्यावर नॉर्मन बोरलॉग यांनी दोन वष्रे वेिलग्टन इथे जीवाणूनाशकं आणि कवकनाशकांचा शेतीसाठी उपयोग करण्याच्या दृष्टीने संशोधन केलं. त्यानंतर मेक्सिकोत गव्हाचं उत्पादन वाढवण्यासाठी त्यांनी प्रयत्न केले. वेगवेगळ्या वातावरणात उगवू शकतील, ज्यांची रोपे लहान असतील; मात्र या रोपातील लोंब्या आणि त्यातले दाणे जास्त असतील, तसंच रोगप्रतिकारक असतील अशा गव्हाच्या जातींची निर्मिती त्यांना करायची होती. प्रयोग करण्यासाठी त्यांनी एकमेकांपासून एक हजार किलोमीटरपेक्षा जास्त अंतर असलेली आणि दोन्ही ठिकाणची उंची, मातीची संरचना, तापमान आणि प्रकाश इत्यादी बाबींच्या दृष्टिकोनातून वेगवेगळी असतील अशी मेक्सिकोमधली दोन ठिकाणं निवडली. या दोन्ही ठिकाणी त्यांनी सातत्याने दहा वष्रे गव्हावरील संकरणाचे प्रयोग केले. या प्रयोगांच्या आधारे त्यांनी गव्हाच्या काही संकरित जाती निर्माण केल्या. उदाहरणार्थ, ओरविले योगेल यांनी निर्माण केलेल्या नौरिक-१० या जपानी जातीचा संकर जास्त उत्पादन देणाऱ्या ब्रेबर-१४ या अमेरिकन गव्हाच्या जातीशी करण्यात आला. अशा प्रयोगांमुळे मेक्सिकोतल्या कृषी उत्पादनाचं स्वरूपच बदललं. गव्हाच्या उत्पादनाच्या बाबतीत मेक्सिको स्वयंपूर्ण तर झालाच, पण गव्हाची निर्यातही करू लागला.
१९६०च्या दशकात आपला देश अन्न समस्येशी झुंजत होता. काही भागात तर भीषण दुष्काळाची स्थिती होती. भारताच्या कृषिमंत्रालयाचे तत्कालीन सल्लागार डॉ. एम. एस. स्वामिनाथन यांनी नॉर्मन बोरलॉगना भारतात बोलावलं. बोरलॉग यांच्या सहकार्याने १९६६ साली अधिक उत्पन्न देणारी सुमारे अठराशे टन बियाणं मेक्सिकोतल्या मका व गहू विकास केंद्रातून आयात करण्यात आली. या बियाणांचा वापर केल्याने आपल्या देशात गव्हाच्या उत्पादनात साधारणत: दुपटीने वाढ झाली. १.२३ कोटी टनांवरून हे उत्पादन २.१ कोटी टनांपर्यंत वाढले. भारतात ‘हरितक्रांती’ झाली आणि १९७४ सालापर्यंत धान्य उत्पादनात आपण स्वयंपूर्ण झालो.
– हेमंत लागवणकर    
मराठी विज्ञान परिषद,
वि. ना. पुरव मार्ग,  चुनाभट्टी,  मुंबई २२  
office@mavipamumbai.org

जे देखे रवी..: रहस्यकथा भाग- ४ :  भांडे फुटले? तोतया?
ग्राहक मंचात त्या बयेने एक भन्नाट गोष्ट केली. स्वत:च्या स्तनांची स्वत:च काढलेली छायाचित्रे सादर केली. त्यावर व्रण दिसत होता. कोठल्याही शस्त्रक्रियेनंतर व्रण दिसतोच, पण त्या मूर्खीने आणखी एक कागद दाखविला. तो कागद होता सेंट जॉर्ज रुग्णालयाचा. त्या कागदावर लिहिले होते ‘यशस्वी शस्त्रक्रिया. हे मलम लावावे’ तीन न्यायाधीश होते. त्यातली एक बाई होती. ती मला म्हणाली, ‘पण या व्रणाचे काय’ मी एक आठवडा मागून घेतला. टिळक रुग्णालयातल्या एका रुग्णाच्या एकाच व्रणाची दहा तऱ्हेने छायाचित्रे काढली आणि पुढच्या तारखेला न्यायाधीशांना सादर केली. वैद्यकीय छायाचित्रण किती फसवे असू शकते याचा ती छायाचित्रे हा उत्तम दाखला होता. मग गरमागरमी झाली. मी म्हणालो, ‘हिला कोणीतरी तपासण्यासाठी न्यायालयाने डॉक्टर नेमावा.’ तेव्हा मग एक न्यायाधीश म्हणाले, ‘हिला कामा हॉस्पिटलमध्ये पाठवू या. मला हसू फुटले. ते आवरता आले नाही. त्यामुळे न्यायाधीश आणखीनच भडकले. अवमानना वगैरे बोलू लागले.’ तेव्हा मी त्यांना नमस्कार केला आणि म्हटले, ‘महाशय कामा रुग्णालयात प्रसूतीचे तज्ज्ञ असतात. हिला आपण मुंबईतल्या तिन्ही शैक्षणिक महाविद्यालयात पाठवून प्लास्टिक सर्जरीच्या प्राध्यापकांकडून तपासूया. पण ती ऐकेना म्हणाली, ‘मी पुरुष सर्जनकडून तपासणी करून घेणार नाही.’ काय बया होती! शस्त्रक्रियेसाठी माझ्या गळ्यात पडली आणि आता हे नाटक. मग मी जमालगोटय़ाचा वापर केला. मी म्हणालो, ‘या तिन्ही रुग्णालयात विभागप्रमुख स्त्रिया आहेत, तेव्हा स्त्रियांबद्दल अतीव कणव असलेल्या आणि ग्राहकांना न्याय मिळाला पाहिजे, या उदात्त हेतूने स्थापन झालेल्या मंचाला माझे म्हणणे पटले आणि पुढची तारीख पडली.’ त्यापुढच्या तारखेला दोन तऱ्हेने त्या रहस्याचे भांडे फुटले. एक तर ती म्हणाली, ‘रवीन थत्ते या अखिल भारतीय नाव असलेल्या माणसाच्या विरुद्ध कोणी साक्ष देणार नाही. तेव्हा मी तपासणीच करून घेणार नाही’ आणि दुसरी विलक्षण गोष्ट माझ्या लक्षात आली ती अशी की, ज्या नवऱ्याला तिने माझ्या दवाखान्यात आणला होता आणि जो शस्त्रक्रियेनंतर एकदाच मला भेटला होता त्या नवऱ्याऐवजी कोणीतरी भलताच माणूस त्या दिवशी तिचा नवरा म्हणून तिच्या शेजारी बसला होता. तो भलताच नव्हता तर तो खरा नवरा असणार. त्याला न सांगताच हिने काहीतरी भूलथापा मारून शस्त्रक्रिया केली असणार आणि कोणीतरी नातेवाईकाला माझ्यासमोर तात्पुरता उभा केला असणार; पण माझ्याकडे याचा काहीच पुरावा नव्हता, तेव्हा मी गप्प बसलो. त्या दिवशीची सुनावणी अखेरची ठरली आणि निकाल राखून ठेवण्यात आला.
– रविन मायदेव थत्ते
rlthatte@gmail.com

Arvind Kejriwal
अरविंद केजरीवालांची शुगर लेव्हल ३२० वर, अखेर तुरुंगात पहिल्यांदाच दिलं इन्सुलिन
Randeep Hudda Post
सरबजीत सिंग यांच्या मारेकऱ्याची हत्या, रणदीप हुडाने मानले अज्ञात मारेकऱ्यांचे आभार, पोस्ट शेअर करत म्हणाला..
Rameshwar Cafe Bomb blast
Bengaluru: रामेश्वरम कॅफे बॉम्बस्फोट प्रकरणी भाजपा कार्यकर्त्याला अटक, संशयितांशी संबंध असल्याचा दावा
Benjamin Basumatary sleeping on cash
नोटांच्या ढिगाऱ्यावर झोपलेल्या नेत्याचा फोटो व्हायरल; भाजपाच्या मित्रपक्षाने म्हटले…

वॉर अँड पीस : रक्ताचे विकार : भाग-४
अनुभविक उपचार – १) नाकातून रक्त येणे – नाकांत पुन: पुन: चांगले तुपाचे थेंब सोडणे. संडासला साफ होत नसल्यास त्रिफळा किंवा गंधर्वहरीतकी एक चमचा गरम पाण्याबरोबर घ्यावे. सार्वदेहिक उष्णतेकरिता शतावरीघृत २चमचे दोन वेळा घ्यावे. प्रवाळ कामदुधा चंदनादि प्र.३ गोळ्या २ वेळा घ्याव्यात. २) डोळे लाल होणे – वरीलप्रमाणे शतावरीघृत व गोळ्या घ्याव्यात. डोळ्यात निरसे दुधाचे थेंब वा तूप पातळ करून सोडावे. डोळ्यांभोवती चंदनाचा पातळ लेप  पुन:पुन्हा लावावा. तळपायांना काशाच्या वाटीने शतघौतघृत चोळावे. ३) रांजणवाडी – प्रवाळ, कामदुधा व चंदनादि प्र. ३ गळ्या दोन वेळा घ्याव्यात. रात्रौ त्रिफळा १ चमचा कोमट पाणी व तुपाबरोबर घ्यावे. रांजणवाडीच्या जागेवर बाहेरून चंदनगंध किंवा दशांगलेप गार पाण्यात, पातळ ठिपका पुन:पुन्हा लावावा. ४) थुंकीतून रक्त येणे – प्रवाळ, लाक्षादिगुग्गुळ प्र. ३ गोळ्या दोन वेळा घ्यावात. त्याबरोबर लाक्षादिघृत दोन चमचे घ्यावे. कोरडा खोकला असल्यास एलादिवटी ६ ते ८ गोळ्या चघळाव्या. थकवा, खोकला  असल्यास वासापाक ३ चमचे सकाळ, सायं. घ्यावा. क्षय विकार असतांना, शतपुटी अभ्रकभस्म, मौक्तिक भस्म व चौसष्ठपिंपळी चूर्ण प्रत्येकी २५ मि.ग्रॅ. अस्सल वंशलोचन चूर्ण व शृंगभस्म ५० मि. ग्रॅ. घोटून वासापाकासह चाटण दिवसभर घ्यावे. ५) अंगावर लाल ठिपके- प्रवाळ, कामदुधा, चंदनादि प्र. ३ गोळ्या दोन वेळा रिकाम्यापोटी घ्याव्यात. उपळसरी सकाळी एक चमचा घ्यावे. ६) संडासवाटे रक्त पडणे – प्रवाळ, कामदुधा चंदनादि प्र. ३ गोळ्या दोन वेळा; अस्सल नागकेशर चूर्ण अर्धा ग्रॅम, लोणी साखरेबरोबर दोन वेळा घ्यावे. गुदभागास शतधौतघृत लावावे. ७) रक्तस्राव न थांबल्यास – क्रं. पाचप्रमाणे औषधे, याशिवाय शतावरीघृत किंवा अर्जुनसिद्धघृत दोन चमचे दोन वेळा घ्यावे. ८) रक्ताचा कर्करोग – िपपळलाख, बिब्याचे तेल, कोरफडगर, शिलाजीत, लसूणगर एकत्र खलून बनविलेल्या गोळ्या; सकाळ सायंकाळ ३-३ घ्याव्यात. कोरफडगर एक कपभर खावा.
– वैद्य प. य. वैद्य खडीवाले

आजचे महाराष्ट्रसारस्वत : १० जून
१८६२ > शिकारकथांचे लेखक विष्णू गोविंद चिपळूणकर यांचा जन्म. ‘कृष्णसार (काळवीट) अथवा हरणाची शिकार’, ‘मृगया कुतूहल’ (बडोदेनरेश सयाजीराव महाराज यांच्या वाघाच्या शिकारीविषयी), ‘बनवराहघात’, ‘हिंदुस्थानातील सर्प’ अशी पुस्तके त्यांनी लिहिली. शिवचरित्रावर दोन व संभाजीराजांवर एक नाटकही अशी तीन नाटकेही त्यांनी लिहिली होती.  
१९०४ > विचारवंत लेखक पुरुषोत्तम गणेश सहस्रबुद्धे यांचा जन्म. ‘माझे चिंतन’ हे त्यांचे पुस्तक सर्वाधिक गाजले. ‘विज्ञानप्रणीत समाजरचना’, ‘भारतीय लोकसत्ता’, ‘लोकसत्तेला दंडसत्तेचे आव्हान’, ‘राष्ट्रधर्म’, ‘हिंदू समाज’, ‘महाराष्ट्र संस्कृती’, ‘इहवादी शासन’, ‘केसरीची त्रिमूर्ती’ आदी वैचारिक पुस्तके, लोकहितवादींच्या शतपत्रांचे संपादन, तसेच ‘साहित्यातील जीवनभाष्य’ ही समीक्षा, दोन नाटके आणि ‘लपलेले खडक’ हा लघुकथासंग्रह त्यांनी लिहिला. १९८५ साली पु.ग. निवर्तले.
१९८९  > ‘स्त्रीजीवनाची नवी क्षितिजे’, ‘स्त्रीजीवनविषयक प्रश्न’ अशी पुस्तके, अनेक कथासंग्रह तसेच ‘शुभमंगल सावधान’ कादंबरी लिहिणाऱ्या कमलाबाई विष्णू टिळक यांचे निधन. ‘झोपडपट्टीतील झिपऱ्या’ व ‘सारेच खोटे’ ही पुस्तके त्यांनी कुमारांसाठी लिहिली.
– संजय वझरेकर