तामिळनाडूतील चेन्नईपासून ११५ कि.मी.वर असलेले वेल्लोर जिल्ह्य़ातील अरकाट येथे पूर्वी नवाबाचे राज्य होते. पंधराव्या शतकाच्या सुरुवातीला हा प्रदेश विजयनगरच्या साम्राज्यात अंतर्भूत होता. सोळाव्या शतकात विजयनगर साम्राज्याच्या अस्तानंतर त्यांचे मांडलिक असलेल्या मदुरा, तांजोर आणि कांची या राज्यांनी गोवळकोंडा आणि विजापूर या राज्यांचे मांडलिकत्व स्वीकारले. पुढे मोगल बादशाह औरंगजेब याने हा प्रदेश घेऊन १६९२ साली झुल्पिकार अली याला मोगलांचा सुभेदार नवाब या पदावर नियुक्त करून अरकाट येथे त्याचे मुख्यालय आणि राजधानी केली. तत्पूर्वी तांजोर ऊर्फ तंजावरचा काही भाग नायकांच्या ताब्यात होता. तो १६७४ मध्ये व्यंकोजी भोसले याने घेऊन तंजावरला भोसले घराण्याचे राज्य स्थापन केले. अरकाट नवाब झुल्पिकार अली हा मूळ दुसरा खलिफा उमर बिन अल खताब यांचा वंशज असल्यामुळे मुस्लीम लोकांमध्ये नवाबाला महत्त्व होते. १७०७ साली औरंगजेबाच्या मृत्यूनंतर मोगल सत्ता उतरणीला लागली. तत्कालीन अरकाट नवाब सादत अल्लाह (१७१०-१७३२) याने अरकाटच्या स्वतंत्र राज्याची घोषणा केली. नवाब सादत आणि त्याच्या नंतरचा नवाब दोस्त अली यांनी अरकाट राज्यक्षेत्राचा विस्तार केला. १७३६ साली त्यांनी मदुराचे राज्य घेऊन अरकाटमध्ये सामील केले. पुढे १७४० साली मराठय़ांनी अरकाट राज्यातील दमालचेरी येथे नवाबावर आक्रमण केले. दमालचेरीच्या िखडीत मराठे आणि अरकाटच्या फौजांमध्ये झालेल्या युद्धात नवाब दोस्त अली आणि त्याचा मुलगा हसन अली मारले जाऊन त्यांचा पराभव झाला. दमालचेरीनंतर मराठय़ांनी अरकाटवर विनासायास कब्जा केला.
सुनीत पोतनीस – sunitpotnis@rediffmail.com

कुतूहल – चाणाक्ष वस्त्रप्रावरण प्रकार – १
इलेक्ट्रॉनिक वस्त्रप्रावरणे चाणाक्ष वस्त्रप्रावरणांपेक्षा वेगळी असतात. इलेक्ट्रॉनिक्स वस्त्र फक्त धारण करतात. परंतु चाणाक्ष वस्त्रप्रावरणांमध्ये इलेक्ट्रॉनिक्स उपकरणे त्यांच्यात एकात्म असतात. याचा अर्थ असा की इलेक्ट्रॉनिक्स उपकरणांचे सर्व गुणधर्म वा त्यांची अतिकुशल कार्यक्षमता चाणाक्ष वस्त्रप्रावरणांमधे अंतर्भूत व स्वयंसक्रिय असतात. चाणाक्ष वस्त्रप्रावरण म्हणून विकली जाणारी काही वस्त्रप्रावरणे ही इलेक्ट्रॉनिक्स उपकरणांचे वेष्टन केलेली अतिसामान्य वस्त्रप्रावरणे असतात. त्यांच्यात स्मार्ट वस्त्रप्रावरणांची क्षमता अंतर्भूत स्वयंसक्रिय नसते. वस्तसर्व इलेक्ट्रॉनिक्स उपकरण व साधनांना कार्यप्रवणतेसाठी ऊर्जा लागते. वस्त्रप्रावरणामध्येच ऊर्जा सर्जन व जरुरीपुरती वा जरूर पडेल तेव्हा त्याचा विनिमय याचे संयोजन (डिझाइन) हे स्मार्ट वस्त्रप्रावरणांपुढे मोठे आव्हान आहे. स्टॅन्फोर्ड विद्यापीठाने कागदावर कार्बन नॅनो टय़ुबच्या शाईने बॅटरी व इलेक्ट्रोड विकसित करण्याची पद्धत शोधली आहे. तिचाच उपयोग करून अत्यंत परिणामकारकरीत्या चाणाक्ष वस्त्रप्रावरणामधे ऊर्जा साठवण यशस्वीरीत्या घडवून आणता येईल. पिझो इलेक्ट्रिक साधनांचा उपयोग करून ऊर्जा सर्जन संभव आहे. पिझो इलेक्ट्रिक साधने गत्यात्मक हालचालींपासून किंवा फोटोव्होल्टॅइक सेलपासून ऊर्जा तयार करू शकतात.
प्रवेश्य उपकरणे (इनपूट डिव्हायसेस)- ज्या वस्त्रप्रावरणांमध्ये आयाम संवेदनशीलता जी हालचाल दबाव, ताण, गती, लवचिकता यांचे अनुमान करू शकते वा अंदाज घेऊ शकते अशा क्षमतापूर्ण कोपरे अंतर्भूत असलेली वस्त्रप्रावरणे पुश बटन वा या संबंधित इलेक्ट्रोमायोग्रॅम, इलेक्ट्रोएन्सिफॅलोग्रमसारख्या प्रवेश्य उपकरणांमधे वापरली जातात.
दर्शनिक उपकरणे (डिस्प्ले डिव्हायसेस)- या उपकरणांमधे स्पिकर्स, कर्णे, लाइट एमिटिंग डायोड यांचा समावेश होतो. तसेच इलेक्ट्रोलुमिनिसेंट धागे किंवा जे धागे ऑर्गनिक लाइट एमिटिंग डायोड यांचा समावेश होतो. कंपायमान होणारे वा इलेक्ट्रोटॅक्टाइल म्हणजे निरोप (फीड बॅक) देणाऱ्या उपकरणांचाही यात समावेश होतो.
सेिन्सग डिव्हायसेस : पेराटेक क्वांटम टनेलिंग कॉम्पोझिट हे वस्त्रप्रावरण एक सेमी कंडिक्टग वस्त्र आहे. जेव्हा वस्त्र सल अवस्थेत असेल तेव्हा ते इन्सुलेटर म्हणून काम करते. जेव्हा ते आकारहीन होते व आकार/दबावामुळे विकृत व्हायला सुरुवात होते तेव्हा वस्त्र वीजप्रवाहभारित होण्यास अनुकूल होते. जसजसा दबाव वाढतो, तसतसा विरोध क्षीण होत जातो.
इलेक्टेक्स कीबोर्डमध्ये हे वापरले जाते. हा वस्तप्रावरणाधिष्टित कीबोर्ड हाताळण्यास अत्यंत सोयीस्कर. प्रवासात गुंडाळून ठेवता येतो, त्यामुळे जागा कमी लागते.
श्वेतकेतू (डोंबिवली) मराठी विज्ञान परिषद, वि. ना. पुरव मार्ग, चुनाभट्टी, मुंबई २२ office@mavipamumbai.org