ऑक्सफर्ड हे युरोपातील सर्वात जुने विद्यापीठ. ते इ.स. १०९६ मध्ये सुरू झाले. ऑक्सफर्ड आणि केंब्रिज ही लंडनची दोन विद्यानगरे. या दोन्हींना एकत्रित ‘ऑक्सब्रिज’ असाही शब्द वापरला जातो. ऑक्सफर्ड सुरू झाल्यावर काही वर्षांनी पॅरिस विद्यापीठाची स्थापना झाल्यावर लंडनच्या विद्यार्थ्यांमध्ये ऑक्सफर्डऐवजी पॅरिसला जाण्याची टूम निघाली. ऑक्सफर्ड ओस पडू लागल्यामुळे हेन्री दुसरा याने ११६७ साली विद्यार्थ्यांनी पॅरिसला जाण्यावर बंदी घातली. त्यानंतर विद्यार्थ्यांचे प्रमाण वाढून ऑक्सफर्ड या शैक्षणिक संस्थेचे विद्यापीठात रूपांतर झाले. पहिली साधारणत: दोन तीन शतके ऑक्सफर्डचे विद्यार्थी अत्यंत बेशिस्त होते. टाऊन आणि गाऊन म्हणजे गावकरी आणि विद्यापीठीय विद्यार्थी यांच्यात भांडणे, मारामाऱ्या हे नित्याचेच. तेराव्या शतकात दोन्ही बाजूंच्या लोकांमध्ये धनुष्यबाणाने लढाया जुंपल्या. काहींचे खून झाले. विद्यार्थ्यांची आरडाओरड, रात्री भटकणे यांचा नागरिकांना त्रास होई, मद्यालयात भांडणे होत. ऑक्सफर्डच्या आसपास कोल्हे, डुकरे फिरत. विद्यार्थी त्यांची शिकार करीत, मद्यपान-धूम्रपानावर बंदी असूनही ते सर्रास चालत असे. एका विद्यार्थ्यांवर डुक्कर धावून आल्यावर त्याने आपल्या हातातला ऑरिस्टॉटलचा ग्रंथ डुकराच्या नाकात खुपसला! त्या काळात तेथील शिक्षणाची पातळीही सुमार होती.
मात्र १९ व्या शतकात ऑक्सफर्डचे चित्र बदलले.
– सुनीत पोतनीस
sunitpotnis@rediffmail.com
वनस्पतींचे भौगोलिक वितरण
भौगोलिक स्थितीनुसार निर्माण झालेल्या वनस्पती वितरणाचे दहा विभाग पडतात.
१) उत्तर हिमालयीन प्रदेश – सूचीपर्णी वृक्षांपकी पायनस ‘रोक्सबुर्गी’ हे वृक्ष साधारण ९०० ते १७०० मीटर उंचीपर्यंत आढळतात.
२) पश्चिम हिमालयीन प्रदेश : १५०० मीटर पर्य़त घावड्याचे वृक्ष आढळतात. १५०० मीटर – ३००० मीटपर्यंत पायनस व स्रिडस प्रजाती दिसून येतात. यापेक्षा वरच्या भागात पायनस आणि गेगार्डीयाना वृक्ष आढळातात.
३) मध्य हिमालयीन प्रदेश: समुद्रसपाटीपासून कमी उंचीवर बांबू आणि फायकसच्या प्रजाती आणि १५०० मीटरच्या वर क्यूरेकस आणि वृक्ष प्रजाती वाढतात.
२)पूर्व हिमालयीन प्रदेश : या प्रदेशात पर्जन्याचे प्रमाण अधिक असल्याने टरमानालिया, अल्बिझिया आणि इतर वनस्पती १८०० मीटपर्यंत असतात. पुढील ३००० मीटपर्यंत समशीतोष्ण प्रकारातील वनस्पती आढ्ळतात. उदा जेनिपेरस, क्रिप्टोमेरिया, रुंद पानाच्या वनस्पतींच्या प्रजाती आढळतात.
५) सिंधूचे मदान: या भागात हरियाणा, पंजाब, राजस्थानचा शुष्क प्रदेश आणि कच्छ्चा काही भाग येतो. अतिउष्ण आणि कोरडे हवामान वार्षकि पज़्र्‍ान्य ७०० मि. मी.पेक्षा कमी असल्याने त्या हवामानाला साजेशा वनस्पती त्या भागात बघायला मिळतात. उदा. अल्काषिया, सालवॅडोरा, प्रोसोपिस इत्यादी.
६) गंगेचे मदान : या भागात बिहार, बंगाल, यांचा काही भाग येतो. या मदानातील भूभाग शेतीच्या लागवडीखाली आहे. पर्जन्य ७००- १५०० मि मी. जंगलात अकाशियाच्या प्रजाती आढळतात.
७) आसामचा प्रांत : या प्रदेशात दमट आणि उष्ण हवामानाचे प्रमाण जास्त आहे. येथील वृक्ष रुंद पानांचे आणि सदाहरित प्रकारातले असतात. उदा मुसा, डिलेनिया,
डोंगराळ भागात उंच ठिकाणी पायनस, खासियाना ही झाडे आढळतात.
८) मध्य भारत आणि दख्खनचे पठार : मध्य प्रदेश गुजरात, ओरिसा, तामिळनाडूचा सामावेश आहे,. हा भाग शुष्क आणि उष्णतेचे प्रमाण जास्त असलेला आहे. येथे प्रामुख़्याने साग जास्त प्रमाणात आढळतो. पण ज्या भागात पज़्र्‍ान्याचे प्रमाण जास्त आहे तेथे साल वृक्षाची जंगले आहेत.
९) मलबार प्रदेश : यांत पश्चिम घाट आणि केरळचा समावेश आहे.
१०)अंदमान विभाग : पावसाचे प्रमाण उत्तम असल्याने उच्च प्रतीचे जंगल आहे. डिप्टेरोकारपस् जातीचे वृक्ष आढळतात.
– डॉ. सी. एस. लट्ट (मुंबई)
मराठी विज्ञान परिषद,
वि. ना. पुरव मार्ग, चुनाभट्टी, मुंबई २२ office@mavipamumbai.org

Nagpur, Jyoti Amge, World's Shortest Woman, World's Shortest Woman voting, World's Shortest Woman in nagpur, lok sabha 2024, polling day, nagpur news, guinness book
जगातील सर्वात कमी उंचीच्या महिलेचे नागपुरात मतदान
nagpur, Technical Fault, evm machine, Delays Polling by 1 Hour, jai mata school, dighori polling station, polling day, lok sabha 2024, election 2024, election news, polling news, ngpur news, marathi news,
नागपूर : ईव्हीएममध्ये तांत्रिक बिघाड,’येथे’ मतदानाला एक तास उशिरा सुरुवात
Peter Higgs predicted the existence of a new particle
‘गॉड पार्टिकल’चा शोध लावणारे नोबेल विजेते शास्त्रज्ञ पीटर हिग्ज यांचं निधन, वयाच्या ९४ व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास
Suicide attempt of college girl due to harassment incident in Bharti University campus
छेडछाडीमुळे महाविद्यालयीन युवतीचा आत्महत्येचा प्रयत्न, भारती विद्यापीठ परिसरातील घटना