कोंबडीने अंडय़ास सतत २१ दिवस उब दिल्यास पिल्लांची पूर्णत: वाढ होते आणि पिल्लू अंडय़ाबाहेर येते. कुक्कुटपालनात सारख्या वजनाची (५५ ग्रॅम) एक आठवडा वयाची अंडी उबवणुकीसाठी वापरावीत. अंडी उबवण्याच्या दोन पद्धती आहेत.
अ)नसíगक पद्धत : यात देशी खुड (अंडी देणे बंद झालेल्या) कोंबडीखाली दहा ते बारा अंडी बसवली जातात. ती अंडय़ांना ऊब पुरवते, अंडी हलवते (घोळते). नसíगक उबवणुकीसाठी टोपली किंवा खोक्याची गरज असते. टोपलीत उसाचे पाचट किंवा वाळलेले गवत अंथरून मध्यभागी खोलगट भाग करून त्यात अंडी ठेवली जातात. त्यावर कोंबडी बसवली जाते. व्यापारी दृष्टीने या पद्धतीचा फारसा उपयोग होत नाही. कारण एका वेळेस कमी (१० ते १२) पिल्ले मिळतात.
ब) कृत्रिम पद्धत : या पद्धतीत इनक्युबेटर यंत्राद्वारे एकाच वेळी भरपूर अंडी उबवता येतात. इनक्युबेटर रात्रंदिवस चालू राहावे लागते. उबवणुकीच्या काळात पाचव्या ते सातव्या  दिवशी आणि १४ ते १८व्या दिवशी खराब, जुनी, अफलित अंडी ओळखून इनक्युबेटरमधून काढून टाकावी लागतात.
यंत्रामध्ये ऊब नियंत्रण स्वयंचलित यंत्रणेद्वारे केले जाते. स्वच्छ, ताज्या हवेचा पुरवठा केला जातो. अंडय़ातून बाहेर पडणारा कार्बन डायॉक्साइड वायू बाहेर टाकण्यासाठी यंत्राच्या वरच्या भागात छिद्र असते. आद्र्रता कायम ठेवण्यासाठी यंत्रात भांडय़ामध्ये पाणी ठेवले जाते. अंडय़ातील बलक आतील पापुद्रय़ाला चिकटून वाढत्या गर्भाला इजा होऊ नये, म्हणून अंडी दिवसातून तीन-चार वेळा हलवावीत. लहान यंत्रामध्ये अंडी हाताने फिरवतात. मोठय़ा यंत्रात स्वयंचलित यंत्रणेद्वारे प्रत्येक तासाला अंडी फिरवली जातात.
हे यंत्र रॉकेल किंवा विजेवर चालते. ऊब देण्यासाठी साधारणत: १०१-१०२ अंश फॅरेनहाइट तापमान नियंत्रित केले जाते. कमी तापमान असल्यास पिल्ले ओलसर होऊन उशिरा जन्मतात. उष्णता जास्त असल्यास पिल्ले लवकर जन्मतात. यंत्रात सापेक्ष आद्र्रता साधारणत: ७५-८० टक्के ठेवली जाते. १८ दिवसांपर्यंत पिल्लांची पूर्ण वाढ झालेली असते, म्हणून त्यानंतर आद्र्रता व ऊब वाढवावी लागते, तसेच अंडी फिरवणे बंद करावे लागते. पिल्ले जन्मल्यानंतर ४८ तासांपर्यंत पिवळा बलक हेच अन्न त्यांच्या शरीरात शोषले जाते.

जे देखे रवी..  –    परतीचा प्रवास- एक कविकल्पना (?)
आपले शरीर अणूंचे बनते. अणूंचा आवाका प्रचंड. उलट त्या अणूचे मूलकण आकाराने अगदीच क्षुल्लक असतात. परंतु त्यांच्यामधल्या ऊर्जेची देवाण-घेवाण एखाद्या संततधारेसारखी असते. लढाया, चढाया, पाडाव, तह क्षणाक्षणाला होतात. या ऊर्जेवर आपले शरीर जगते तगते आणि आकार घेते आणि जड असते. शरीराच्या घडामोडीमुळे व्याप होतात. चढउतार असतो तेव्हा भुर्रकन उडून जावे, मोकळा श्वास घ्यावा, निवांत बसावे असे विचार येतात, या जडपणातून मुक्त होण्यासाठी कुंडलिनी विद्येचा वापर करावा अशी एक असिद्ध प्रथा आहे.
ही कुंडलिनी मणक्याच्या खाली सापासारखी तोंड खाली करून निजलेली असते. ती आसनाने जागृत करता येते. मग पुढे काय होते याची फक्त एक झलक केवळ भाषेच्या आणि कल्पनेच्या सौंदर्यासाठी खाली देतो.
दृष्टी आत वळते। कुतूहलाने बघते। मग नाकाच्या शेंडय़ावर। स्थिरावते
मनोव्यापार। पडतो लटका। मन मनामध्ये। विरामते
झोपेचे काय बरे झाले। तहान गेली कुठे। आठवणी गेल्या। पळून।
जणु वावटळ। काढते सगळे घुसळून। घाण जुनी सगळी। धुतली
वायुचा प्रभाव। कोठय़ात करतो शिरकाव। कफपित्ताला। निपटतो
हृदयाच्या तळाला। जो वायू। असतो भरलेला। गिळते सगळा।
तिच्या जबडय़ातल्या ज्वाळा। वरती खालती व्यापल्या। मांस खाई। बकाबका
सगळ्या सांध्याची। झाडा झडती। नखांचा पाडते फडशा। बसल्या जागी।।
शिरा भुरकून खाते। खाऊन होते तृप्त।
पडते होऊन सुस्त। उरला तेजस्वी साधक.
म्हातारपण लोपते। तारुण्याची गुंडी निघते।
परत प्रकटते। बालपण
समुद्रापलीकडचे बघते। स्वर्गातला नाद ऐकते।  
मुंगीच्या मनातले। ओळखते
वाऱ्याच्या घोडय़ावर स्वार। पाण्याला करते पार।
तरी ओले नाहीत पाय। अशी अद्भुत कृति।।
ही कल्पना समजली। तरच ती बोली कळली।
पण नाही कोणी उरले। ऐकावया।।
वाचकांनो, असले वाचायचे असेल तर ज्ञानेश्वरीतला सहावा अध्याय बघा. कुंडलिनीचे राहू दे. भाषा म्हणजे काय ह्य़ाचा उत्तम आविष्कार इथे सापडेल. आधी भाषांतर वाचा आणि मगच मूळ ओवी बघा.
असे म्हणतात की केवळ ओव्या वाचूनच सगळे खऱ्या अर्थाने कळते. माझ्या बाबतीत तसे काही घडले नाही हेच खरे. आणि कोठली ज्ञानेश्वरीची प्रत वाचून हा प्रश्न क्रिया लांबवण्यासाठी केला जातो हेही सत्य आहे.
– रविन मायदेव थत्ते rlthatte@gmail.com

Five cases filed against extortionist Vaibhav Deore three crore extortion from BJP office-bearer
खंडणीखोर वैभव देवरेविरुध्द पाच गुन्हे दाखल, भाजप पदाधिकाऱ्याकडून तीन कोटी खंडणी
increase in the number of floodplains Water pumping pumps at 481 places during monsoon
जलमय सखल भागांच्या संख्येत वाढ? पावसाळ्यात ४८१ ठिकाणी पाणीउपसा पंप; खर्चातही वाढ
How to make solkadhi marathi recipe
recipe : चिकन, मटणाच्या जेवणासह हवी थंडगार सोलकढी? मालवणी पद्धतीने कशी बनवायची जाणून घ्या
Indiscriminate firing in nagpur by criminal over money of MD
नागपुरात एमडीच्या पैशावरून गुन्हेगाराचा अंधाधुंद गोळीबार, कुख्यात टोळ्या पुन्हा…

वॉर अँड पीस – कुपोषित बालके : गंभीर समस्या
दिवसेंदिवस आपल्या समाजात ‘आहे रे, नाही रे’ समस्या खूप वेगाने वाढत आहेत.  समाजातील एक मोठय़ा संख्येचा वर्ग अत्यल्प उत्पन्नामुळे आपल्या लहानग्यांकडे, त्यांच्या जेवणाखाण्याकडे समाधानकारक लक्ष देऊ शकत नाही. गल्लेवाली अतिश्रीमंत मंडळी कितीही पैसा फेकून चांगली चांगली खाणीपिणी, मौजमजा करतात. त्यांच्या खर्चिक पैसेफेकू राहणीमुळे एकीकडे राहणीमान उंचावलेले दिसते. पण हे सामाजिक चित्र फसवे असते. आपल्या भारतात हातावर पोट असणारे अल्पमजुरीत दिवसभर काबाडकष्ट करणारे मोठय़ा संख्येने आहेत. केंद्र व राज्य सरकारी यंत्रणा आपापल्या परीने दारिद्रय़रेषेखालील लोकांना मदतीचा हात निश्चितपणे देत आहे. असे असूनही देशातील विशेषत: महाराष्ट्रातील; विदर्भ, मराठवाडय़ातील वन व मागास विभागात बालकांच्या कुपोषण समस्या वाढत्या आहेत.
सरकारी आरोग्यकेंद्रावर लोहयुक्त रंगीबेरंगी टॉनिक गोळय़ा मोफत मिळतात. पण या गोळय़ांनी का बालकांचे कुपोषण थांबणार? जेथे गहू, भात विकत घेण्याची मारामार तेथे दूध कसे मिळणार?  शहरी टॉनिक उपाय कसे कामी येणार? गेले काही दिवस बिहार व अन्य राज्यांतील शालेय आहारातील दुर्घटना आपण सर्वानीच वाचल्या आहेत. आपली भावी पिढी हे मोठे देशाचे बलस्थान. ते कुपोषित राहून चालेल कसे? आयुर्वेदीय प्राचीन ग्रंथात पहिल्यापासून तांदूळ, गहू, मूग, उडीद अशा अनेक धान्यकडधान्यांचा युक्तीने वापर कसा करावा याचे मोठे मार्गदर्शन केलेले आहे. कुपोषित बालके असणाऱ्या कुटुंबाकडे इंधनापासून सर्व तऱ्हेचीच बोंबाबोंब असते. त्याच्याकरिता खूप टॉनिकांचे पुराण सांगण्यापेक्षा टिकाऊ स्वरूपाच्या राजगिरा लाहय़ा, शतावरी, आस्कंद या मुळय़ांचे शर्कराकल्प, तीळकूट, स्थलपरत्वे मक्याच्या लाह्या असे काही प्रयोग आयुर्वेद महाविद्यालये व त्यांच्याबरोबर ज्येष्ठ वैद्यांना करून आपला अंशत: तरी समाजसेवेचा वाटा उचलता येईल का हा यक्षप्रश्न तुम्हा आम्हाला सतावत नाही का?
– वैद्य प. य. वैद्य खडीवाले

आजचे महाराष्ट्रसारस्वत   – २८ ऑगस्ट
१८७१ > लेखक व काव्याभ्यासक श्रीधर विष्णू परांजपे यांचा जन्म. त्यांच्या ग्रंथसंपदेत ‘महाराष्ट्र कविवर्य मोरोपंतकृत केकावली’ हा विस्तृत समावेशक टीकाग्रंथ आणि ‘मोरोपंतांचे चरित्र व काव्यविवेचन’ या ग्रंथांचा समावेश आहे.
१९०८ > विनोदकार विनायक माधव पटवर्धन यांचा जन्म. थॉमस हार्डीच्या ‘टेस डि’उर्बरव्हिल’ या स्त्रीजीवनविषयक कादंबरीचे रूपांतर त्यांनी ‘रत्ना व त्रिकोण’ असे केले होते. पुढे पी. जी. वुडहाउसच्या प्रेरणेने ते विनोदी लेखनाकडे वळले. ‘दीडशहाणे’, ‘कागदी घाडे’, ‘साहित्य गुलाम’ तसेच मुलांसाठी हास्यकथा, ‘किती हसाल’ आदी पुस्तके त्यांनी लिहिली होती.
२००१>  ख्यातनाम साहित्यिक व्यंकटेश दिगंबर माडगूळकर यांचे निधन. ‘माणदेशी माणसे’  (व्यक्तिचित्रण कथा) आणि ‘बनगरवाडी’ (कादंबरी) या पुस्तकांतून मातीत रुजलेले लेखक अशी त्यांची ओळख झाली. काळी आई, गावाकडल्या गोष्टी, वारी, करुणाष्टक या त्यांच्या पुस्तकांतही माणदेश आहे! ‘बिनबियांचे झाड’ सारखी १० नाटके  ‘जंगलातले दिवस’, ‘चित्रे आणि चरित्रे’, ‘पांढऱ्यावर काळे’ हे ललितलेखन त्यांनी केले. ‘लोकसत्ता’त दररोज ‘परवचा’ हे सदर त्यांनी चालविले होते, त्याचेही पुस्तक झाले.
– संजय वझरेकर