प्रा. जतकर हे पुणे विद्यापीठाच्या रसायनशास्त्र विभागाचे पहिले प्रमुख होते. ते नोबेल पुरस्कारविजेते डॉ. चंद्रशेखर वेंकट रमण यांचे सहकारी. त्यांचे संपूर्ण नाव शंकर खंडो कुलकर्णी जतकर.
ते मुळातले सांगली जिल्ह्यातल्या जत गावचे. त्यांनी बंगलोरच्या इंडियन इन्स्टिटय़ूट ऑफ सायन्समधून एम.एस्सी. केले. प्रथम ते हैदराबादच्या निजाम महाविद्यालयात अध्यापनासाठी गेले, पण संशोधनाची तीव्र इच्छा असल्याने ते परत बंगलोरच्या इंडियन इन्स्टिटय़ूट ऑफ सायन्समध्ये गेले व रामन परिणामाशी संबंधित संशोधन त्यांनी सुरू केले. त्यात खासकरून इन्स्ट्रमेंटल अ‍ॅनॅलिसिस आणि विविध पायलट प्लँट प्रॉजेक्टविषयक संशोधन होते. त्यावर आधारित त्यांनी लिहिलेले शोधनिबंध आंतरराष्ट्रीय मासिकातून प्रसिद्ध झाले. त्यांच्या या शोधनिबंधाचे परीक्षण करून त्यांना डी.एस्सी. ही पदवी मिळाली.
१९४९ साली पुणे विद्यापीठाची स्थापना झाल्यावर त्या विद्यापीठाचे पहिले कुलगुरू बॅ. जयकर यांनी त्यांना खास बोलावून घेऊन रसायनशास्त्र विभागाचे प्रमुख केले. त्यांनी अहोरात्र मेहनत घेऊन १९५० ते ६२ या काळात विद्यापीठाचा हा विभाग नावारूपाला आणला. त्यांचे १५० शोधनिबंध आघाडीच्या विज्ञान नियतकालिकात प्रसिद्ध झाले. त्यांच्या हाताखाली २५ विद्यार्थ्यांनी संशोधन करून पीएच.डी. प्राप्त केली.
शिक्षण संस्था आणि औद्योगिक उत्पादन संस्था यांची सांगड घालायचा प्रयत्न केला. शर्करा उत्पादन तंत्रज्ञान, स्फोटकांचे रसायनशास्त्र, काचेचे उत्पादन अशा वेगवेगळ्या विषयांच्या अध्ययनाची सोय त्यांनी पुणे विद्यापीठात केली. प्राध्यापक आणि विद्यार्थ्यांनी केवळ शिक्षणासाठीच एकत्र न येता सामाजिकदृष्टय़ा उपयुक्त विषयांचाही विचार करण्यासाठी एकत्र यावे यासाठी त्यांनी विद्यापीठात ‘युनिव्हर्सिटी केमिकल सोसायटी’ची स्थापना केली. त्यातून चर्चासत्रे, वक्तृत्व स्पर्धा, प्रात्यक्षिके, खेडय़ात विज्ञान प्रसार करण्यासाठी फिरती  प्रयोगशाळा असे उपक्रम सुरू झाले. प्रा. जतकर यांनी विद्यार्थ्यांना स्पेक्ट्रोस्कोपी, शास्त्रीय उपकरणशास्त्र, केमिस्ट्री ऑफ इलेक्ट्रोलाइटस, डायपोल मोमेंट अ‍ॅण्ड मोलेक्यूलर स्ट्रक्चर, रेण्विय रचनाशास्त्र हे विषय शिकवले. या संबंधातील जतकर इक्वेशन प्रसिद्ध आहे.
अ. पां. देशपांडे, मुंबई , मराठी विज्ञान परिषद, वि. ना. पुरव मार्ग,  चुनाभट्टी,  मुंबई २२  office@mavipamumbai.org

मनमोराचा पिसारा – द लास्ट माइल
१९६० सालच्या जागतिक आरोग्य संघटनेच्या पाहणीनुसार भारतामध्ये सुमारे २४ टक्के बालकं बालपणीच जीवनाला मुकत होती. बालमृत्यूच्या या प्रचंड संख्येमागील कारण तसं साधंसुधं होतं. म्हणजे गरिबीमुळे आलेलं कुपोषण हा घटक होता, पण मृत्यूस कारण ठरायचे ते पाण्यासारखे जुलाब! ‘जुलाब’ हा रोग माणसाइतकाच जुना. कारण दूषित पाणी सेवन केल्यामुळे जुलाब होतात हे कळायला बराच काळ जावा लागला.
तरी डायरियासारख्या क्षुल्लक सर्वनाशी रोगावस्थेवर उपाय सापडत नव्हता. अखेर स्वच्छ (र्निजतुक) पाण्यामध्ये क्षार-साखर इ. गोष्टी विरघळून दिल्यास शरीरातल्या नष्ट झालेल्या क्षार पाण्याची भरपाई होते. (ओरल रिहायड्रेशन) आतडय़ामध्ये जीवन निर्माण होते आणि प्रदूषित (इन्फेक्शन) अवस्थेशी झगडण्याची ताकद येते. ही ‘टय़ूब’ पेटली आणि २००० सालापर्यंत बालमृत्यूचं प्रमाण २४ वरून ६ वर आलं.
ग्रेट! पण तरीदेखील भारतामधील ४-५ टक्के म्हणजे लाखो निष्पाप बालकांचे प्राण अक्षरश: पाण्याविना जात होते.
आरोग्य संघटनांनी ठरवलं की, बालमृत्यूची ही टक्केवारी कमीतकमी व्हायला हवी. मग ओरल रिहायड्रेशन थेरपीच्या (ओआरटी) विपुल पिशव्या उपलब्ध करणे, घरच्या घरी हे द्रावण कसं करता येतं हे शिकवायला सुरुवात केली. सर्वसामान्य अशिक्षित स्त्रियांना ‘ओआरटी’मागचा फंडा कळला आहे की नाही याची खात्री केली, तरीदेखील आजारी मुलांच्या माता ‘ओआरटी’चा उपयोग करीत नाहीत असं लक्षात आलं. त्यांना ज्ञान-माहिती होती तरी कळलेलं वळत नव्हतं. मग आरोग्य शिक्षक, सर्वसामान्य जनता यांचा अभ्यास बिहेविअरल इकॉनॉमिक्स अथवा सोशल इकॉनॉमिक्सच्या संशोधकांकडे सोपवला. प्रचंड तांत्रिक संशोधन, वितरण व्यवस्था प्रशिक्षण या मंडळींनी हा प्रश्न ९९.९ टक्के सोडविला होता.  इथेच मानसशास्त्रानं सगळ्या तंत्रविज्ञान, विपणन व्यवस्थांवर कडी केली. आजारी मुलांच्या माता, जुलाबग्रस्त मुलांना ओआरटी देत नव्हत्या. कारण त्यांची अ‍ॅटिटय़ूड अथवा मनातली समजूत! कोणती ती अखेर मानसशास्त्रज्ञांनी शोधून काढली त्या स्त्रियांना वाटत असे की, गळक्या मडक्यात आणखी पाणी टाकून काय उपयोग? ते पाणीही गळून जाणार!! वरकरणी पाहता, ‘फुटक्या माठात पाणी टिकत नाही’ हे निरीक्षण पटतं. लाखो वर्षांपासून आपण सर्वानी हेच निरीक्षण नोंदलं आहे. इट इज ‘कॉमनसेन्स’. परंतु जे फुटक्या हौदांना, माठांना नि डेऱ्याला लागू पडतं, ते माणसांना लागू पडत नाही.
मानसिकतेमध्ये बदल केला तरच तंत्रज्ञान, विज्ञान इ. शास्त्रांचा उपयोग करता येतो. हा मानसिक दुवा क्षुल्लक वाटतो, पण कळलेलं वळवायचं असेल, तर दृष्टिकोन बदलण्याची जोड द्यावी लागते.
कोणत्याही शर्यतीमध्ये जिंकणार कोण हे ठरविण्याकरिता संपूर्ण रेस पाहावी लागत नाही. शेवटचा टप्पा, शेवटचा मैल गाठण्याचे धोरण महत्त्वाचे असते. समाजमानस विज्ञानात या प्रकाराला ‘द लास्ट माइल सिण्ड्रोम’ असं म्हणतात!
संदर्भ : टेडटॉक्स सेंदिल मल्लिनाथन : प्रो. हार्वर्ड विद्यापीठ
डॉ.राजेंद्र बर्वे – drrajendrabarve@gmail.com

ai researcher demis hassabis
कुतूहल : कृत्रिम बुद्धिमत्तेतील संशोधक उद्योजक
anil kakodkar pune, indian nuclear physicist anil kakodkar
भारतातील संशोधन ‘नावापुरते’ असे ज्येष्ठ शास्त्रज्ञ डॉ. अनिल काकोडकर का म्हणाले?
Peter Higgs predicted the existence of a new particle
‘गॉड पार्टिकल’चा शोध लावणारे नोबेल विजेते शास्त्रज्ञ पीटर हिग्ज यांचं निधन, वयाच्या ९४ व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास
Prof. Rupesh Mahadik
ठाणे महाविद्यालयाचे प्राध्यापक रुपेश महाडीक यांचा आदर्श अध्यापक पुरस्काराने सन्मान

प्रबोधन पर्व – ..तर इतिहासाचा नादच सोडावा
‘‘इतिहासकार किंवा संशोधक याने आपल्या स्वत:च्या लाडक्या भावना, पक्षपात, धर्म, समजुती, सामाजिक अथवा वैयक्तिक लकबा, यांपासून स्वत:स निदान इतिहास हा विषय हाती असे तोपर्यंत तरी अलग ठेवावे.. ज्यांना हा तटस्थयोग साधत नाही, त्यांनी इतिहासाचा नादच सोडावा! नाही तर नदीच्या उगमांतच विष कालविण्याच्या पातकाचे धनी त्यांना व्हावे लागेल!’’ असे महर्ष विठ्ठल रामजी शिंदे इतिहास लेखनाचे पथ्य सांगत इतिहासकाराचे गुण सांगतात – ‘‘इतिहास हे एक शास्त्र आहे. इतिहास लेखनाला नि:पक्षपातीपणा व निर्वकिरता हे गुण अवश्य लागतात. हे गुण जर इतिहासकाराच्या अंगी नसतील तर नदीच्या उगमाशी एखादा घाणेरडा पदार्थ पडला की नदीचे सर्व पाणी बिघडते, तशीच स्थिती इतिहासाची होते.’’ प्राचीन भारतीय इतिहासकारांकडे हे गुण नसल्याने पुराणांतील इतिहासाचे नेमके काय झाले याविषयी ते म्हणतात- ‘‘इतिहास लिहिणे म्हणजे जसे नुसत्या घडलेल्या गोष्टी टिपणे नव्हे, तसेच घडलेल्या गोष्टींच्या आरशांत आपल्या लाडक्या उपपत्तीचे प्रतििबब दाखविणेही नव्हे, तर घडलेल्या गोष्टींची न्यायशुद्ध परंपरा ओळखूनच स्वस्थ न राहता, शक्य असल्यास समाजशास्त्राच्या काही नतिक सिद्धांतांची उठावणी, या परंपरेच्या पायांवर करता आल्यास प्रयत्न करणे होय..  उत्तर पुराणे तर जाणूनबुजून ऐहिक विशेषत: क्षत्रियांच्या इतिहासाचा विपर्यास करण्याकरता किंवा बौद्ध, जैन, शैव अथवा अशाच इतर क्षत्रिय अथवा द्रविड धर्माचा पाडाव करण्याकरिता लिहिली अथवा लिहविली गेली आहेत. केवळ इतिहासाचा अभाव असण्यापेक्षा खोटय़ा इतिहासाची लयलूट होऊन या खोटय़ा इतिहासालाच धर्माचे सर्वमान्य आणि पवित्र स्वरूप येण्याने खऱ्या इतिहासाची किती भयंकर हानी होते, हे साधारण जनसमूहासच नव्हे, तर परक्यांच्या ओंजळीने पाणी पिणाऱ्या पुढाऱ्यांनाही समजून येणे पुष्कळ वेळा अशक्य होऊन जाते..’’