News Flash

कीटकमोहिनी

अतिशय निकृष्ट मुरमाड ओलसर मातीवर खडकांच्या आडोशाला या वनस्पती उगवतात.

चार्ल्स  डार्वनि  यांनी १८७५ साली  कीटकभक्ष्यी वनस्पतीची जगाला ओळख करून दिल्यापासून या वनस्पती सर्वाच्या कुतूहलाचा विषय बनल्या आहेत. रानावनात दुर्मीळ झालेल्या या वनस्पती आता शोभेच्या किंवा डास खाणाऱ्या वनस्पती म्हणून मोठय़ा कौतुकाने आपल्या घरात लावतात. आंतरराष्ट्रीय पातळीवर चाललेल्या वाढत्या शहरीकरणामुळे या वनस्पती लवकरच नामशेष होण्याची शक्यता आहे.

अतिशय निकृष्ट मुरमाड ओलसर मातीवर खडकांच्या आडोशाला या वनस्पती उगवतात. त्या मातीमधील नत्र व पोटॅशच्या उणिवेमुळे या वनस्पती मांसाहारी बनतात. त्या केवळ कीटकच खातात असे नसून कोळी, छोटे खेकडे, संधिपादप्राणी, आदिजीवसंघ (प्रोटोझुआ) यांनासुद्धा आपल्या मोहमयी जाळ्यात आकर्षति करतात. अनेक छोटे जीव या वरच्या दिखाऊपणाला भुलतात, फसतात आणि यांचे काम फत्ते होते. काही जीव या वनस्पतीचे भक्ष्य ठरतात तर काही कीटक परागीकरणासाठी मदत करतात भक्ष्य आकर्षति करण्यासाठी वापरलेल्या निरनिराळ्या युक्तीनुसार यांचे मुख्यत्वे चार प्रकार आढळतात.

वेगवान हालचाली करणाऱ्या वनस्पती

१.घटपर्णी वनस्पती – या वनस्पतीमध्ये पानाचा आकार एखाद्या घटासारखा असतो. मुंग्या, कोळी, छोटय़ा गोगलगाई किंवा छोटे बेडूक या पानाच्याकडे वर फिरताना घसरून घटात पडले की घटातील संप्रेरके आणि आम्लामध्ये विरघळून जातात. उदा Nepenthis khasiana ही एकमेव लुप्तमय घटपर्णी मेघालयमधील खासी आणि गारो डोंगरी भागात  आढळते तर Nepenthis rajah ही भारतातून अस्तंगत झालेली सर्वात मोठी घटपर्णी श्रु नावाचं छोटा सस्तन प्राणीही सहज फस्त करते.

२.चिकटपत्रे- उदा. दविबदूच्या १०० हून अधिक प्रजातींपकी    Drossera indica आणि   Drossera burmani या दोन प्रजाती कास पठारावर आढळतात. या वनस्पतींमध्ये पानाची रचना आकर्षक असते. पानावर असलेल्या सुगंधित चिकट द्रवामध्ये सूक्ष्मजीव अडकले की ड्रॉसेराची लांब पाने कीटकाला घट्ट आवळून त्याच्यातील प्रथिने शोषून घेतात. आणि नंतर अर्धमेल्या भक्ष्याला सोडूनही देतात.

 –सुगंधा शेटय़े (मुंबई)

 

मराठी विज्ञान परिषद, वि. ना. पुरव मार्गचुनाभट्टीमुंबई २२

office@mavipamumbai.org

 

गोल्डा मायर

‘आयर्न लेडी ऑफ इस्रायल’ अशी ओळख असणाऱ्या गोल्डा मायर १७ मार्च १९६९ ते ३ जून १९७४ या काळात इस्रायलच्या पंतप्रधानपदी होत्या. सिरिमाओ भंडारनायके आणि इंदिरा गांधी यांच्यानंतर एखाद्या देशाच्या  पंतप्रधानपद भूषवणाऱ्या गोल्डा मायर या तिसऱ्या महिला. ‘इस्रायली ज्यूंच्या खंबीर मनाच्या आजी’ असा त्यांचा उल्लेख होतो. १८९८ साली ज्यू घराण्यात जन्मलेल्या गोल्डी माबोवीच यांच्या वडिलांनी अमेरिकेत स्थलांतर केल्यामुळे मिलवॉकी राज्यात त्यांचे शिक्षण झाले. तरुण वयापासूनच गोल्डीमध्ये कट्टर ज्यू राष्ट्रीयत्वाची भावना रुजली. शिक्षण पूर्ण झाल्यावर मिलवॉकी पब्लिक स्कूलमध्ये नोकरी करीत असतानाच झायोनिस्ट (ज्यू) संघटनेतील विद्यार्थी परिषदेच्या त्या प्रमुख झाल्या. पुढे झायोनिस्ट संघटनेच्या कामगार सभेच्या त्या नेत्या झाल्या. १९१७ साली गोल्डींचा विवाह मॉरिस मायरसन यांच्याशी झाला. या विवाहापूर्वी गोल्डींची अट होती की लग्नानंतर पॅलेस्टाइन (इस्रायल) मध्येच स्थायिक व्हायचे आणि स्वतंत्र इस्रायलसाठी लढा द्यायचा. १९२१ साली दोघांनी नोकऱ्या सोडून जेरुसलेम येथे स्थलांतर केले आणि तिथल्या किबुत्झ म्हणजे सहकारी वसाहतींमध्ये राहून बागायती काम सुरू केले. हे करतानाच त्यांची राजकीय नेत्यांशी ओळख होऊन गोल्डी मायरसनची नेमणूक किबुत्सच्या कामगार संघटनेच्या प्रमुखपदी झाली. १९४८ साली स्वतंत्र इस्रायलची घोषणा झाली. त्या घोषणापत्रावर गोल्डींची सही होती. १९४९ ते १९७४ या काळात नेसेट म्हणजे इस्रायली लोकसभेच्या सदस्यपदी त्या निवडून आल्या. त्यापकी १९४९ ते १९५६ या काळात त्या श्रम मंत्रालयाच्या मंत्री होत्या, १९५६ ते १९६६ या काळात इस्रायलच्या परराष्ट्रमंत्री तर १९६९ ते १९७४ या काळात इस्रायलच्या पंतप्रधानपदी होत्या. मंत्रिपद मिळाल्यावर त्यांनी आपले नाव गोल्डा मायर असे सुटसुटीत केले. १९७२ च्या म्युनिक ऑलिम्पिकमध्ये अरबांच्या ‘ब्लॅक सप्टेंबर’ या संघटनेने इस्रायलच्या ११ खेळाडूंना ठार मारले. त्या प्रसंगी पंतप्रधान गोल्डा मायरनी आपल्या मोसाद या गुप्तहेर संघटनेला ब्लॅक सप्टेंबर आणि पॅलेस्टाइन मुक्ती आघाडीच्या कार्यकर्त्यांना शोधून ठार मारण्याचे आदेश दिले. तरीही, अरब इस्रायल संघर्ष मुत्सद्देगिरीने सोडवण्यावर त्यांचा भर होता.

सुनीत पोतनीस

sunitpotnis@rediffmail.com

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on October 26, 2016 3:58 am

Web Title: insect charm
Next Stories
1 मोशे दायान
2 नोबेलविजेत्या अदा योनाथ
3 भारतीय वनस्पतीशास्त्रज्ञ : डॉ. एम. आर. अल्मेडा
Just Now!
X