19 April 2019

News Flash

गव्हर्नर जॉन माल्कम (२)

नोकरीसाठी भारतात आलेला माल्कम २९ वर्षांनी रजेवर मायदेशी गेला.

ब्रिटिश ईस्ट इंडिया कंपनीचा भारतीय प्रदेशावर अंमल असताना त्यांच्या अनेक कर्मचाऱ्यांची नियुक्ती भारतात झाली. त्यामध्ये लष्करी आणि प्रशासकीय असे दोन्ही प्रकारचे कर्मचारी होते. त्यापकी अनेकांनी आपले काम चोख बजावताना काही व्यासंगही जोपासले.

काहींना भारतीय भाषा, साहित्य, नाटय़कला यांनी भुरळ घातली, तर काहींना येथील संस्कृती, सामाजिक चालीरीतींनी. गव्हर्नरच्या हुद्दय़ापर्यंत पोहोचलेला ब्रिटिश सेनाधिकारी माल्कम याने मुंबई इलाख्याला उत्तम प्रशासन दिलेच पण त्याच्या इतिहास लेखनामुळेही तो विख्यात झाला.

नोकरीसाठी भारतात आलेला माल्कम २९ वर्षांनी रजेवर मायदेशी गेला. त्याला वाचनाचे वेड होतेच पण तो ऐतिहासिक घटनांची नोंद करून ठेवत असे. एल्फिन्स्टनप्रमाणे इतिहास लेखन करण्याची माल्कमलाही आवड होती. रजेवर असताना लंडनमध्ये त्याने ‘हिस्टरी ऑफ इरान’ हा इराणच्या इतिहासावर आधारित आणि इंग्रजी भाषेतला पहिला ग्रंथ लिहिला. त्यासाठी ऑक्सफर्ड विद्यापीठाने त्याचा बहुमान केला. जॉन माल्कमने रजा संपवून भारतात आल्यावर मुंबई इलाख्याचे गव्हर्नर म्हणून काम पाहिले. त्याने एकूण नऊ पुस्तके ऐतिहासिक विषयांवर आणि एक काव्यसंग्रह लिहिला. त्यापकी ‘स्केच ऑफ द पोलिटिकल हिस्टरी ऑफ इंडिया’, ‘द मेमायर ऑफ सेंट्रल इंडिया’, ‘द गव्हर्न्मेंट ऑफ इंडिया’, ‘द पोलिटिकल हिस्टरी ऑफ इंडिया’ ही विशेष प्रसिद्ध आहेत.

बौद्धिक कार्यात माल्कमला विशेष रस असल्याने मुंबईत स्थापन झालेल्या ‘बॉम्बे लिटररी सोसायटी’ या संस्थेच्या कार्यात तो रस घेत असे. त्याच्या प्रेरणेनेच ‘लिटररी सोसायटी’चे रूपांतर १८२९ साली ‘बॉम्बे ब्रँच ऑफ द रॉयल एशियाटिक सोसायटी’ असे झाले आणि पुढे लंडनच्या सोसायटीशी तिला संलग्न केले गेले. ईस्ट इंडिया कंपनीच्या सर्व प्रशासक, अधिकाऱ्यांनी प्राच्य विद्यांचा अभ्यास करावा, विशेषत: भाषा, कला आणि वाङ्मय या क्षेत्रातील भारतीयांच्या कामगिरीचा अभ्यास करावा असा त्याचा आग्रह होता.  १८४० पर्यंत रॉयल एशियाटिक सोसायटीचे सर्व सभासद युरोपियन होते. पुढे माणेकजी करशेटजी, बाळशास्त्री जांभेकर आणि जगन्नाथ शंकरशेट हे सोसायटीचे झालेले पहिले भारतीय

First Published on August 30, 2018 2:15 am

Web Title: john malcolm 2