दूरवरच्या प्रदेशातून भारतात येऊन सूफी तसव्वूफ म्हणजे तत्त्वज्ञानाचा प्रसार करणारे कुतुबोद्दीन बख्तियार काकी हे बाराव्या-तेराव्या शतकातील एक लोकप्रिय सूफी संत होऊन गेले. चिस्तीया संप्रदायाचे सूफी संत मोइनोद्दीन चिस्ती यांचे उत्तराधिकारी कुतुबोद्दीन बख्तियार हे त्यांचे खलिफाही होते. सूफी संताचा खलिफा हा त्याचा सर्वोत्तम शिष्य असतो आणि त्याला स्वतचा शिष्यगण तयार करायचा अधिकार असतो. कुत्ब अल अकताब हजरत सय्यद..वगैरे लांबलचक मालगाडीसारखे मूळ नाव असलेल्या कुतुबोद्दीन बख्तियार काकींचा जन्म ११७३ साली किरगिजीस्तान येथील ओश या परगण्यात झाला. त्यांच्या लहानपणीच वडील सय्यद कमुलुद्दीन मुसा यांचा मृत्यू झाल्यामुळे त्यांच्या आईनेच पालनपोषण करून शेख अबू यांच्याकडे शिक्षण दिले.

लहानपणापासूनच कुतुबोद्दीन यांचा ईश्वरचिंतन, भक्तीकडे कल होता. त्यांच्या गावातून जाणारे सूफी संत हजरत मोईनुद्दीन चिस्ती यांची कुतुबुद्दीननी भेट घेतली त्यावेळी मोईनुद्दीनच्या किशोरवयाच्या बुद्धिमत्ता आणि ईश्वरभक्तीने स्तिमीत झाले. चिस्तींनी कुतुबुद्दीनला सूफी संप्रदायाचे तत्त्वज्ञान आणि नीतिनियमांचे शिक्षण देऊन १७ वर्षांचा असताना खलिफा नेमले. चिस्तींनीच कुतुबुद्दीनला ‘बख्तियार’ म्हणजे भाग्याचे बंधू, अशी उपाधी दिली. बख्तियारनी पुढे अनेकदा चमत्कार करून दाखविले त्यामुळे त्यांना काकी म्हणजे ‘रोटीशी संबंधित’ असे टोपण नाव मिळाले आणि ते ‘बख्तियार काकी’ झाले! बख्तियार चिस्ती संप्रदायाचे खलिफा बनल्यावर इराक, इराण या देशांतील सूफी संतांना भेटून पुढे आपले गुरू ख्वाजा मोईनुद्दीन चिस्ती यांच्या आदेशावरून त्यांच्याबरोबर दिल्लीत आले आणि पुढे दिल्ली आणि आजूबाजूचा परिसर हेच आपले कार्यस्थळ बनवून राहिले. दिल्ली येथील तत्कालीन अल्तमश याने बख्तियारचे स्वागत करून त्यांना दिल्ली सल्तनत प्रमुख काझी म्हणजे प्रमुख धर्माधिकारी हे पद स्वीकारण्याचे आवाहन केले. पण बख्तियारनी ते पद नम्रपणे नाकारून तत्कालीन काझीकडेच ठेवण्याची विनंती केली. बख्तियार दिल्लीत येण्यापूर्वी सूफी मताचा प्रसार केवळ अजमेर, नागोर परिसरातच झाला होता, तो बख्तियारनी दिल्ली आणि उत्तर भारतात वाढवला.      (पूर्वार्ध)

Geographical mind Geographical knowledge about the battlefield
भूगोलाचा इतिहास: भौगोलिक बुद्धिबळ
Operation Meghdoot, Siachen,
विश्लेषण : पाकिस्तानला चकवा देत सियाचिनवर कब्जा… थरारक ‘ऑपरेशन मेघदूत’ मोहीम कशी फत्ते झाली?
lokmanas
लोकमानस: नेतान्याहूंची अखेरची धडपड
Katchatheevu island controversy
विश्लेषण: कच्चथीवू बेटावर ‘या’ हिंदू राजांनी केले होते राज्य? त्यांचा रामाशी नेमका संबंध काय होता?

सुनीत पोतनीस

sunitpotnis@rediffmail.com