पाण्यात वेगवेगळे पदार्थ मिसळून मऊसर, ओलसर तयार केलेला पदार्थ म्हणजे ‘लगदा’ होय. कागद तयार करण्याच्या पद्धतीत लगदा हा अत्यंत महत्त्वाचा भाग आहे. लगदा हा मुख्यत: तीन प्रकारचा असतो.
लगद्याच्या पहिल्या प्रकारात लाकडाच्या भुश्यामधे फक्त पाणी घालून तो तयार करतात. लाकडातील लिग्निन, हेमीसेल्यूलोजसारखे नसíगक पदार्थ आणि अनावश्यक पदार्थ लगद्यातून काढून टाकले जात नाहीत तसेच कोणतेही रासायनिक पदार्थ घातले जात नाहीत. या प्रकारचा लगदा हा ‘यांत्रिक लगदा’ होय. लगद्यावर यांत्रिक प्रक्रिया करून कागद तयार केला जातो. हा कागद, वर्तमानपत्राच्या छपाईसाठी वापरतात.
दुसऱ्या प्रकारचा लगदा तयार करण्यासाठी, लाकडाचा भुसा, कापडाच्या चिंध्या हे पदार्थ वापरले जातात. सुरुवातीला कापडाच्या चिंध्या रंगीत असतील तर क्लोरिन वायूने त्या चिंध्या धुतात. लाकडाचा भुसा, कापडाच्या चिंध्या या वनस्पतीजन्य पदार्थामध्ये सेल्यूलोजचे तंतू असतात. शिवाय लिग्निन, रेझीन, मेण, असे इतर पदार्थसुद्धा असतात. यातील लिग्निन, रेझीन, मेण हे पदार्थ लगद्यामधून बाहेर काढावी लागतात. त्यासाठी सर्व लगदा पापडखाराच्या पाण्यात टाकून शिजवितात. पापडखारात शिजवल्यामुळे लगद्यातील मळ निघून जातो. हा ‘अर्ध रासायनिक लगदा’ होय. या लगद्यापासून मिळणारा कागद मध्यम प्रतीचा असतो. या कागदाचा कारखान्यातील काही वस्तूंची बांधाबांध करण्यासाठी होतो.
तिसऱ्या प्रकारच्या लगद्याला ‘रासायनिक लगदा’ म्हणतात. रासायनिक लगद्यामधील रसायनांमुळे लिग्निन हा पदार्थ विरघळतो. या प्रक्रियेला पाचन क्रिया म्हणतात. या प्रक्रियेत कपडय़ाचे तुकडे, गवत, झाडाच्या साली सर्व एकत्र करून कॉस्टिक सोडा आणि सोडियम सल्फाइड यांच्या द्रावणांमध्ये पाचक यंत्रात तीन तास शिजवितात. पाचक यंत्रामध्ये शिजवलेला लगदा काळा असतो. हा लगदा पहिल्यांदा पाण्याने आणि नंतर क्लोरिन या विरंजकांनी स्वच्छ धुतात. या क्रियेनंतर स्वच्छ पांढरा लगदा मिळतो. रसायनांचे प्रमाण जास्त झाले तर सेल्यूलोजचे तंतू तुटतात. त्याचा परिणाम कागदाच्या गुणवत्तेवर होऊन तो ठिसूळ होतो. रासायनिक लगद्यापासून तयार झालेला कागद लिहिण्यासाठी वापरतात.
कागद कारखान्यातील वेगवेगळ्या प्रकारच्या लगद्यामुळेच आपल्याला वेगवेगळ्या प्रतीचे कागद मिळतात.

सुचेता भिडे, कर्जत
मराठी विज्ञान परिषद, वि. ना. पुरव मार्ग, चुनाभट्टी, मुंबई २२ office@mavipamumbai.org

Why are naphthalene balls kept with clothes to be put away How do you use naphthalene balls in a wardrobe
कपड्यांमधील ओलसरपणा, कुबट वास होईल गायब; कपाटात ठेवा ‘ही’ गोळी, जाणून घ्या वापराची योग्य पद्धत
mini paneer sabudana vada recipe
Recipe : तेलात न तळता बनवा साबुदाण्याचे कुरकुरीत ‘प्रोटीनयुक्त’ मिनी वडे! बनवताना घाला फक्त ‘हा’ पदार्थ
goa mango farmers deploy jamun to fight
फक्त १० रुपयांच्या जांभळांनी वाचवा आंब्याची बाग? शेतकऱ्याने सांगितला माकडांच्या हल्ल्यापासून वाचण्याचा हटके जुगाड!
Intermittent Fasting risks heart attack
सावधान! ‘या’ प्रकारचा उपवास केल्याने येऊ शकतो हृदयविकाराचा झटका? स्वतःची काळजी कशी घ्याल?

प्रबोधन पर्व -कर्मठ, हटवादी ‘अधर्म’ आणि आस्थेवाईक, कर्तव्यनिष्ठ धर्म
‘‘आत-बाहेर सर्वत्र नांदणारा जो परमात्मा आणि व्यक्तिविशिष्ट जो जीवात्मा, ह्यांचा परस्परसंबंध आणि निरंतरसमागम यांस धर्म म्हणतात.. परमेश्वराचे प्रतिक्षणी कायकाय व्यापार घडतात ते ओळखणे, कृतज्ञतापूर्वक त्याचे सान्निध्य साधणे आणि संसारातील लहानमोठी कामे त्याच्या सान्निध्यात शोभतील, अशा रीतीने करणे ही आमची धार्मिक कर्तव्ये.. धर्म ही बाब प्रत्येक मनुष्याच्या अंत:करणाची असल्यामुळे आस्थेवाईक मनुष्याचा खरा धर्म सारखाच असणार. जसजशी मनुष्याची सुधारणा होत जाते तसतशी धर्माच्या प्रगतीची दिशाही सारखीच असते. म्हणून कर्मठपणा आणि हटवाद यांस न जुमानता व्यक्तीचा धर्म, त्याचा उगम जे अंतकरण आणि अंतर्याम यांना अनुसरूनच आहे.’’
अशा प्रकारे महर्षी विठ्ठल रामजी शिंदे धर्म, धार्मिक कर्तव्य आणि धर्माचे स्वरूप यांचा अन्वयार्थ सांगून, अधर्म कोणता हेही स्पष्ट करतात. ‘धर्म जीवन व तत्त्वज्ञान’ या पुस्तकातील त्यांचे लेख विसाव्या शतकाच्या सुरुवातीस लिहिले गेले. त्यांत ते म्हणतात-
‘‘मनुष्यव्यक्तीचे आणि राष्ट्राचे आजवर नुकसान झाले आहे ते त्याच्या केवळ क्षुद्र स्वार्थपरतेमुळेच झाले आहे असे नव्हे तर त्याने खोटय़ा धर्मबुद्धीला बळी पडून आपल्या उदात्त कामना पूर्ण करून घेण्याचा पुरुषार्थ साधला नाही म्हणूनही झाले आहे. मनुष्याच्या मनाचा विकास जसजसा अधिकाधिक होतो तसतशा त्याच्या कामना अधिक पवित्र, अधिक महत्त्वाच्या आणि अधिक लोकहितकारक होतात, इतकेच नव्हे, तर त्यामुळे त्याच्या कर्तव्यबुद्धीचेही क्षेत्र अधिक शुद्ध आणि अधिक विस्तृत होते. म्हणून जो धर्म अथवा जी कर्तव्यबुद्धी या कामनेच्या मुळाशीच कुठार घालू पाहाते तो अधर्म समजावा.. प्रत्येक प्राण्यामध्ये व्यक्तित्व पूर्णत्वास यावे, अशी दैवी योजना असून तिला अनुकूल वर्तन ठेवणे हा प्रत्येक प्राण्याचा आद्य आणि अंतिम धर्म होय आणि ह्या मंगल हेतूस अडथळा आणणे यापरता दुसरा कोणताही अधर्म नाही.’’

मनमोराचा पिसारा-मेंदूतील रस्ते-टोल फ्री

मानवी मेंदूचा लाखो वर्षांत झालेला विकास, मानवी संस्कृती, विचारसरणी आणि कलाविष्काराची कहाणी सांगतो.मेंदूच्या विकासाची सुरुवात झाली सस्तन प्राण्यांच्या जन्मापासून. फक्त गंधसंवेदनांच्या स्मृती जपायच्या आणि त्यानुसार स्वसंरक्षण आणि पुनरुत्पादनाच्या ऊर्मीच्या मदतीनं जगायचं इतपत काम चार पायांचे प्राणी करतात. पक्ष्यांना गंधशक्तीपेक्षा दृष्टीचं सामथ्र्य अधिक, त्यामुळे त्यांचा मेंदू दृक् संवेदना सांभाळतो. अधिक प्रगत प्राण्यांमध्ये बाकीची इंद्रियं विकसित झाली आणि मेंदू संपन्न होऊ लागला. आजच्या घडीला माणसाचा मेंदू सर्वात प्रगत आहे.हजारो र्वष मेंदूचं कार्य नेमकं कसं चालतं. मेंदूच्या विविध भागांतल्या पेशीजलांचं गौडबंगाल काय आहे? हे उलगडत नव्हतं. संगणकशास्त्रानं झेप घेतली आणि ‘खुल जा सिमसिम’सारखा मेंदूच्या माहितीचा प्रचंड, न संपणारा खजिना वैज्ञानिकांच्या हाती लागला.मेंदूचं कार्य ‘न्यूरॉन’ अथवा मज्जापेशीतर्फे पार पाडतं. अशा करोडो पेशी मानवी मेंदूत आहेत. प्रश्न असा आहे की, या वेगवेगळ्या भागांतील पेशी एकमेकांशी बोलतात कशा? म्हणजे माहितीची देवाणघेवाण करतात कशी? इतकंच नाही तर अगदी सूक्ष्म संवेदनेमुळे मनात विचार. भावनांचं मोहोळ कसं उठतं? दृश्य पाहता पाहता सूर कसे आठवतात? उदा. उदबत्तीच्या ओझरत्या सुगंधामुळे मनात देवघर कसं दिसू लागतं? आरतीचा ठेका कसा आठवतो? पंचारतीमधली कापराची तेजस्वी ज्योत कशी जाणवते? प्रसादातल्या साखरफुटाण्याची गोडी जिभेवर कशी रेंगाळू लागते? नकळत नमस्कारासाठी हात कसे जोडले जातात? ही किमया कशी घडते? मेंदूमधली विविध भागांतली (पेशीजाल) केंद्र आपापल्या जाळ्यात ‘स्मरणा’ची डेटा ‘साठवून’ ठेवतात. पण एकाच वेळी इतक्या निरनिराळ्या स्मृती क्षणार्धात कशा काय जागृत होतात? त्या स्मृतीमुळे मनात आपोआप वेगवेगळ्या भावना कशा काय उत्पन्न होतात? म्हणजे उदबत्तीच्या सुवासानं प्रसन्न वाटतं? खमंग वासानं भुकेची भावना प्रज्वलित होते, ती कशी? मित्रा, हे कोडं नाही की देवाची करणी नाही! ये कमाल है आपल्या मेंदूतल्या टोल फ्री रस्त्यांची. मेंदूत विविध ठिकाणी विशिष्ट स्मरण साठवणारी केंद्रं असतात. आणि ती सर्व केंदं्र जोडलेली असतात नि एकमेकांशी सतत संदेशांची देवाणघेवाण करतात. त्यासाठी मेंदूमध्ये लाखो टोल फ्री रस्ते आहेत. शरीरातली प्रत्येक जिवंत पेशी मेंदूशी आणि मेंदू पेशीशी जोडणारे महामार्ग आहेत. सुपर सुपर हायवे आहेत. प्रकाशाच्या वेगानं, सुसाट वेगानं या रस्त्यांवरून संदेशाचं क्षणोक्षणी दळणवळण चालू असतं! त्यात कसलाही अडथळा येत नाही. या रस्त्यांचे आभार मानावेत तेवढे थोडे आहेत. तिथं ना अन्याय्य टोलवसुली, ना अराजक प्रवृत्तीची तोडफोड, ना मार्चे, ना आंदोलनं. हे रस्ते सदैव खुले असतात. मज्जातंतूंच्या या सूक्ष्मातिसूक्ष्म मार्गाना मनस्वी धन्यवाद!

डॉ.राजेंद्र बर्वे
drrajendrabarve@gmail.com