News Flash

तांत्रिक वस्त्रांचे प्रकार – गृहवस्त्रे : १

सर्वसाधारणपणे अशा कापडांचे वर्गीकरण दहा वर्गामध्ये केले जाते

अंगावर घालण्याच्या कपडय़ांशिवाय घरामध्ये इतर कारणांसाठी जी वस्त्रे उपयोगात आणली जातात त्यांना गृहवस्त्रे असे म्हणतात. जागतिक पातळीवर जगातील तांत्रिक वस्त्रांच्या उत्पादनामध्ये गृहवस्त्रांचा वाटा सुमारे १३ टक्के इतका आहे. गृहवस्त्रांच्या शीर्षकाखाली वापरल्या जाणाऱ्या कापडांची यादी खूपच मोठी आहे.

सर्वसाधारणपणे अशा कापडांचे वर्गीकरण दहा वर्गामध्ये केले जाते, ते पुढीलप्रमाणे : भरण तंतू, गाद्या व उशा यांचे घटक, गालिच्याचे पृष्ठकापड (काप्रेट बॅकिंग क्लॉथ), तंतू भरलेली खेळणी, खिडक्यांच्या पडद्यांच्या पट्टय़ा, वातानुकूलन यंत्रांच्या गाळणजाळ्या (फिल्टर्स), व्हॅक्क्यूम क्लीनरच्या गाळणजाळ्या, विविध प्रकारची विनावीण पुसणी, मच्छरदाण्या आणि फíनचरसाठी लागणारे कापड.
भरण तंतू : भरण तंतूंचा उपयोग आकर्षक व नक्षीदार उशा, तसेच रजया, कुशन, स्लीिपग बॅग्स, उष्णतारोधक कपडे आणि फíनचरचे कुशन कम्फर्ट्स इत्यादी गोष्टी तयार करण्यासाठी केला जातो. यासाठी बहुधा पॉलिस्टर तंतूंचा वापर होतो.
गालिच्याचे पृष्ठकापड (काप्रेट बॅकिंग क्लॉथ) : गालिच्याच्या पृष्ठकापडाचा उपयोग वीणाई तसेच विनावीण अशा दोन्ही पद्धतीने तयार केलेल्या गालिच्यांसाठी केला जातो. या पृष्ठकापडामुळे गालिच्यामधील तुरे किंवा तंतू घट्ट पकडले जातात आणि त्याचबरोबर गालिच्याचा पृष्ठभाग गुळगुळीत केला जातो. त्यामुळे गालिचा अधिक टिकाऊ होतो.
तंतू भरलेली खेळणी : अशा प्रकारची खेळणी मुला-मुलींमध्ये अतिशय लोकप्रिय आहेत. गुंफाई पद्धतीने तयार केलेल्या कापडामध्ये भरण तंतू भरून ही खेळणी तयार केली जातात. लहान मुलांना खेळण्यासाठी, घराच्या किंवा मोटारगाडय़ांमध्ये सजावटीसाठी अशा खेळण्यांचा उपयोग केला जातो.
खिडक्यांच्या पडद्यांच्या पट्टय़ा (ब्लाइंड्स) : अशा प्रकारचे पडदे कपडय़ाच्या लांब पट्टय़ांपासून तयार केले जातात. या पट्टय़ा कपडय़ाच्या असल्या तरी त्यांना ताठपणा येण्यासाठी त्यांच्यावर रासायनिक क्रिया केली जाते. उभे ब्लाइंड्स, गुंडाळणारे ब्लाइंड्स, रोमन ब्लाइंड्स, व्हेनिशन ब्लाइंड्स अशा अनेक प्रकारचे ब्लाइंड्स घरामध्ये व कार्यालयामध्ये वापरले जातात.

 चं. द. काणे (इचलकरंजी)
मराठी विज्ञान परिषद,
वि. ना. पुरव मार्ग, चुनाभट्टी, मुंबई २२ office@mavipamumbai.org

 
संस्थानांची बखर

संगीतकार शासक स्वाथी थिरूनल

स्वाथी थिरूनल राम वर्मा या त्रावणकोरच्या राजाची कारकीर्द इ.स. १८१३ ते १८४६ अशी झाली. एक उत्तम प्रशासक आणि विख्यात संगीतकार अशी त्याची ओळख आहे. त्याची आई राणी गौरी लक्ष्मी बाई (कारकीर्द १८११ ते १८१५) हिच्या गर्भात असतानाच स्वाथी थिरूनलच्या राजेपदाची घोषणा झाली म्हणून तो ‘गर्भ श्रीमान’ या नावानेही ओळखला जातो. त्याच्या जन्मानंतर पहिली दोन वष्रे त्याच्या आईने आणि पुढे बराच काळ त्याची मामी गौरी पार्वती बाईने त्याची पालक कारभारी म्हणून काम पाहिले. पुढे कंपनी सरकारचा कर्नल मुन्रो याने स्वाथी थिरूनल सोळा वर्षांचा होईपर्यंत रेसिडंट, रिजन्ट म्हणून काम पाहिले. स्वाथी थिरूनलला अनेक क्षेत्रांमध्ये स्वारस्य होते. तिरुवनंतपूरम येथील वेधशाळा, सरकारी छापखाना, त्रिवेंद्रम जनता ग्रंथालय, प्राचीन हस्तलिखित संग्रहालय या राजानेच चालू केले. १८३४ साली स्वाथीने तिरुवनंतपूरम येथे राज्यातली पहिली इंग्रजी शाळा सुरू केली. १८३६ साली त्याने राज्यातली प्रथम जनगणना केली, ती १२,८०,००० होती. मल्याळम, कन्नड, तामीळ, िहदी, तेलुगू, संस्कृत, इंग्लिश इत्यादी भाषा उत्तम अवगत असणारा हा राजा स्वत एक निपुण संगीतकार होता. कर्नाटक संगीताचा अभ्यास केलेला स्वाथी थिरूनल िहदुस्तानी संगीतातही तेवढाच तरबेज होता. ‘पद्मनाभ’ या उपनावाने त्याने चारशेहून अधिक संगीत रचना केल्या. स्वाथी थिरूनल रॉयल एशियाटिकचा सदस्य होता. त्याच्या काळात केरळमध्ये जातपात, स्पृश्यास्पृश्य फार कठोरपणे पाळले जाई. कमरेच्यावर कोणतेही वस्त्र परिधान करण्याचा दलित स्त्री-पुरुषांना अधिकार नव्हता. स्वाथी थिरूनलने कायदा करून ही प्रथा बंद केली. वस्त्रप्रावरणांबाबत दलितांना कोणताही मज्जाव राहिला नाही.

सुनीत पोतनीस
sunitpotnis@rediffmail.com

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on December 14, 2015 1:39 am

Web Title: technical types of cloths
Next Stories
1 भू-तंत्र वस्त्रांचे उपयोग – ३
2 भू-तंत्र वस्त्रांचे उपयोग भाग – २
3 कुतूहल – भू-तंत्र वस्त्रांचे उपयोग भाग- १
Just Now!
X