संपूर्ण समुदायाची वा त्यातील समुचित नमुन्याची आकडेवारी जमवणे, तिचे विश्लेषण करणे, तिच्या आधारे निष्कर्ष/ अनुमान काढणे, स्पष्टीकरण देणे व ती माहिती सारांश रूपात प्रस्तुत करणे यासंबंधीचे शास्त्र म्हणजे संख्याशास्त्र. संख्याशास्त्राचा उपयोग आपल्याला अजाणतेपणी रोजच्या जीवनात होत असतो; जसे स्वयंपाकघरात शितावरून भाताची परीक्षा! आकृतीतील नमुनादाखल सहा क्षेत्रांमध्ये संख्याशास्त्राची उपयोगिता विशेषत्वाने दिसते.

बाह््य वा अंतर्गत घटक जाणून भविष्याविषयी अंदाज वर्तवण्यासाठी सांख्यिकीय तंत्राचा उपयोग केला जातो. डॉक्टर रोगाच्या आवाक्याचा अंदाज घेण्यासाठी, गुंतवणूकदार परतावा अंदाजित करण्यासाठी, तर अभियंते चालू प्रकल्प पूर्ण होण्यास लागणाऱ्या वेळेचे मूल्यांकन करण्यासाठी संख्याशास्त्राचा वापर करतात. एखादे उत्पादन निर्दोष आहे की नाही, हे सुनिश्चित करण्यासाठी त्याची नमुना चाचणी घेऊन गुणवत्ता चाचणी करण्यासाठी संख्याशास्त्रातील पद्धतींचा (उदा. दर्जा नियंत्रण तक्ते) वापर केला जातो. पूर्वी नोंद असलेल्या हंगामाची सध्याच्या परिस्थितीशी तुलना करण्यासाठी संगणकातील संग्रहित सांख्यिकीय माहितीचा व विश्लेषणाचा वापर करून शेतीतील विविध पिकांच्या वेळापत्रकासाठी अंदाज वर्तविण्यात संख्याशास्त्र मोलाची भूमिका बजावते. आगामी नैसर्गिक आपत्तीचा अंदाज घेऊन संकटग्रस्तांचे जीव वाचवण्यासाठी बचावकार्य यंत्रणेस तयारी करण्यास संख्याशास्त्राची मदत होते. संख्याशास्त्र वैद्यकीय क्षेत्रातही महत्त्वाची भूमिका बजावते; जसे की, नवीन औषध खरोखरीच गुणकारी आहे हे तपासणे वा संसर्गजन्य रोग किती प्रमाणात आणि कुठे पसरेल याचा अंदाज घेणे.

survival of marine species in danger due to ocean warming
विश्लेषण : महासागर तापल्याने प्रवाळ पडू लागलेत पांढरेफटक… जलसृष्टीचे अस्तित्वच धोक्यात?
Reptiles, tigers, Reptiles news, Reptiles latest news,
विश्लेषण : वाघांइतकेच सरपटणारे प्राणीदेखील महत्त्वाचे.. पण तरीही ते दुर्लक्षित का असतात?
Upsc Preparation  Economics Kaleidoscope of Pre Exam career
Upsc ची तयारी : अर्थशास्त्र: पूर्व परीक्षेचा कॅलिडीस्कोप
Robert Dennard
चिप-चरित्र : ‘मेमरी चिप’ क्षेत्राची पायाभरणी

एखाद्या विशिष्ट क्षेत्रात विशिष्ट राजकीय पक्षाचे समर्थन करणारे किती मतदार आहेत हे जाणून घेऊन परिपूर्णतेने राजकीय मोहीम चालवण्यास, देशाला आगामी सरकारचा अंदाज लावण्यासही संख्याशास्त्र मदत करते. क्रीडा क्षेत्रात प्रत्येक खेळाची गुणवत्ता वाढवण्यास आणि अनिश्चित वातावरणात योग्य धोरण ठरवण्यास संख्याशास्त्राची खूप मदत मिळते. ग्राहकोपयोगी वस्तूंच्या वितरणामध्ये संख्याशास्त्र मोठ्या प्रमाणात वापरले जाते. कोणत्या दुकानामध्ये वस्तूंची आवश्यकता आहे, उत्पादने कधी पाठवायची यासाठी संख्याशास्त्राचा वापर करून केलेले योग्य निर्णय व्यवसायात मोठ्या प्रमाणात उत्पन्न मिळविण्यात मदत करतात. वित्तीय बाजारात सर्व समभागांचे (शेअर्स) चढ-उतार संख्याशास्त्राच्या मदतीने मोजतात, ज्यामुळे गुंतवणूकदारांना विशिष्ट समभागांमध्ये गुंतवणुकीचा निर्णय घेण्यास मदत होते. विम्याच्या विशाल उद्योगात विमा कंपन्या विमाधारकाची माहिती एकत्रित करताना संख्याशास्त्राचा उपयोग करूनच विमाधारकाच्या हप्त्याची रक्कम निश्चित करतात. संख्याशास्त्र स्पर्श करीत नाही असे बहुतेक कुठलेच क्षेत्र नाही, हे आतापर्यंतच्या सर्व निरीक्षणांवरून पटले ना? – प्रा. विद्या सावंत     

 

मराठी विज्ञान परिषद,

संकेतस्थळ : www.mavipa.org

ईमेल : office@mavipamumbai.org