रशियात १९१७ साली झालेल्या राजकीय क्रांतीचं वैचारिक, राजकीय आणि प्रत्यक्ष संघटनात्मक नेतृत्व लेनिन यांनी केलं. व्होल्गा नदीकाठी, १८७० साली जन्मलेल्या लेनिन यांचं मूळ नाव ब्लादिमीर इलिच उल्यानोव्ह होतं. लेनिन यांनी १९१७ आणि १९१८ मध्ये रशियन प्रजासत्ताकाचे अध्यक्षपद, १९१८ ते १९२४ या काळात रशियन सोव्हिएत फेडरेटिव्ह सोश्ॉलिस्ट रिपब्लिकचे अध्यक्षपद आणि १९२२ ते १९२४ या काळात सोव्हिएत युनियनचे अध्यक्षपद भूषविले. समारा येथे शिकत असताना त्यांनी कार्ल मार्क्‍स यांचे ‘दास कॅपिटल’ वाचल्यावर समाजवाद हाच रशियाच्या समस्यांवर तोडगा असल्याचे त्यांचे मत झाले. चौफेर वाचन आणि प्रभावी भाषणशैलीमुळे लेनिन समाजवादी गटाचे प्रमुख कार्यकर्ता बनले. या गटाच्या वृत्तपत्रात लिखाण केले म्हणून लेनिनना तुरुंगवास आणि तीन वष्रे सबेरियात हद्दपारीची शिक्षा झाली. ही शिक्षा भोगल्यावर लेनिन स्वित्र्झलडमध्ये जिनेव्हा येथे राहून रशियन डेमोकॅट्रिक पक्षाचे वृत्तपत्र ‘इस्क्रा’ (ठिणगी) चालवू लागले. त्याच काळात भावी रशियन क्रांतीच्या संघटनात्मक प्रणालीविषयी ‘व्हॉट इज टु बी डन’ हे पुस्तक त्यांनी लिहिले. १९०३ साली सोशल डेमोक्रॅटिक पक्षात मतभेद होऊन बोल्शेव्हिक आणि मेन्शेव्हिक असे दोन गट पडून लेनिन हे बोल्शेव्हिक गटाचे प्रमुख झाले. सेंट पीटर्सबर्गमधील १९०५ च्या उठावानंतर तयार झालेल्या कामगारांच्या सोव्हिएतमधून बोल्शेविक पक्षाने आपला प्रभाव टाकण्यास सुरुवात केली. पहिल्या महायुद्धात रशियाची वाताहत झाल्यावर झारने फेब्रुवारी १९१४ साली सत्ता सोडली आणि मेन्शेव्हिक पक्षाचे हंगामी सरकार सत्तेवर आले. याच काळात लेनिन यांनी सेंट पीटर्सबर्गमध्ये येऊन बोल्शेव्हिक पक्ष आणि सोव्हिएत यांची सूत्रे आपल्या हातात घेतली. ऑक्टोबर १९१७ मध्ये लेनिनने आपल्या सोव्हिएतमधील कामगार सदस्यांच्या मदतीने मेन्शेव्हिक सरकार उलथवून टाकले आणि रशियात बोल्शेव्हिक सरकारची स्थापना केली. पुढे साम्यवादी रशियाच्या पायाभरणीचं आणि दिग्दर्शनाचं बहुमोल कार्य लेनिन यांनी केलं. १९२२ मध्ये त्यांना पक्षाघाताचा पहिला झटका आला आणि १९२४ साली त्यांचा मृत्यू झाला.

– सुनीत पोतनीस

Prime Minister Narendra Modi addressing an election campaign rally in Jalore, Rajasthan. (Photo: BJP Rajasthan/ X)
मोदींविरोधात काँग्रेस आक्रमक; मुस्लिमांना संपत्तीचे फेरवाटप करण्याच्या आरोपावरून संतप्त प्रतिक्रिया, आयोगाकडे तक्रार
Amol Kolhe, mic, Bhosari Constituency,
Video : …अन अमोल कोल्हे यांनी ‘त्या’ व्यक्तीच्या हातातून माईक का खेचला? राजकीय सभ्यतेचे दिले उदाहरण
Manifesto of Samajwadi Party released
हमीभावासाठी कायदा करण्याचे आश्वासन; समाजवादी पक्षाचा जाहीरनामा प्रकाशित
Mahayuti, Hitendra Thakur
हितेंद्र ठाकूर यांना महायुती मदत करणारा का ?

sunitpotnis@rediffmail.com 

 

 

देवराई

स्थानिक समुदायाने देवाच्या नावाने राखून ठेवलेले वास्तविक किंवा अगदी वास्तवासारखे वनस्पती क्षेत्र अथवा वनराई म्हणजे देवराई. काही वेळा एखाद्या पिशाच्च / भूताच्या नावानेसुद्धा जंगलाचा भाग सोडलेला असतो. देवराईत देवाचे वास्तव्य आहे, या श्रद्धेपोटी स्थानिक समुदाय त्या जागेत कुठलेही गरवर्तन करत नाही. तसे केल्याने देवाच्या कोपाला सामोरे जावे लागते; असा समज असल्याने त्या जंगलाचे उत्तम संरक्षण होते.

भारतात अनेक राज्यात देवराया विखुरलेल्या आहेत आणि त्यांचे चांगले जतन होत आहे. २००२ पूर्वी देवरायांचा वनराई क्षेत्रासंबंधी कुठलाच कायदा नव्हता. पण २००२ साली ‘वाइल्ड लाइफ प्रोटेक्शन अ‍ॅक्ट १९७२’ अंतर्गत संशोधन करून देवरायांचा त्यामध्ये समावेश करण्यात आला. सामान्यत: अनेक देवरायांमध्ये िहदू देव असला तरी इस्लामिक आणि बुद्धिष्ट उगम असलेल्या काही देवराया आहेत. जगात अनेक ठिकाणी देवराया आहेत. उदा. ब्रिटन, युरोप, ऑस्ट्रेलिया, जपान, थायलंड, नेपाळ, आफ्रिका इ.

भारतात जवळपास १४,००० देवरायांची नोंद आहे. त्यामध्ये अतिशय दुर्मीळ वनस्पती आणि प्राणी आढळतात. राजस्थानचे वाळवंट, केरळ, कर्नाटक आणि पूर्व भारतातील पर्जन्य वने या ठिकाणी अनेक देवराया आहेत. महाराष्ट्रात सर्वात जास्त देवराया सिंधुदुर्ग जिल्ह्य़ात असल्याची नोंद आहे. महाराष्ट्रात देवराईंच्या अभ्यासात प्रा. वा. द. वर्तक आणि प्रा. माधव गाडगीळ यांचे उल्लेखनीय कार्य आहे.

देवराईचा सर्वात महत्त्वाचा उपयोग तेथे सापडणाऱ्या आयुर्वेदिक औषधांसाठी होतो. त्याचप्रमाणे फळे अणि मधासाठी होतो. देवराया जैवविविधतेचे अग्रगण्य भाग आहेत. देवरायांमधील ओढे आणि इतर पाण्याचे स्रोत स्थानिक समुदायाची पाण्याची गरज भागवतात. भारतात प्राचीन काळापासून संवर्धनाचे काम काही प्रमाणात देवरायांमुळे झाले. अगदी लहान राईतसुद्धा अतिशय विशाल वृक्ष आणि अजस्र वेली बघायला मिळतात. संपूर्ण परिसर एक घनदाट जंगल भासते. देवारायांतील झाडे तोडल्यास देव कोपतो या भीतीने तेथील झाडांचे शतकानुशतके जतन झाले आहे, त्यामुळेच दुर्मीळ झाडे तेथे पाहायला मिळतात.

वाढती लोकसंख्या, औद्योगिकीकरण, विकास प्रकल्प, शहरीकरण, धार्मिक पर्यटन, गुरे चरणे आणि महत्त्वाचे म्हणजे बदलते सामाजिक व धार्मिक संदर्भ या सर्वामुळे आज अनेक देवराया संकटात सापडलेल्या आहेत. असेच चालू राहिल्यास मोठय़ा प्रमाणात जैवविविधतेचा नाश संभवतो. म्हणूनच देवरायांचे जतन आणि संवर्धन निकडीचे आहे.

– डॉ. सी. एस. लट्ट (मुंबई)

मराठी विज्ञान परिषद,

वि. ना. पुरव मार्ग,  चुनाभट्टी,  मुंबई २२ 

office@mavipamumbai.org