21 March 2019

News Flash

डॉ. जाकीर हुसेन (१)

पठाण किंवा पश्तून समाज हा मूळचा अफगाणिस्तान आणि वायव्य पाकिस्तानचा.

पठाण किंवा पश्तून समाज हा मूळचा अफगाणिस्तान आणि वायव्य पाकिस्तानचा. या समाजातील अनेक व्यक्ती भारतीय प्रदेशात येऊन विविध प्रांतांत स्थायिक झाल्या. त्यांपकी अनेकांच्या पुढच्या वंशजांनी चित्रपट, संगीत, क्रिकेट, राजकारण अशा विविध क्षेत्रांमध्ये आपली विशेष ओळख निर्माण करून ठेवली आहे. स्वतंत्र भारताचे तिसरे राष्ट्रपती दिवंगत डॉ. जाकीर हुसेन हेही पठाण समाजातल्या आफ्रिदी घराण्याचे हे अनेकांना माहीत नसावे. ते भारताचे पहिले मुस्लीम राष्ट्रपती, तसेच राष्ट्रपतिपदावर कार्यरत असताना निधन पावलेले ते पहिले राष्ट्रपती!

जाकीर हुसेन यांचा जन्म  हैदराबादेतला १८९७ सालचा, अफ्रिदी या पठाण घराण्यातला. वडील फिदा हुसेन खान यांचा मृत्यू झाला तेव्हा जाकीर दहा वर्षांचे होते. त्यांचे सुरुवातीचे प्राथमिक शिक्षण हैदराबादमध्ये झाले आणि त्यानंतर त्यांचे कुटुंब उत्तर प्रदेशात फारुखाबाद जिल्ह्यात कैमगंज येथे स्थलांतरित झाले. सात भावंडांपकी दुसरे असलेले जाकीर इटावाच्या इस्लामिया माध्यमिक शाळेत एक हुशार विद्यार्थी म्हणून नावाजले गेले. त्यांचे पुढील शिक्षण मुहम्मदन अँग्लो-ओरिएंटल कॉलेज म्हणजे सध्याच्या अलिगढ मुस्लीम विद्यापीठात झाले. पदव्युत्तर शिक्षणासाठी ते पुढे बíलनला गेले. १९२६ साली बíलन विद्यापीठाची अर्थशास्त्राची डॉक्टरेट मिळवून ते भारतात परतले.

मुस्लीम समाजाचा शैक्षणिक उत्कर्ष व्हावा या इच्छेने प्रेरित होऊन जाकीर हुसेन यांच्यासह काही विद्यार्थी मित्र आणि शिक्षकांनी मिळून अलिगढमध्ये १९२० साली नॅशनल मुस्लीम युनिव्हर्सटिीची स्थापना केली. पुढे १९३५ मध्ये दिल्लीच्या जामिया नगैर येथे स्थानांतरित झालेल्या या शैक्षणिक संस्थेचे नाव ‘जामिया मिलीया इस्लामिया’ असे करण्यात आले. या संस्थेच्या स्थापनेत राष्ट्रीय काँग्रेसचे नेते अबुल कलम आजाद, मोहमद अली जोहर, मुख्तार अहमद अन्सारी, मोहम्मद मुजीबसारखे राष्ट्रीय नेते जाकीर हुसेन यांच्याबरोबर होते. आता जामिया मिलीया इस्लामियाचे रूपांतर दिल्लीच्या एका प्रतिष्ठित देशव्यापी सेंट्रल युनिव्हर्सटिीत झालेय. या काळात झाकीर हुसेन हे एक विद्यार्थी नेता म्हणून चच्रेत होते.

– सुनीत पोतनीस

sunitpotnis@rediffmail.com

First Published on June 4, 2018 12:23 am

Web Title: zakir husain