क्ष२, य१/३, ल-३/७ अशा अनेक संज्ञांचा अभ्यास आपण शालेय गणितात करतो. त्यांतील अनुक्रमे २, १/३ आणि -३/७ हे ‘घातांक (एक्स्पोनंट)’ म्हणून ओळखले जातात. मायकल स्टिफेल ह्य जर्मन गणितज्ञांनी त्यांच्या इ.स. १५४४ मधील ‘अरिथमेटिका इंटिग्रा’ या पुस्तकात घातांक या शब्दाचा उल्लेख केलेला आढळतो. कुठलीही मोठी संख्या संक्षिप्त स्वरूपात लिहिता येणे हा घातांकाचा मोठा उपयोग आहे. २ या संख्येने २ ला गुणणे या कृतीत २ ही संख्या १० वेळा लिहून येणारा १०२४ हा गुणाकार २१० असा दर्शवता येतो. एक प्रकाशवर्ष हे प्रकाशाने कापलेले अंतर ९४६१०००००००००००० मीटर इतक्या मोठय़ा संख्येत लिहिण्याऐवजी ९.४६१ x १०१५ मीटर असे लिहिणे सोयीस्कर ठरते. इथे १० हा पाया आणि १५ हा घातांक आहे. या संदर्भात बुद्धिबळाच्या पटावरील दाण्यांची प्रसिद्ध दंतकथा आपण स्वतंत्र लेखात वाचणारच आहोत.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

घातांक स्वरूपात लिहिलेल्या संख्यांवर गुणाकार आणि भागाकार क्रिया करताना घातांकांचे काही नियम आर्किमिडीज यांनी दिले होते. मात्र वर्गमूळ, घनमूळ, चतुर्थमूळ यांसारख्या करणी संख्यांमध्ये (सर्ड) घातांकांचा वापर आणि घातांकांचे नियम वापरून करणी संख्यांच्या क्रिया- यांबाबत सखोल विवेचन देकार्त यांनी १७ व्या शतकाच्या सुरुवातीस दिले. त्यावरून पाया समान असणाऱ्या संख्यांचा गुणाकार करताना त्यांच्या घातांकांची बेरीज, तर भागाकार करताना त्यांच्या घातांकांची वजाबाकी करून आपण उत्तर सहज काढू शकतो. शालेय स्तरावर चक्रवाढ व्याजाच्या आकारणीत आपण घातांकाचा उपयोग करतो.

मराठीतील सर्व नवनीत बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Article on mathematics of exponents abn
First published on: 08-03-2021 at 00:05 IST