पायमोजाचे झाड हे नाव डॉ. शरदिनी डहाणूकरांनी या वृक्षास त्याच्या पायमोजासारख्या दिसणाऱ्या फळामुळे बहाल केले आहे. इंग्रजीत ‘बालसम ऑफ टोलू’ किंवा ‘बालसम ऑफ पेरू’ असे म्हणतात. वनस्पतीचे शास्त्रीय नाव मायरोझायलॅन बालसम असे आहे. मूळचा दक्षिण अमेरिकेतील ‘पेरू’ या देशाचा असलेला हा वृक्ष मुंबईत मलबार हिलच्या पायथ्याजवळ आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

दक्षिण अमेरिकेतील पेरू, व्हेनेझुएला, ब्राझील, साल्वाडोर या देशांच्या पर्जन्यमय जंगलात या वृक्षाची वाढ ३६ मीटपर्यंत होऊ शकते. इतरत्र मात्र १८ ते २२ मीटरपेक्षा उंच होऊ शकत नाही. एप्रिल-मे महिन्यांत या वृक्षास पांढरी-पिवळी फुले येतात आणि साधारण जून महिन्यात पायमोजाच्या आकाराची चपटी शेंग येते. ती सुरुवातीला हिरवी असते. परिपक्व झाल्यावर भुरकट रंगाची होते. शेंगेच्या टोकाला एकच चपटी बी असते.

साधारण २० वर्षे जुन्या वृक्षाच्या खोडाला व्ही आकाराचा छेद देऊन त्यातून पाझरणारा पिवळा चिकट सुगंधी द्रव गोळा केला जातो. जो कालांतराने कठीण आणि ठिसूळ बनतो. काही ठिकाणी या वासामुळे तेथील लोकांना श्वसनाचा त्रास झाल्याचे आढळले आहे. हे सुगंधी द्रव्य अँटिसेप्टिक असून उत्तेजकपण आहे. बालसममध्ये ५०-६० टक्के बाष्पीभवन होणारे आणि २५-३० टक्के रेझीन हे घटक असतात. तेलात बेंझॉएक अ‍ॅसिड आणि सिनामिक अ‍ॅसिडच्या इस्टर्स असतात. दक्षिण अमेरिकेत अमेझॉन आदिवासी या सुगंधाचा उपयोग, अस्थमा, खोकला आणि डोकेदुखीसाठी  करतात. आज जागतिक पातळीवार सल्वाडोर हा देश बालसम ऑफ पेरूची सर्वात जास्त निर्यात करणारा देश आहे. मोठय़ा प्रमाणात या सुगंधी तेलाचा उपयोग परफ्युम्स, सौंदर्य प्रसाधने व साबण तयार करताना केला जातो. या वृक्षाचे लाकूड गडद रंगाचे असून फíनचर व पॅनेिलगसाठी वापरले जाते. लाकूड सहसा कुजत नाही. बाल्सम ऑफ पेरूचा वृक्ष विषुववृत्तीय देशात ज्या ठिकाणी याची वाढ नसíगक नाही अशा ठिकाणी लावला गेल्यास एक अतिशय झपाटय़ाने वाढणारी जाती ठरण्याची शक्यता आहे.

डॉ. सी. एस. लट्ट (मुंबई)

मराठी विज्ञान परिषद,

वि. ना. पुरव मार्गचुनाभट्टीमुंबई २२ 

office@mavipamumbai.org

 

 

बुलफाइटचा तपशील

सध्याचा बुलफाइटचा खेळ हा इतिहासपूर्व काळात ग्रीसमध्ये  पूजेचा एक प्रकार म्हणूनच सुरू झाला. बलपूजा आणि त्याचा बळी उत्सवांच्या दिवसात देण्याचा त्यांचा प्रघात होता. पुढे रोमन लोकांनी ग्रीस पादाक्रांत करून रोमन साम्राज्यात सामील केले; त्या काळात ग्रीकांच्या अनेक चालीरीती रोमनांनी उचलल्या. बलपूजा आणि त्याच्या बळीची पद्धतही त्यांनी उचलली. रोमन फौज एखाद्या मोहिमेवर निघताना बलाची पूजा करून त्याला बळी देऊन देवतांना संतुष्ट करीत. पुढे पाचव्या सहाव्या शतकात ही प्रथा रोमन लोकात बंद झाली, पण ती एक मनोरंजनाचे साधन म्हणून स्पॅनिश लोकांनी उचलली.

बुलफाइटचा खेळ जेथे होतो त्या क्रीडांगणाला ‘रिंग’ म्हणतात. चार ते सहा वष्रे वयाच्या धष्टपुष्ट  बलाचा वध करण्याचा हा खेळ रंगतो तो मेटॅडोरच्या कसबामुळे. मेटॅडोर प्रथम बुलफाईटच्या रिंगमध्ये येऊन बिगुलच्या निनादात प्रेक्षकांना अभिवादन करतो. पाठोपाठ  रिंगमध्ये बल प्रवेश करतो. मेटॅडोरचे चार मदतनीस घोडय़ावरून येऊन लांब दांडे असलेले धारदार सुळे बलाच्या मानेत खुपसतात. झालेल्या जखमांमुळे चिडलेला बल उधळून सरळ घोडय़ांवर शिंगांनी प्रहार करायला लागतो. घोडय़ांना संरक्षणासाठी पॅड्स बांधलेले असतात. त्यापुढे मुख्य मेटॅडोर लालभडक रंगाचे कापड घेऊन येतो आणि ते बलासमोर असे धरतो की बलाने मुसंडी मारावी. निरनिराळे अंगविक्षेप करून बलाला उधळावयास लावणे हेच मेटॅडोरचे खरे कसब. प्रेक्षकदेखील मेटॅडोरचे कसब पहायला आलेले असतात. अशा पद्धतीने थकलेल्या, जखमी बलावर शेवटचा आघात म्हणून त्याच्या मानेत आणि हृदयाजवळ तलवार खुपसून त्याचा तो वध करतो.

हे कसब प्रेक्षकांना आवडले तर ते खेळाच्या व्यवस्थापकाला सांगून मृत बलाचे कान कापून त्या मेटॅडोरला मानाचे बक्षिस म्हणून देववितात.. प्रेक्षक त्याहीपेक्षा अधिक खूश झाले तर बलाचे शेपूट मेटॅडोरला मिळते! खेळ संपल्यावर त्या मृत बलाला खाटीकखान्यात नेण्यात येते.

सुनीत पोतनीस

sunitpotnis@rediffmail.com

मराठीतील सर्व नवनीत बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Balsam of tolu
First published on: 16-09-2016 at 02:27 IST